कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, November 26, 2011

काहीं चारोळया 4

वाट पाहता पाहता तुझी ,

संध्याकाळ ही टळुन गेली.

तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,

पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ...



... ... तू सोबत असली की ,

मला माझाही आधार लागत नाही.

तू फक्त नेहमी सोबत रहा ,

मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..




तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,

क्षनाक्षनाला मरने होय.

डोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,

मनातल्या मनात रडने होय ....



खुप वेळेस तुझ्या आठवणी ,

पाउल न वाजवताच येतात.

आणि जाताना मात्र ,

माझ्या मनाला पाउल जोडून जातात.




तुझा नाजुक असा चेहरा ,

डोळ्यासमोरून हलत नाही.

जसा अंधारात पेटत्या ज्योतीला,

प्रकाश सोडून जात नाही..

No comments: