कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, April 14, 2012

टायटॅनिकची 100 वर्षे पूर्ण....

टायटॅनिक जहाजाच्या अपघातास 15
एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्या निमित्ताने जगभर विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जहाजाचा इतिहास व
बुडण्याची कारणे व
शताब्दीच्या तयारीचा आढावा...
टायटॅनिक जहाज
व्हाइट स्टार लाइन कंपनीचे टायटॅनिक हे
तिसरे जहाज. पहिले ऑलिंपिक, दुसरे
ब्रिटानिक आणि तिसरे टायटॅनिक.
टायटॅनिक हे 882 फूट लांब व 104 फूट उंच.
46 हजार 328 टन वजन.
जहाजाच्या निर्मितीसाठी 75 लाख डॉलर
खर्च.
31 मे 1911 रोजी जहाजाचे उद्घाटन. हे
जहाज पाहण्यासाठी सुमारे एक लाख लोक
जमा.
प्रवाशांसाठी काय?
3339 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता.
739 प्रथम वर्गाच्या खोल्या. 674
द्वितीय व 1026 तृतीय वर्गाच्या खोल्या.
900 कर्मचारी.
पंचतारांकित हॉटेलप्रमाणे व्यवस्था. दूरध्वनी,
ग्रंथालय, दुकाने, पोहोण्याचा तलाव,
व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट.
अपघाताच्या दिशेने
समुद्रातील चाचण्या पूर्ण करून टायटॅनिक 4
एप्रिल 1912
रोजी मध्यरात्री ब्रिटनमधील
सद्मटनला पोचले.
10 एप्रिल 1912
रोजी टायटॅनिकचा सद्मटन ते न्यूयॉर्क
प्रवास सुरू. एकूण 1317 प्रवासी व 900
कर्मचारी. मुलांची संख्या 107.
दुपारी 12 च्या सुमारास
निघालेल्या टायटॅनिकची दुसऱ्या जहाजाबरोबर
टक्कर टळली. एक तास उशिराने प्रस्थान.
अटलांटिक महासागरातील ग्रॅंड बॅंक्स ऑफ न्यू
फाऊंडलॅंडच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर
हिमनग
असल्याचा इशारा टायटॅनिकला देण्यात आला.
परंतु टायटॅनिक पूर्ण वेगाने जात होते.
महाकाय जहाजांना हिमनगांपासून
धोका कमी असतो, असे त्या काळी मानले जात
होते. समुद्र शांत असल्याने व आकाशात चंद्र
नसल्याने हिमनग पाहण्यात
कर्मचाऱ्यांना अडचण.
असा झाला अपघात
14 एप्रिल, शनिवारी रात्री 11 वाजून 40
मिनिटांनी जहाजासमोर हिमनग आल्याचे
कर्मचाऱ्याला दिसले. इशाऱ्यानंतर जहाज
वळविण्याचा प्रयत्न.
टायटॅनिकची एक बाजू हिमनगावर आदळली व
अनेक ठिकाणी भोके पडून आत पाणी शिरले.
जहाजात पाणी भरण्याचा वेग प्रचंड वाढला व
जहाज एका बाजूला कलू लागले. पहाटे 2 वाजून
20 मिनिटांनी टायटॅनिक बुडाले.
पाण्याचे तापमान उणे 2 अंश सेल्सिअस. अनेक
जण थंडीने, हृदयविकाराच्या झटक्याने
किंवा बुडून मरण पावले.
1517 प्रवासी मृत्युमुखी. 710
लोकांना वाचविण्यात त्यांना यश आले.
अपघातानंतर
"टायटॅनिक'वर लाइफजॅकेट्स व जीवरक्षण
होड्यांची संख्या अपुरी होती, हिमनगाचे
इशारे मिळूनही कॅप्टन स्मिथ यांनी दुर्लक्ष केले
आणि धोकादायक भागात वेगाने जहाज नेल्याने
अपघात झाल्याचा निष्कर्ष.
या दुर्घटनेनंतर बिनतारी संदेश यंत्रणा 24
तास सुरू ठेवणे, उत्तर अटलांटिक महासागरात
हिमनगांच्या स्थितीचे निरीक्षण
करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गस्त
घालण्याचा निर्णय.
साहित्य, चित्रपटही
1958 मध्ये "अ नाइट टु रिमेंबर'
हा चित्रपट.
1997 मध्ये "टायटॅनिक' हा चित्रपट आला.
चित्रपटाने 1.8 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला.
हाच चित्रपट आता "3 डी'मध्ये.
शंभरीनिमित्तचे उपक्रम..
टायटॅनिक प्रथम पाण्यात 31 मे 1911
रोजी उतरले, त्यानिमित्त 31 मे 2011
रोजी रात्री 12 वाजून 13
मिनिटांनी बेलफास्ट येथून एक फटाका हवेत
उडविण्यात आला. या दिवशी बेलफास्ट
बंदरावरील सर्व जहाजांनी हॉर्न वाजवून
टायटॅनिकची आठवण जागविली.
10 एप्रिल 2012 रोजी लंडनमध्ये रॉयल
फिलारमोनिक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम.
"बालमोरल' हे जहाज माइल्स मॉर्गन
यांनी घेतले असून, "टायटॅनिक'चा प्रवास
ज्या मार्गाने झाला त्या मार्गाने हे जहाज
प्रवास करणार. 15 एप्रिल 2012 रोजी हे
जहाज "टायटॅनिक' बुडाले
त्या ठिकाणी पोचेल.

No comments: