कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, March 27, 2013

कधी कधी मला ही वाटतं..



कधी कधी मला ही वाटतं
माझं ही कुणीतरी असावं
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसाव
तिच्यावर इतक प्रेम करावं
की जगातलं सर्व सुख तिला द्यावं
अन तिच्या डोळ्यात आपलं
प्रेमाचं जग पाहावं
तिच्याबरोबर पावसात एकत्र फिरावं
एकत्र नदीकाठी बसावं
तिच्या सहवासात
स्वताला विसरावं
सुख दुखात तिच्या
असं सामील व्हावं
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घाव
मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिरावं...
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत राहावं..

रंगपंचमीच्या शुभेच्छा..!




Friday, March 22, 2013

शिवा काशीद


शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु लागली.सारखे किंवा हूबेबूब दिसण्याचा आणि त्या पाठीमागचे शिवा काशीद चे बलिदान....!!
पडायचेच असेल तर दहा हजार फुटावरून पडा म्हणजे निदान लोकांना हे तरी कळेल कि तुम्ही किती उंचीवर गेला होतात. मरणाला कवटाळायाचेच असेल तर नरवीर शिवा काशीदसारखे मरा ज्यामुळे निदान तुम्हाला म्हणता तरी येईल, " मेलो तरी शिवाजी महाराज बनून मेलो.

सिद्दी जोहारने पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा पन्हाळ्याहून विशाळ गडाकडे कूच करताना बाजी प्रभू देशपांडेनी गाजविलेला इतिहास अमर झाला. पण त्याचवेळी शिवा काशीद नावाच्या एका निधड्या छातीच्या मावळ्याने गाजविलेला इतिहास मात्र आजही बर्याच जणांना माहित नाही. शिवा काशिद्चे नावच शिवा नव्हते तर दिसणेही शिवाजी महाराजासारखेच होते. सिद्दी जोहरचा जावई सिद्दी मसूद महाराजांच्या पाठलागावर होता. अशा वेळी त्याला हुलकावणी देण्यासाठी शिवाने पालखीत बसायचे व ती पालखी घेऊन पाच पंचवीस जणांनी मुख्य वाटेने जात राहायचे आणि खर्या महाराजांनी आडवाटेने विशालगडाकडे पसार व्हायचे असा बेत आखण्यात आला होता. महाराजांनी विचारताक्षणीच शिवाने तत्काळ होकार दिला होता.

हा होकार जीवघेणा होता. जर पाठलाग झाला तर शिवाने मुख्य रस्त्याने जायचे होते म्हणजे सापडायचे होते, व आपणच शिवाजी असल्याचे नाटक करून शत्रूची दिशाभूल करून त्याचा वेळ खायचा होता. जेणे करून महाराज आणखी पुढे जाऊ शकतील. एवढी फसवणूक करून सापडल्यावर शत्रू जिवंत सोडणार नाही हे शिवाला माहित असूनही त्याने महाराजांचा वेश घातला होता. अन घडलेही तसेच. सिद्दी मसूदने शिवाचा पाठलाग केला. त्याला पालखीत शिवाजी महाराजांच्या रुबाबात बसलेला शिवा सापडला. महाराजांनाच पकडल्याच्या आनंदात तो ससैन्य परतला. शिवाचे काम झाले होते. त्यांच्या वेळेचा त्याने खोळंबा केला होता. त्यामुळे महाराज खूप पुढे गेले होते. शिवाची पालखी जेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी आली तेव्हा सिद्धी जोहर पालखी समोर आला. मशालीच्या उजेडात तो खरा शिवाजी नाही हे उघड झालं, तेव्हा सिद्धी जोहर प्रचंड खवळला. आपले सोंग उघडकीस आले हे दिसताच शिवा काशीद घाबरला नाही. उलट तो खो खो हसू लागला. " कशी खोड मोडली " असे विचार णार्या बालकाची निरागसता, आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. भीतीचा तर लवलेशही नव्हता. खवळलेल्या शत्रूच्या तलवारी सपासप शिवावर कोसळल्या पण शरीर मरत असताना देखील शिवाचे मन म्हणत होते, " अरे मेलो तरी शिवाजी महाराज बनून मेलो.

