कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, April 16, 2012

का गेली ती ?


फोनवर तिच्याशी तासन् तास बोलायचो..
तिच्या प्रत्येक शब्दाला काळजीपूर्व ऐकायचो..
मग का गेली ती ?

आठवड्यातून तीन वेळा तिला भेटायचो..
अर्धा तास आधी जाऊन बसायचो..
मग का गेली ती ?

तिला न आवडणाऱ्‍या सवयींचा त्याग करायचो..
तिला नेहमी पटेल तसेच वागायचो..
मग का गेली ती ?
तिच्या डोळ्यातील प्रत्येक आश्रू जपायचो.
तिला हसवण्यासाठी विनोद पण करायचो..
मग का गेली ती ?

अजूनही तू हवासा वाटतोस

अजूनही तू हवासा वाटतोस
का अजूनही तू हवासा वाटतोस
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

तुझे हात पहिले की ,
... कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते
तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत
अगणित गोष्ट आठवत राहतात

तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
... शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग
आणि मग पुढे, मी लपवलेले
सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
अन हसर्‍या खळीमागाची कडवट दुःख ....

वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील
कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून
रात्रभर बसला असशील
झोपेची वाट बघत,
मी बोलल्याचे भास होऊन सुखावला असशील..तुही. ..कदाचित....

कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....

आता बरेच महिने लोटले
आता बर्‍यापैकी पुसलं गेलय दुःख
शेवटी काळ हे जालीम औषध असतं
" असल्या " जखमांवर ...
किंवा नसेलही कदाचित .....

का अजूनही तू हवासा वाटतोस
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....
तू मला हवासा वाटतोस..

शाळा आणि कॉलेज



शाळा: पेन्सिल ,रबर,शार्पनर,पेन,पट्टी....
कोलेज:एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला ;)

शाळा:वर्गात येण्याआधी "टीचर ,मे आय कम इन?" किंवा "टीचर ,मी आत येवू का?"
कोलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .

शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !
कोलेज:मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर डे ना"

शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार
कोलेज:कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"

शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते
कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते

शाळा: यार मला ती आवडते
कोलेज:साभाळून बघ रे वाहिनी आहे तुझी...

आता सांगा पाहू काय जास्त आवडत??

फेसबुक


जडलो घडलो फेसबुकावर
रडलो हसलो फेसबुकावर
.
तिने सोडले होते मजला
पुन्हा भेटलो फेसबुकावर
.
ठाव न पत्ता ज्या गावाचा
तिथला बनलो फेसबुकावर
.
फोटोमध्ये चिकणी दिसली
भाळुन फसलो फेसबुकावर
.
पूर्वी होतो किती 'श्यामळू'
'चटोर' बनलो फेसबुकावर
.
शेजाऱ्याला जाणत नव्हतो
'फ्रेंड' जाहलो फेसबुकावर
.
नको नको ते 'टॅग' लागले
'लंपट' ठरलो फेसबुकावर
.
किती भेटले आंबटशौकिन
म्हणुनच रमलो फेसबुकावर !

Saturday, April 14, 2012

ते ओठ तेव्हा माझे नसतील...

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील

कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

टायटॅनिकची 100 वर्षे पूर्ण....

