रोज bye म्हणते
पण माहित असते कि भेट पुन्हा आहे
सवांद पुन्हा आहे
जुन्या अर्ध्या गोष्टी पूर्ण करणे अजून बाकी आहे
पुन्हा नव्याने ओळख होणे बाकी आहे
...
निरोप देण्याआधी पुन्हा भेटण्याचे वचन मी घेते
पुन्हा माझ्या त्याच प्रश्नाचे अर्धे उत्तर मी मागते
नवीन भविष्याची स्वप्ने मी पाहते
तू परत येशील म्हणून वाट मी पाहते
तसे हे जीवन क्षणभंगुर आहे
क्षणाने आयुष्य बदलते हे सत्य पण जाणून आहे
तरी आयुष्याची स्वप्ने मी मनात विणते
ते साकारण्याचे प्रयत्न मी करते
अशी कधी वेळ येवू नये
कि कायमचा निरोप द्यावा लागेल
हसता हसता डोळ्यात पाणी तरळेल
पुन्हा भेटण्याची संधी न येईन
अधुरे स्वप्न, अधुर्या गोष्टी
अधुरी कहाणी कायम अधुरी राहीन
आणि परत मी bye कधीच नाही म्हणेन......
No comments:
Post a Comment