कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, April 28, 2013

नाती


काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली, तरं काही सहज तोडलेली
काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली.!

काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळा सारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली.!
काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली.!

काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली.!
काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली.!

काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली.!
काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली.!

काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-अपमानाच्या ओझ्या खाली दबलेली.!
काही मोत्याहुन अनमोल ठरलेली.
तर काही भंगारा सारखी विकाया काढलेली.!

काय असतात ना ही नाती काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली…..

पानिपत



पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.

इतिहास
या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.
पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
पानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, १५ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला

Friday, April 26, 2013

आहेस तू


आहेस तू सावरायला म्हणून पङायला आवङते,

आहेस तू हसवायला म्हणून रङायला आवङते,

आहेस तू समजावयला म्हणून रुसायला आवङते,
आणि

आयुष्यात आहेस तू सोबत म्हणून जगायला आवङते....

खुप प्रेम करते.. ती.♥


कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...
एरवी अगदी खळखळून हसते...

पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते...

पण पंजाबी ड्रेस वर
टिकलीही न चुकता लावते..
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते

पण मोबाइल मधे फोटो
काढतो म्हणालो तर
'नाही'म्हणते...

पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते...

लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त
same 2 u च म्हणते...

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते...

बोलून दाखवत नसली
तरी नजरेने
खुप काही सांगते

एवढ नक्की सांगतो
माझ्यावर खुप
खुप प्रेम करते...♥

रोज मी एक कविता करतो


रोज मी एक कविता करतो,
त्या कवितेत फक्त तिलाच बघतो..
तिला पाहून,
गालातल्या गालात हसतो...
अन हळूच भरलेले डोळे पुसतो...
आई ने विचारलं,"काय झाल?",
तर तिला काहीतरी थाप मारतो...
अन शब्दांच्या विश्वात,
परत तिलाच मी शोधत फिरतो ..
रोज मी हेच करतो...
माझी नसणार्या तिला,
रोज मी कवितेत बघतो...
अन सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही..
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो...
रोज तिला मी कवितेत,
फक्त माझीच करतो.

Wednesday, April 3, 2013

विचार..!


खुप छान वाटतं...♥


स्वप्नांशी बोलणारी तू….
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं,
अर्धवट झोपेतली तू
आणि तुला झुलवणार तुझं स्वप्न,
निरागसतेच्या एका नाजुके सारखं…..
कळत कस नाही तुला वेडे
स्वप्नांना प्रकाशाचा शाप असतो..
त्यांना निळ्या आकाशाचा धाक असतो..
हात नको लावूस… ती विरघळुन जातात
कापराचे बोचरे क्षण… हातात येतात..!!!!
वा-याचा आकार आणि पा-याचं रूप
काय काय बघायचं ग….
तुझी नंतरची तडफ़ड नाही बघवत
हुरहुर लागते मनाला..
पण छान दिसतेस तेव्हाही,
वाहुन गेलेल्या वा-याला पकडताना…..
खरच,
खुप छान वाटतं...♥

प्रेम..


आरोप


आरोप असा तिचा कि मी लाधला नाही तिच्यावर
आठवणीच ओझे घेतले होते मी खांद्यावर...

दिसली होती सावली पण माझा विश्वास नवता डोळ्यावर
जिंकून हि हरलो आज प्रेम नावाच्या डावावर...

क्षणभर असच वाटल तुझी हाक ऐकू येईल कानावर
वळून पाहत होतो पुन्हा पुन्हा त्या विरहाच्या वळणावर...

बोलली होतीस तूच सये विश्वास आहे तुझ्यावर
दिलीस एक जखम नवीन माझ्या काळजावर....

आता जगायचं तरी कस माझ जगण्यालाच अर्थ नसल्यावर
मागे वळणे शक्य नाही आता पुन्हा ओळखीच्या रस्त्यावर.....