टायटॅनिक जहाजाच्या अपघातास 15
एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्या निमित्ताने जगभर विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जहाजाचा इतिहास व
बुडण्याची कारणे व
शताब्दीच्या तयारीचा आढावा...
टायटॅनिक जहाज
व्हाइट स्टार लाइन कंपनीचे टायटॅनिक हे
तिसरे जहाज. पहिले ऑलिंपिक, दुसरे
ब्रिटानिक आणि तिसरे टायटॅनिक.
टायटॅनिक हे 882 फूट लांब व 104 फूट उंच.
46 हजार 328 टन वजन.
जहाजाच्या निर्मितीसाठी 75 लाख डॉलर
खर्च.
31 मे 1911 रोजी जहाजाचे उद्घाटन. हे
जहाज पाहण्यासाठी सुमारे एक लाख लोक
जमा.
प्रवाशांसाठी काय?
3339 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता.
739 प्रथम वर्गाच्या खोल्या. 674
द्वितीय व 1026 तृतीय वर्गाच्या खोल्या.
900 कर्मचारी.
पंचतारांकित हॉटेलप्रमाणे व्यवस्था. दूरध्वनी,
ग्रंथालय, दुकाने, पोहोण्याचा तलाव,
व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट.
अपघाताच्या दिशेने
समुद्रातील चाचण्या पूर्ण करून टायटॅनिक 4
एप्रिल 1912
रोजी मध्यरात्री ब्रिटनमधील
सद्मटनला पोचले.
10 एप्रिल 1912
रोजी टायटॅनिकचा सद्मटन ते न्यूयॉर्क
प्रवास सुरू. एकूण 1317 प्रवासी व 900
कर्मचारी. मुलांची संख्या 107.
दुपारी 12 च्या सुमारास
निघालेल्या टायटॅनिकची दुसऱ्या जहाजाबरोबर
टक्कर टळली. एक तास उशिराने प्रस्थान.
अटलांटिक महासागरातील ग्रॅंड बॅंक्स ऑफ न्यू
फाऊंडलॅंडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर
हिमनग
असल्याचा इशारा टायटॅनिकला देण्यात आला.
परंतु टायटॅनिक पूर्ण वेगाने जात होते.
महाकाय जहाजांना हिमनगांपासून
धोका कमी असतो, असे त्या काळी मानले जात
होते. समुद्र शांत असल्याने व आकाशात चंद्र
नसल्याने हिमनग पाहण्यात
कर्मचाऱ्यांना अडचण.
असा झाला अपघात
14 एप्रिल, शनिवारी रात्री 11 वाजून 40
मिनिटांनी जहाजासमोर हिमनग आल्याचे
कर्मचाऱ्याला दिसले. इशाऱ्यानंतर जहाज
वळविण्याचा प्रयत्न.
टायटॅनिकची एक बाजू हिमनगावर आदळली व
अनेक ठिकाणी भोके पडून आत पाणी शिरले.
जहाजात पाणी भरण्याचा वेग प्रचंड वाढला व
जहाज एका बाजूला कलू लागले. पहाटे 2 वाजून
20 मिनिटांनी टायटॅनिक बुडाले.
पाण्याचे तापमान उणे 2 अंश सेल्सिअस. अनेक
जण थंडीने, हृदयविकाराच्या झटक्याने
किंवा बुडून मरण पावले.
1517 प्रवासी मृत्युमुखी. 710
लोकांना वाचविण्यात त्यांना यश आले.
अपघातानंतर
"टायटॅनिक'वर लाइफजॅकेट्स व जीवरक्षण
होड्यांची संख्या अपुरी होती, हिमनगाचे
इशारे मिळूनही कॅप्टन स्मिथ यांनी दुर्लक्ष केले
आणि धोकादायक भागात वेगाने जहाज नेल्याने
अपघात झाल्याचा निष्कर्ष.
या दुर्घटनेनंतर बिनतारी संदेश यंत्रणा 24
तास सुरू ठेवणे, उत्तर अटलांटिक महासागरात
हिमनगांच्या स्थितीचे निरीक्षण
करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गस्त
घालण्याचा निर्णय.
साहित्य, चित्रपटही
1958 मध्ये "अ नाइट टु रिमेंबर'
हा चित्रपट.
1997 मध्ये "टायटॅनिक' हा चित्रपट आला.
चित्रपटाने 1.8 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला.
हाच चित्रपट आता "3 डी'मध्ये.
शंभरीनिमित्तचे उपक्रम..
टायटॅनिक प्रथम पाण्यात 31 मे 1911
रोजी उतरले, त्यानिमित्त 31 मे 2011
रोजी रात्री 12 वाजून 13
मिनिटांनी बेलफास्ट येथून एक फटाका हवेत
उडविण्यात आला. या दिवशी बेलफास्ट
बंदरावरील सर्व जहाजांनी हॉर्न वाजवून
टायटॅनिकची आठवण जागविली.
10 एप्रिल 2012 रोजी लंडनमध्ये रॉयल
फिलारमोनिक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम.
"बालमोरल' हे जहाज माइल्स मॉर्गन
यांनी घेतले असून, "टायटॅनिक'चा प्रवास
ज्या मार्गाने झाला त्या मार्गाने हे जहाज
प्रवास करणार. 15 एप्रिल 2012 रोजी हे
जहाज "टायटॅनिक' बुडाले
त्या ठिकाणी पोचेल.

Friday, April 13, 2012

हमी



जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!

जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!

तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे

अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)

म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे

भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!

कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी
तसा वरवर पुरेसा संयमी आहे

तसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे!
तरी 'ती' सोबतीला नेहमी आहे.....
एकदा ती बसमध्ये अचानक दिसली

मित्राने ओळख करून दिली

मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू?

तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू?

काय सांगणार आता हिला

एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला

चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस"

काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही

हा, तर ती बस मधली मुलगी

आताही माझ्याच कॉलेजात होती

सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती

राज की बात, मला ती आवडली होती.

मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला

वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या

दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या

देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला

बघता बघता दोन वर्षे अशीच सरली

तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली

कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या

कोमल हृदयात माझ्या, हाय! , आठवणी मात्र राहिल्या

जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती

तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता

गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला

तिच्या दर्शनासाठी हा मन्या पार तरसून गेला

या पावसाला काय वेड लागलंय का...?

या पावसाला काय वेड लागलंय का...?

वेळ ना काळ
केव्हाही येतो..
सकाळ ना संध्याकाळ
उगाच आपला बरसतो...

अरे,
याला कळत कसं नाही...!
ती मला भेटायला येणार होती..
वेळात वेळ काढून
निवांतपणे थांबणार होती...

ती येणार म्हंटलं की,
त्याचा कसा होतो बघा जळफळाट..
त्याच्यामुळे येता आले नाही की,
तिचा घेतो मग तो तळतळाट...

चिडुन नंतर ती बोलते,
याची तक्रार देवाकडे करायला हवी..
तो म्हणतो, देव तसा बाका आहे
त्याने ती ऐकायला तर हवी...

राग येतो तिला, म्हणते
हा तर खुपच निर्लज्ज आहे,
जायचे काहि नाव नाही..
फक्त इथेच बरसेल
इतरत्र याची कुठे धाव नाही...

कंटाळलेली ती,
आता मात्र जायला निघते..
म्हणते, आता बरी माझ्यापाठी
यालाही जायची लहर येते...

त्यालाही थोडी लाज वाटते..
थांबतो, बरसत रहातो निरंतर तिथेच...
सकाळ, दुपार, संध्याकाळ अन रात्रभर.....

खरं प्रेम.

जे हवे ते मिळत नसते...

जे मिळते ते हवे नसते...

आयुष्य तेच आहे...

जे अपयशा नंतरही यशाकडे धावत असते...


--------------------
कोणतेही स्वप्न केवळ जादूची कांडी फिरवून सत्यात येवू शकत नाही,
त्यासाठी अपार कष्ट करून घाम गळावा लागतो....
--------------------------
एकदा एका प्रियासी ने आपल्या प्रियकराला विचारले,
"तू मला नेहमी तुझ्याच हृदयात ठेवशील ना?
जसं मी तुला माझ्या हृदयात ठेवलं आहे तसं..."

तेव्हा प्रियकर आपल्या प्रियासिला म्हणाला,
"मी कधी तुला माझ्या हृदयात ठेवणार नाही.
कारण तू नेहमी माझ्या हृदयाच्या खोल दरीत असशील जिकडून तुला कोणीच काडू शकणार नाही
जर तुला बघायचच आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे
तर मी सांगतो तसं कर,
तुझे डोळे बंद कर आणि ज्याचा चेहरा तुला दिसेल तो मीच असेन
तुझा हाथ तुझ्या हृदयावर ठेवून प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला मेहसूस कर,
तो प्रत्येक हृदयाच्या ठोका नेहमी माझ्यासाठी धडकत असेल
जेव्हा तुझ्या आयुष्यात कधी खुशीचा क्षण येईल,
तेव्हा पहिला व्यक्ती जो खुशीचा क्षणात सामील असेल तो मीच असेन
जेव्हा तू कधी दुखी असशील आणि तुला रडावसं वाटत असेल,
तेव्हा तुझ्या भावनांना वाटून घेण्यासाठी आणि तुला दुखात हसवण्यासाठी मीच असेन
जेव्हा तू आयुष्यात कधी कठीण परीस्तीत असशील,
तेव्हा फक्त मला मनापसून हाक मार, बघ मी तुझ्या जवळच असीन
जेव्हा तू हे जग सोडून जाशील,
तेव्हा फक्त आपल्या बाजूला बघ मी तुझ्या सोबतच असेन
कारण मी नेहमी तुझ्याच बरोबर असीन माझी परी...

-------------------------------

Wednesday, April 11, 2012

हा भास तुझा होताना…

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..

अधुरी एक कहाणी.

