कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, November 22, 2011

ओढ


ही ओढ कसली लागलीये मला
हे मला न उमजे
सांग सखे या ओढीलाच सगळे
प्रेम का समजे


तुझा सहवासाच्या क्षणात रमावेसे वाटते
हॄदयात मझ्या तुझीच साठवण
मझ्या मनाची गुंतागुंत वाढवत राहते
व्याकुळ करते तुझीच आठवण


बस आता नाही सहन होत दुरावा
सखे सोड आता तरी हा अबोला
येवुन विरघळ मझ्या मीठीत
सामवून घेईल माझ्यातच तुजला


उघड्या डोळ्यांसमोर माझ्या
तुझ्याच आठवणींचा पडदा पडतो
जगाचा विसर पडतो मला
असा तुझ्यातच कसा मी गुंततो


कसली ओढ लागलीये मला
तशीच ओढ लगलीये काग तुला
सांग सखे आज तु मला
विरह नाही ना सहन होत तुला

No comments: