कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, December 19, 2011

जीवन हे असेच का असते?



रित्या या जीवनात कोणी कोणाचे नसते
माझे माझे म्हणता सर्व भ्रांतीचे ओझे असते
जीवन हे असेच का असते?

नात्याची वीण घट्ट झालेली असते
कधी कधी विरहाने पाणी डोळ्यात येते
जीवन हे असेच का असते?

आपले असते तेच आपल्यापासून दूर जाते
हरवलेल्या क्षणांची आठवण करून देते
जीवन हे असेच का असते ?

सकाळी फुललेले फुल झाडावर सुंदर दिसते
संध्याकाळी ते हळुवारपणे कोमेजून जाते
जीवन हे असेच का असते?

दोन किनार्यांची जोड करणारी एक वाट असते
त्या किनार्याना दूर ती एक लाटच करते
जीवन हे असेच का असते?

घरट्यामध्ये राहून पिल्लांनी मोठे व्हायचे असते
पंख फुटल्यावर घरटे सोडून उडून जायचे असते
जीवन हे असेच का असते?

मदत करणारे, पाठींबा देणारे सर्व आपले भासते
आधाराची आशा कमी झाल्यावर मन त्यांना दूर लोटते
जीवन हे असेच का असते?

नको नको म्हणता थोडा स्वार्थही मनात असतो
ओतप्रोत मिळूनसुद्धा मनात मात्र दुखी असतो
जीवन हे असेच का असते?
आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ
नकोस.........

No comments: