पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजले कि तुझी आठवण येते,
चिंब पाऊसात मी तुझ्या बरोबर
भिजायची
छत्री असूनही ती बंद असायची
चिखलात तू मुद्दाम चालायाचास
मी ओरडेन तुला ही वाट पहायाचास
वाटेतल्या स्टॉल वर चहा पीत असायचो
आपण तेव्हा किती गप्पा मारायचो
मला मात्र खूप राग यायचचा
कारण पाऊसात तू खूपच भिजायचं
भिजून तू आजारी पडू नये
ही भीती वाटायची
तुला काही होऊ नये हीच
काळजी असायची
जोरात पाऊस
आला कि आजही तुझी काळजी वाटते
तू भिजत तर नाही ना म्हणून मनास
भीती वाटते
पाऊस आला कि भिजावेसे वाटते
पण भिजले कि तुझी आठवण येते,
पाऊस आला कि भिजावेसे वाटते...





No comments:
Post a Comment