" मित्रानो, तुमच्या आयुष्यात कदाचित अशी वेळ कधी येणार नाही. पण जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा किडा मुंगीचे मरण मरण्यापेक्षा शिवा काशीदचा हा संदेश स्मरून त्यातल्या त्यात जे शक्य असेल ते भव्य कार्य करून आपल्या जीवनासोबत आपले मरणही सार्थकी लावावे आणि म्हणावे, " मेलो तरी शिवाजी महाराज बनून मेलो. "

पानिपत


मराठी सेना झाडाची पानं आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली, कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोण्या ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचं कारण नाही. ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला, त्या आमच्या महाशत्रूनंच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशहा अब्दालीनंच लिहून ठेवलं आहे,

'दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्फिंदार (आफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जून) सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्यानं तोंडात बोटं घालून चावली असती ! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य !'

Monday, March 18, 2013

आयुष्यातील सर्वात वाईट व चांगली गोष्ट


आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे
जिव्हाळा (an
attachment )
अतिशय दुःख होते जेव्हा आपण तो घालवून
बसतो......
सर्व काही असून नसल्यासारखे वाटते.....

आणि आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे
एकटेपणा (a
lonliness )
कारण ह्यातून खूप
काही आपल्याला शिकायला मिळतं
आणि जेव्हा आपण तो घालवून
बसतो आपल्याला सर्व
काही मिळतं....

Propose


मला तिला Propose करायचय...
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ...
.
... मला तिला सांगायच् तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतचनाही ...
माझ्या स्वप्नातली परी म्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..
.
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू ...
.
मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू.,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील का म्हणू ..
.
मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत नाही म्हणू ..कि ...
तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..
म्हणू तर काय म्हणू ?

आज तुझी खूप आठवण आली,


आज तुझी खूप आठवण आली,
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धाएकदा तपासून पहिला,
नंबर अन अवेलेबल दाखवत होता,

इथे श्वास सारखा फुलत होता, का माहित नाही कसतरीच झालेलं,
मनात सारखं काहीतरी चाल्लेल,
हो तिथेच गेलेलो मी,जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,
नजरेला नजरा देत,एकत्र राहणार बोललो होतो,
तू मात्र निघून गेलीस,
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करतोय, मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतोय,
तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय ...

आज आली होती ती ऑनलाइन


आज आली होती ती ऑनलाइन,
मला वाटले बोलेल ती माझ्याशी ,
मग मीच सुरुवात
केली बोलायला तिच्याशी ......
मला म्हणाली आठवण आहे का माझी,
मी म्हणालो हृदयात फक्त
प्रतिमा तुझी,
मला म्हणाली ऑनलाइन का नसतो ,
मी म्हणालो माझ्या शरीराच्या प्रत्येक
कणांमध्ये तुझाच सहवास असतो !

आज  ......
वाटले होते खुप काही बोलावे
मनातले दुःख तिच्याकडे खोलावे ,पण
वेळ नव्हता तिच्याकडे त्यात
माझी काय चुक
वेड्यासारखा प्रेम
करणारा मी,तिला काय समझेल
माझ्या प्रेमाची भूक !

आज  ......
 तिला मी नको आहे
हे मलाही कलून चुकले आहे ,
तिच्या बोलन्यातला राग दुखावतोय
आणि उपहासाने माझे मन जळतेय!

आज आली होती ती ऑनलाइन,
मला वाटले बोलेल ती माझ्याशी ,
मग मीच सुरुवात
केली बोलायला तिच्याशी ......
एक दिवस असा होता ,ती माझ्या वाचून
न रहायची
माझा प्रत्येक शब्द
फुलासारखा झेलायची
एकदा मला ऑनलाइन
पाहण्यासाठी तास न तास वाट पहायची ,
अणि आज ऑनलाइन आलो तर
पराक्यासारखे का वागायची !


......रात्रीचा दिवस
दिवसाची रात्र,केली होती मी
तिच्याच आठवनित एक एक दिवस
जगलो होता मी
प्रेमातून खरच मनातून बरच ह्र्धयातून
फारच दुःख भोगले मी
प्रेमाला सावरून ,मनाला आवरून,ह्रदयाला सावरून
हे जगच सोडले मी !

आज आली होती ती ऑनलाइन,
मला वाटले बोलेल ती माझ्याशी ,
मग मीच बोललो शेवटचे
तिच्याशी ......

Friday, March 15, 2013

" एवढं " सारं झाल्यानंतर ही...


का अजूनही तू.
हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या
नंतरही ...

तुझे हात पहिले की ,
कधी काळी झालेल्या
स्पर्शांची आठवण होते
तुझ्या अशा किती तरी
गोष्टींशी निगडीत
अगणित गोष्टी आठवत राहतात...

तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचातो राग
आणि
मग पुढे,मी लपवलेले...

सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
अन हसऱ्या खळी मागाची कडवट दुःख ...
वाटायचं की तुझे ही डोळे भरून आले असतील
कदाचित तुही गुडघ्यांत मान खालीघालून
रात्रभर बसली असशील
झोपेची वाट बघत,

मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..
तुही. ..कदाचित...
कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
माझ्यापासून ...

.माझ्या स्वभावापासून ..
आता बरेच महिने लोटले
आता बऱ्यापैकी पुसलंगेलय दुःख
शेवटी काळ हे जालीमऔषध असतं
" असल्या " जखमांवर ...

किंवा नसेलही कदाचित ...
का अजूनही तू
हवीशी वाटते
" एवढं " सारं झाल्यानंतर ही...

तुला माझी आठवण येते का ?


फक्त एकदा सांग,
तुला माझी आठवण येते का ?
एकदा मला पाहण्यासाठी,

तुझ हि मन झुरत का ?
नाजूक तुझ्या ओठांनी,

कधी माझ नाव घेतेस का ?
मला आठवताना,

कधी जग विसरून जातेस का ?
नसतानाही मी तुझ्यासंगे आहे,

अस समजून बोलतेस का?
एकांतात येणारा आवाज,

तू माझा समजून ऐकतेस का?
जगाच्या या गर्दीमध्ये,

मला कधी शोधतेस का ?
अनोळखी नाजूक स्पर्श,

कधी माझा समजून जपतेस का ?
चाहूल माझी लागल्यावर,

वाटेवरती थांबतेस का ?
कोणी नाही जाणून सुधा,

मागे वळून पाहतेस का???

फक्त तुझी साथ हवीय


कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय ...


तुझ्या प्रत्येक पावलासाठी
तुझं पाऊल बनायचयं
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी
तुझा श्वास बनायचयं

कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय ...

तुझ्या गालावर खिळण्यासाठी
तुझं हास्य बनायचयं
तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी
मला तुझच  बनायचयं

कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय ...


श्वासांपलीकडच्या गावातही
तुझी सावली बनायचयं
माझ्या आंधळ्या प्रेमाला
फक्त तुझी साथ हवीय ...

कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय .....

कधी- कधी ....


हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी- कधी ....
तूझं ते माझ्यावर रागावणं,
आणि मी रागावले तर झटक्यात मला मनवणं,
ती एक-एक आठवण, मनाला आज सलत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी-कधी ....
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं,
आणि मी "नाही" म्हणताच, अल्लडपणे हट्ट धरणं,
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी- कधी ....
तूझं ते माझ्यासाठी वाट पाहणं,
मी उशिरा आले कि माझ्यावर ओरडणं,
पण माझ्या एका .....,sorry मुळे
तूझा तो राग "स्मित हास्यात" विरून जाणं,
आजही ते हसू माझ्या आठवणीत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
खरंच ...........

हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.