कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, February 15, 2013

आठवण


मी तुझी नेहमी आठवण काढेन
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना.

तुला स्वप्नातही वाटणार नाही
...
इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?

मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?
आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते

जग स्वप्नांचे चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी

परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे जाळून जाते

दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे

तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे..

ती...



तिला कधीकधी त्याची आठवण येते,
पावलांना तिच्या, भूतकाळात नेते.
ती डोळे गच्च बंद करून घेते,
पण स्वप्नातही स्वप्न त्याचेच येते....

"कसा असशील तू?" तिला थोडीशी काळजी वाटते ,
कधीकधी नकळत पण डोळ्यांत तिच्या पाणी साठते.
तडजोड कितीही केली मनापासून मान्य तिने...पण...
कितीही केलं,तरी भरून आलं कि आभाळ फाटते.

ती हसते, मग जग फसते...
तिच्या मनात काहीच नसूनही खूप काही असते,
मनातली ठिणगी 'कधी' पाण्याने विझते?
आतून जागी अन ती डोळ्यांनी निझते.

तू


तू निघून गेल्याचं दु:ख नाही.,
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!
तुझ्याविना जगणं असह्य आहे.,
पण इतरांसाठी जगणं कर्तव्य
आहे.!!

खुप काहि सांगायचं होतं तुला पण..
 मनातलं मनातच राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्या आधीच
पाखरु रानातलं उडून गेलं !!

Thursday, February 14, 2013

व्हॅलेंटाईन


विचार केला करायचं का
"कयामत तक" आमिरसारखं.?
त्याला निदान जुही मिळाली,
आम्हाला घर ही व्हायचं परकं !
आमच्या स्टोरीत नुसतेच व्हिलन
कुठाय "हिरॉइन"?
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
आमच्यापेक्षा देवदास
कीतीतरी जास्त होता सुखी
पारो नाहि तरी
निदान मिळाली असती 'चंद्रमुखी'
आमच्या नशिबात फ़क्त आंबट द्राक्ष,
कधी मिळणार वाईन..?
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
सरते शेवटी कंटाळून घातलं
विघ्नह्र्त्याला साकडं
म्हणाला तुलाच नाचता येईना
अंगंण कुठं वाकडं...??
"सध्या शेड्युल्ड बिझी आहे,
पुढ्च्या वर्षी पाहीन"
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
आता कळतंय हा प्रेमाचा
सगळा खोटा थाटखरं
प्रेम स्वत्ताहुनच शोधत येईल वाट
कुणीतरी कधीतरी नक्की होईल
आपल्याला जॉईन
सगळेच दिवस मग प्रेमाचे,
कशाला हवा हा व्हॅलेंटाईन...??

Tuesday, February 5, 2013

विसरणं शक्य नसलं तरी


विसरणं शक्य नसलं तरी,
आठवण तुझी काढणार नाही.

भारावून जरी गेलो तरी,
नयनी आसवं दाटणार नाही.

छळलंस किती तू मला तरी,
सवे तुज कोणी भांडणार नाही.

डोळ्यात उभे पाणी जरी,
थेंब एकही सांडणार नाही.

आग दु:खाची कोणत्याही,
अश्रूंच्या पाण्यानं विझत नाही.

तरीही दोन अश्रू पाझरल्याशिवाय,
मन मात्र हलकं होत नाही.

किंमत (बोधकथा )


एका विवाहित जोडप्याला १५ वर्षाँनी एक मुलगा झाला.
त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
तो मुलगा त्यांचा जीव की प्राण झाला होता.
.
.
मुलगा २ वर्षाचा झाला.
तेव्हा एका सकाळी त्या मुलाचा बाप कामावर जाण्याच्या वेळेला दरवाजात बुट घालत असताना एक औषधाची बाटली दिसते.
.
परंतु त्याला कामावर जायला खुप उशीर झाल्यामुळे तो बायकोला बोलला. "अगं ये, मला उशीर झालायं ती बाळाजवळ असलेली औषधाची बाटली बंद करुन कपाटात ठेवुन दे.."
.
.
त्याची बायकोदेखील किचनच्या कामात इतकी व्यस्त झाला होती की ती बाटली बद्दल सांगितलेलं विसरुन जाते.
.
काही वेळाने तो मुलगा ती बाटली बघतो आणि त्याच्याबरोबर खेळता खेळता त्यातलं औषधं देखील सर्व पिऊन टाकतो..
.
खरं तरं ते औषधं पॉवरफुल आणि मोठ्या माणसांचं असतं..
.
ते प्यायलानंतर तो मुलगा जेव्हा चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा त्याची आई पटकन बाहेर येते..
आणि ते दृश्य बघितल्यावर तिला जबर धक्का बसतो.
.
शेजाऱ्यांच्या मदतीने त्या मुलाला हॉस्पिटल मध्ये नेतात.
.
पण त्या ओवर डोसमुळे मुलगा मरण पावतो..
.
अक्षःरशा तिला खुप धक्काचं बसतो.
.
खुप घाबरली देखील असते की आता त्यांना कसं
सामोरं जायचं.
.
जेव्हा त्या मुलांचे वडिल हॉस्पिटलमध्ये येतात आणि मुलाला मेलेल्या अवस्थेत बघतात तेव्हा त्यांच्या अंगातला जीव गेल्यासारखे खाली कोसळतात..
.
काही जण त्यांना खुर्चीवर बसवुन पाणी पाजतात तेव्हा ते शुद्धीवर येतात.
.
आणि बायकोकडे बघत काहीतरी बोलतात.
.
.
तुम्हाला काय वाटतं काय बोलले असतील ते तिला..?
.
.
.
.
.
ते बायकोला फक्त एवढचं बोलतात की, "धीर धर, मी तुझ्या सोबत आहे .."
.
नवऱ्याचं हे ऐकुन तिला त्यांच्यावर विश्वासचं बसतं नव्हता..
.
कारण की, चुकं दोघांची होती.
.
पहिली तर,
नवरा जेव्हा कामावर जात होता तेव्हा त्यांनी फक्त १ मि काढुन ती औषधाची बाटली कपाटात ठेवली असती तर आज ही वेळ आलीच नसती.
.
.
दुसरी म्हणजे,
तिने जेव्हा नवऱ्याचं ऐकलं की बाटली बंद करुन कपाटात ठेव तर तेव्हाचं तिने पटकन ते एका मिनिटाचं काम करायला पाहिजे होतं.
.
.
.
.
.
सांगायच हेचं आहे की एका सेकंदाची चुक खुप महागात पडते.
आणि त्याची किंमत जन्मभर भोगावी लागते..