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली,
आपल्या फेसबुक माध्यमातून,,,,रोजच
ओनलाईन बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा
मारल्या शिवाय ते रहात नसत….
या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते
४ महिने हे असेच चालू होते… परंतु त्या युवकाने
तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही….
आणि एकदिवस चक्क त्यामुलीने त्याला विचारले.
तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर
कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….तिच्या त्या प्रश्नावर
त्या युवकाने उत्तर दिले.हो. करतो मी प्रेम तुझ्यावर प्रेम मग त्या युवतीने
त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास ?
युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम
करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि तू
मैत्रीही नाही ठेवली तर?

अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणि रोजचा गुड
मोर्निंग हा शब्दआय. लव. यु कडे वळला….हळू हळू फोन वर
बोलन चालू झाल.आणि फेसबुक वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात
बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न
रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले… वेळ
आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच खरी….पण तीच त्याला नेहमीच
आमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले
कि आपण भेटायला जायचे….त्याचा गाव वरून
तो तिच्या गावी निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचेअश्रू
आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..

भेटीचे ठिकाण ठरले त्या गावचे स्टेशन चे ते मोठे खांब
त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे
येऊन थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून
मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण
हे नक्की समजल…त्याच तिच्यावर आणि तीच
त्याच्यावर खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं
हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी मंदिर असे
उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन
घेण्यास गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न
चिन्ह दोघांच्याही चेहर्‍यावर होत….

फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर
लवकर कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले
आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर
हाजीमलंग झाल आणि गप्पा सुरुझाल्या….किमान ४ तास,
ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत
होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे
सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप
घेण्याची वेळ आली आणि… पुन्हा स्टेशन वरून
दिवसभराच्या भेटीची सांगताझाली…..
दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट
झाल्यानंतर एकमेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल…

एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस
ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम
प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच
नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला फक्त तिचे बाबा सोडून….दररोज
तासान तास बोलन चालू असायचं….या
दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..

ऑगस्ट मध्ये त्यांनी साखरपुडा करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २०११
या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते
काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत…. दोघांनाही फार आठवण
आली होती… सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद
होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला…
कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……

युवकाला काय करावे सुचेना उठून
त्याने तिचे गाव गाठली आणि तिची अखेरची भेट
ती सरणावर असताना घेतली…..सारी स्वप्न त्या चितेत
पेटघेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने
कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर
तो ठीक झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल
अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल ?

अशी हि आपल्यातीलच
एका युवकाची….. अधुरी एक कहाणी.

Friday, April 6, 2012

कालच दिसली ती पुन्हा एकदा

कालच दिसली ती पुन्हा एकदा
आठवणी ताज्या करून गेली
भेटलो शेवटचे तेव्हा हृदयात भरलेली

डोळ्यात पाणी आणि मनात तहान
हातात हात आणि त्यापेक्षा महान
जणू कालच घडलं जसं...

पाहिलं तिच्याकडे तिनेही माझ्याकडे
हळूच डोळे मोठे केले
जणू फुल उमलले

मी जाणार तीच्या जवळ तोच
मागून दोन हात तीच्या कमरेवर आले
तोच तो मुलगा line मारायचा

मला पाहताच दूर जायचा
आज तिच्या इतक्या जवळ
विश्वास नाही माझ्या डोळ्यांवर

सुखासाठी तिच्या बाहेर आलो आणि
म्हणता म्हणता मीच दूर राहिलो....!

कसं विसरू मी तुला...

श्वास आहेस तू माझा.....
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन... ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा....
सांग ना कसं विसरू मी तुला....

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे...
मी किती भावूक आहे...,
विसरायचा प्रयन्त केल्यावर...
पापण्या ओल्या करतात...,
सांग ना कसं विसरू मी तुला...

झोपेतही तुझीच आठवण येते...,
सारख तुझंच नाव घेते...,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला....
सांग ना कसं विसरू मी तुला...

Wednesday, April 4, 2012

नकार

तुझ्या नि माझ्यात
अस काहीतरी होत
खूप काही बोलूनही
आपल नात अबोल होत
तुझ्यापासून दूर राहताना ,

मी तरीही तुझ्या जवळ येते
प्रत्येकवेळेला
काहीतरी नवीन भासून
प्रत्येकवेळेला
काहीतरी नवीन हरवते ,

तू दिलेला नकार
मनापासून नव्हता
तुला नक्कीच समजल असेल
तेवढा माझ्या प्रेमावर
माझा विश्वास होता ..!!