कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, January 22, 2012

फक्त तुझ्यासाठी..

ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....
...
यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही...

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्या मनाच्या अंगणात

रिमझिमणार नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा

जसा स्वीकारला होता

तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच हे अखेरचे काही अश्रू,

फक्त तुझ्यासाठी....

पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली

तुझ्यासाठी जमणार नाहीत.......

आणि हे अखेरचे काही शब्द

फक्त तुझ्यासाठी.....

यापुढे माझ्या कविता

तुझ्या आठवणी मागणार नाहीत....

यापुढे कधीही माझ्या कविता

तुझ्यासाठी असणार नाहीत....

ही अखेरची तुझी आठवण....

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....

Wednesday, January 18, 2012

एक लव स्टोरी …








एक मुलगा आणि मुलगी यांचे एकमेकावर खूप
प्रेम होते….
...

पण त्या मुलीचा एका अपघातात दुख:द मृत्यू होतो..
..

मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत
सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५ परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते
पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण विचारतो…..
तर ती सांगते..
..
..
..
.. ..
..
आता पुरे कर रे, किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझते.....

मी पुन्हा भेटेन ....

मी पुन्हा भेटेन ....

त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना,

मी पुन्हा भेटेन ...
.त्याच बेधुंद वार्‍यासोबत
काळाशी स्पर्धा करताना,

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना,

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हसणार्‍या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना,

मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणार्‍या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना,

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना.

Saturday, January 14, 2012

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे काय हे कधी
कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी
कुणाला उलगडलच नाही…||

का जीव होतो वेडा पिसा
जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या
छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…||

मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा
कुठला विचार करावा
असेही कधी वाटत नाही…||

रात्री छानच असतात …
तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी …
मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…||

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही ते जीवनात
कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या
कुठल्या तरी कोपर्‍यात ते
नेहमीच जपायाच असत…||

प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम
करायचे ही कधी थांबणार नाही ....|

मनाला एकदा असेच विचारले

मनाला एकदा असेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखा:त राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता:ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

Tuesday, January 3, 2012

विचार....

स्वत: शी वागताना डोक्याचा वापर करावा, इतरांशी वागताना हृदयाचा वापर करावा.


दिवस हे इवल्याशा पाखराप्रमाणे असतात,
येतात आणि भुर्रकन उडून जातात,
परंतु मागे ठेवतात आठवणींची पिसे
काही काळी,
काही पांढरी,
काही मऊ,
काही खरबरीत,
आपण जमेल तेवढी उचलायची
व त्यांना घेऊन बनवायची एक सुंदर चटई,
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी.. . .



नातं कोणतेही असू द्या...........नात्यात महत्वाचा असतो तो एकमेकावरचा विश्वास.....

एकदा का नात्यांमधला विश्वास उडाला कि आयुष्य रंग उडालेल्या भिंतीसारखं बेरंग बनत.

भिंतीना रंग परत देता येतो पण बेरंग आयुष्यात रंग भरणं खुप कठिण होउन बसतं.



आपल्या आयुष्यात कुणी यावे हे आपले नशीब ठरवते;

पण आपल्या आयुष्यात कुणी थांबावे हे आपले हृदय ठरवते...


आजच्या युगात फक्त २ गोष्टी महत्वाच्या आहेत..

वेळ आणि पैसा

श्रीमंत लोक पैसे खर्च करून वेळ वाचवितात
तर
गरीब लोक वेळ खर्च करून पैसे कमवितात.


आपल्या आयुष्यातील
अश्रू मोजण्यापेक्षा आपण किती हसलो हे मोजा
तसेच
आपले वय मोजण्यापेक्षा आपले खरे मित्र किती हे मोजा.

का...?

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?

पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…

माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार

फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का...?

मैत्री

मैत्री नेहमी अशी असावी सहज निभावता येणारी

इतर नात्यापेक्षाही जास्त पावित्र्य जपणारी

दुनियाच्या वणव्यात वावरताना शांत सावली देणारी

तहानलेल असताना अगदी गोड स्वच्छ पाण्याची चव देणारी

नेहमी न सांगता सामंजस्य जपणारी

श्वास संपून गेला तरीही जिवंत असणारी

क्षणभर जगुन आयुष्यभर स्मरणात राहणारी

नेहमी या दुनियेला भगवान "श्रीकृष्ण" अणि "सुदामा" यांची आठवण करुन देणारी....

मी आता शिकलोय ..

मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ...

आता मी दुख: लपवायला शिकलोय..
आपल्या लोकांबरोबर खोटं बोलायला शिकलोय..

झाले गेले विसरून पुढे जायला शिकलोय..
चेहर्‍यावरती कृत्रिम भाव आणायला शिकलोय..

असंख्य जखमा मनात ठेवून खोखो हसायला शिकलोय..

ढळढळ न रडता हळूच डोळ्यातील पाणी पुसायला शिकलोय..

अंतरंगातील आठवणी तश्याच ठेवून नवीन गोष्टीकडे पाहण्यास शिकलोय..

भूतकाळात जास्त न डोकावता भविष्याचा वेध घ्यायला शिकलोय..

चुका झालेल्यांना माफ करण्यास शिकलोय..

पण आपले म्हणणे त्यांना ठाम सांगायला पण शिकलोय..

गोडी गुलाबीने वागून कामे पूर्ण करवून घेण्यास शिकलोय..

दुसर्याँचा उपयोग कसा करून घ्यावा हे नक्की शिकलोय..

आपले कोण परके कोण हे ओळखण्यास शिकलोय..

मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ..

Monday, January 2, 2012

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील..!!

एका तलावाच्या काठावर ... ♥


एका तलावाच्या काठावर ... ♥
प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू, किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, " त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर :- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते"