कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, December 24, 2011

मन


तेव्हा आपण विचारतो मनाला
का जीव लावला त्याला 
ज्याच्या साठी पूर्ण जग आपण विसरतो 
त्याच्याच आठवणीच्या राज्यात आपणच परके असतो 


का मनाचा गुंता सुटत नाही?
माहित असते त्या वाटेला जायचे नाही 
पण तिथेच भरकटल्याशिवाय मन हि राहत नाही 


का कधी तेव्हाच पाऊस बरसतो, जेव्हा त्याची गरज नसते 
कितीही त्याने भिजवले तरी मन मात्र तेव्हा कोरडेच राहते 


का अपेक्षांची पुरती तेव्हा होते ,जेव्हा त्याची आस कमी होते
हट्ट करून मिळवलेली गोष्ट, नंतर का पस्तावा देते 


का त्याने दिलेले गुलाबाचे फुल आपण डायरीत ठेवून सुकवतो
त्याच्या आठवणी विसरायच्यात म्हणतो 
आणि वारंवार तीच डायरी उघडून त्या आठवणी ताज्या करतो 


मनाचे खेळ मनालाच माहित नाही 
काय हवे आपल्याला तेही कळत नाही 
जेव्हा दूर असते तेव्हा त्याचा हव्यास वाटतो 
आणि जेव्हा मिळते तेव्हा इतकी काही गरज नव्हती असे सांगतो.....


का आपण असे वागतो.....

No comments: