काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये
इजा हा शब्द तसा
प्रेमिकांसाठी नवा नाही,
प्रेमाने दिलेल्या जखमेवर
प्रेमासारखी दवा नाही..!!
खुपदा मनात असूनही
मनसोक्त रडता येत नसतं,
लाल होणाऱ्या डोळ्यांना
नेहमीच साजेस उत्तर नसतं...
काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी...
पहिल्या प्रेमाची अशी शिक्षा का मिळावी ,
भर पावसात अशी व्यथा का व्हावी ,
हाथ पुढे करावा पहिल्या थेंबा साठी ,
अन हाती नेमकी वीज का पाडावी........
" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."
दुनियेच्या रीतीने चालन सोप न्हवत ...
दु:ख मनात ठेऊन हसन सोप न्हवत ..
मनातले भाव लपवले असले तरी,..
डोळ्यातील अश्रू लपवण सोप न्हवत...





No comments:
Post a Comment