कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, January 3, 2012

विचार....

स्वत: शी वागताना डोक्याचा वापर करावा, इतरांशी वागताना हृदयाचा वापर करावा.


दिवस हे इवल्याशा पाखराप्रमाणे असतात,
येतात आणि भुर्रकन उडून जातात,
परंतु मागे ठेवतात आठवणींची पिसे
काही काळी,
काही पांढरी,
काही मऊ,
काही खरबरीत,
आपण जमेल तेवढी उचलायची
व त्यांना घेऊन बनवायची एक सुंदर चटई,
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी.. . .



नातं कोणतेही असू द्या...........नात्यात महत्वाचा असतो तो एकमेकावरचा विश्वास.....

एकदा का नात्यांमधला विश्वास उडाला कि आयुष्य रंग उडालेल्या भिंतीसारखं बेरंग बनत.

भिंतीना रंग परत देता येतो पण बेरंग आयुष्यात रंग भरणं खुप कठिण होउन बसतं.



आपल्या आयुष्यात कुणी यावे हे आपले नशीब ठरवते;

पण आपल्या आयुष्यात कुणी थांबावे हे आपले हृदय ठरवते...


आजच्या युगात फक्त २ गोष्टी महत्वाच्या आहेत..

वेळ आणि पैसा

श्रीमंत लोक पैसे खर्च करून वेळ वाचवितात
तर
गरीब लोक वेळ खर्च करून पैसे कमवितात.


आपल्या आयुष्यातील
अश्रू मोजण्यापेक्षा आपण किती हसलो हे मोजा
तसेच
आपले वय मोजण्यापेक्षा आपले खरे मित्र किती हे मोजा.

No comments: