कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, November 1, 2011

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
... आठवणींचा हिरवा पान,थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
मी अस्वस्थ, तू गाफील,
माझ्या मनाची सतार, तुझी हुकमी मेहफिल,
त्यातच एक तार, झंकारते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते तुझ्यासाठी....
आभाळातल्या चंद्रला लाटांची ओढ,
तुजवीण अपुरी मज कवितेची ओंळ,
मी कण कण संपताना.. पुन्हा घडते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते तुझ्यासाठी....
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी..!!

No comments: