कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, May 13, 2012

पहीलं पहीलं प्रेम

पहीलं पहीलं प्रेम
अचानक नकळत झालेलं
सगळ्यानपासुन लपवलेलं
तरी सुधा
सगळ्यांना कळलेलं

पहीलं पहीलं प्रेम
पहील्यांदा अनुभवलेलं
मी तीला आणी तीने मला
प्रेम करायला शीकवलेलं
तरी सुधा
शीकायचे काहीतरी
बाकी राहीलेलं

पहीलं पहीलं प्रेम
थोडसं निराश झालेलं
घरी कळाले तर काय
म्हणून थोडं घाबरलेलं
तरी सुधा
न घाबरता खरं
प्रेम नीभावलेलं

पहीले पहीले प्रेम
थोडक्यातच संपलेलं
तीच्या अचानक जाण्याने
दुखावलेलं
तरी सुधा
अजुनही तीच्याच
आठवणीत रमलेलं

असच काहीसं होतं
माझं प्रेम अधुरं राहीलेलं...

मैत्री कि प्रेम म्हणावे

स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस 
तर कधी मिठीत येऊन 
अचानक निरोप घेऊन जातेस 


गप्प राहा ग आता 
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना 
माझ्यावर का तू रुसतेस?


दिसलो नाही एकदा जरी 
अबोला माझ्याशी धरतेस 
आयुष्याची गणितं मांडताना 
मैत्री मात्र विसरतेस ...!!!


माझ्याविना तू , तुझ्याविना मी 
कधी ना राहू शकलो 
तरीही या गोंडस नात्याला 
प्रेम नाही म्हणू शकलो !!


बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले 
भाव नजरेतील सावरताना 
लोकांनीही पहिले ...


मैत्री कि प्रेम म्हणावे 
कधीच नाही कोणा कळले 
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!