कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, December 3, 2011

एकदा ती बसमध्ये अचानक दिसली


एकदा ती बसमध्ये अचानक दिसली
मित्राने ओळख करून दिली
मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू?
तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू?
काय सांगणार आता हिला,


एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला
चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस"
काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही,


हा, तर ती बस मधली मुलगी
आताही माझ्याच कॉलेजात होती
सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती
राज की बात, मला ती आवडली होती.


मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला
वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या
दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या
देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला,


बघता बघता दोन वर्षे अशीच सरली
तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली
कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या
कोमल हृदयात माझ्या, हाय! , 
आठवणी मात्र राहिल्या,


जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती
तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता
गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला
तिच्या दर्शनासाठी हा (******) पार तरसून गेला.

No comments: