कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, September 22, 2012

एक विचार



एक विचार असाच मनात आला..... जर....,
मनाला दार असते तर.

खरच मनाला दार असते तर
एखाद्याला आत घ्यायचे कि नाही हे ठरवता आले असते
नको ते विचार मनातून काढून टाकता आले असते
मनाला हसवणाऱ्या क्षणांना कुलुपबंद करता आले असते

खरच मनाला दार असते तर
आयुष्यातून जाणाऱ्या व्यक्ती च्या आठवणींना पण काढले असते
आज हातात काही नसताना,
मनाला उद्याची स्वप्न पाहण्यापासून लांबच ठेवले असते

खरच मनाला दार असते तर
नाजुकशा त्या मनाला सगळ्यांपासून वाचवून ठेवले असते
दुसर्यांच्या मनाला जपतो तसं आपल्याही मनाला जपता आले असते
दाराला कुलूप लावून मनाला जगापासून लपवले असते
अनुभवातलं शहाणपण न देता, फक्त निरागस ठेवले असते!!!!

एक विचार असाच मनात आला..... जर....,
मनाला दार असते तर

हरवलो असा मी कसा,


हरवलो असा मी कसा,
कुठेच काही मागमुस का नाही??
शोधतो वाट चाललो ती,
कुठेच एकही पाऊलखुण का नाही??
क्षितिजावर रक्ताळ शाई जरी,
कुठेच मावळतीचा भाव का नाही??
छाताडावर वेदनांचा नाच तो,
कुठेच ताजा घाव का नाही??
एकटाच उरलो रणावरी,
कुठेच जिंकण्याचा उन्माद का नाही??
जिवंतच जळतो सरणावरी,
कुठेच पावसाचा उच्छाद का नाही??
मागण्याचा हट्ट पुराणा,
कुठेच देणारा कर्ण का नाही??
लुबाडण्याचा नाद आजन्म,
कुठेच स्वार्थ पुर्ण का नाही??
काळाकुट्ट काळोख रात्रीचा,
कुठेच कसा काजवा का नाही??
पुन्हा एकदा हरवुदे मला,
कुठेच कसा चकवा का नाही??

गणराज रंगी नाचतो


गणराज रंगी नाचतो, नाचतो,
पायि घागऱ्या करिती रुणुझुणु
नाद स्वर्गि पोचतो !

कटि पीतांबर कसुन भर्जरी
बाल गजानन नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो !

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालहि रंगुन
मृदंग धिमि वाजतो !

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो !

प्रेम


रात्री जागून विचार करणं प्रेम
नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम
असतं..
हातात हात धरुन चालणं प्रेम
नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम
असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम
नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम
असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम
नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम
असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम
नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम
असतं..♥♥

कधी तू…


कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…

कोसळत्या धारा थैमान वारा

बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…
अंग अंग मोहरणारी आसमंत
दरवळणारी रातराणी वेडया जंगलात
कधी तू…
हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू…
रिमझिम
झरणारी बरसात
कधी तू…
कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात
जरी तू…
कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू
मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
 चमचम करणारी चांदण्यात..


Thursday, September 20, 2012

नशीब


नशीबाचा खेळच काही वेगळा असतो
ज्याची असते मनाला आंस
तोच आपल्यापासून दूर असतो
कित्येक प्रयत्न करून देखील त्याच्या सहवासात आपण नसतो
या जीवनात लोक येतात आणि जातात
क्वचितच, ह्या हृदयात प्रेमाचे बीज पेरून जातात
पण प्रेमाचे झाड फुलाचे कि काट्याचे
हे तर ती लोकच ठरवतात
प्रेम - आहे एक मोठा कोडे
जे सुटता सुटत नाही
माणूस पडतो त्याच्या प्रेमात
ज्याला प्रेमाचा प सुधा
कळत नाही
का असे होते, कि ज्याच्यावर
प्रेम केले ती कधी भेटत नाही
हृदयावर कोरली गेलेली तुझी छवी
काही पुसत नाही
या नशीबाचा खेळच काही वेगळा असतो
असतो जो हवा आपल्यायला , तोच नेमकी दूर असतो

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !


सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.


"तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. "

गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !







Tuesday, September 18, 2012

कविता


रोज काहीतरी लिहाव
म्हणून मी वही हाती घेतली
तेंव्हा कळलं मला मन शब्दांच
माझ्या वहीत जागा मिळवण्यासाठी
त्यांच्यात पण चढाओढ चालली…
शब्दांच हे प्रेम पाहून
मी ही भारावलो
एकामागून एक वहीत उतरवत
कविता लिहायला लागलो
कविता कधी पूर्ण झाली
हे कळलंच नाही
वाचून झाल्यावर डोळ्यातल पाणी
त्या ओळींनाही सोसलं नाही
माझी कविता माझं मन असत
वेलांटीने उकाराच चोरलेलं मन असत
काना आणि मात्राच मिलन असत
माझी कविता माझं मन असत
कविता पूर्ण होते
तेंव्हाच मला कळत.

Monday, September 17, 2012

आठवण


आठवण येते तुझी
कुणाला सांगता ही येत नाही
वादळ उठलंय उरात
शांत व्हायला आता
आधार ही सापडत नाही ....

आज ही थांबलोय मी त्या वाटेवर
तू परत येणार या आशेवर
तू सोडून गेलीस मला वा-यावर
तरीही माझा विश्वास आहे मला आपल्या प्रेमावर.

भगवान गौतम बुद्ध


भगवान गौतम बुद्ध उपदेश देण्याकरिता आनंदसोबत एका गावाला चालले होते. रस्त्यात
त्यांनी एक छोटी नदी ओलांडली आणि पुढे गेले. कडकडीत ऊन पडले होते आणि दिवस खूप
गरम होता. थोड्या वेळानंतर भगवान बुद्ध यांना तहान लागली. ते एका वृक्षाखाली
विसावले आणि आनंदला थोड्या वेळापूर्वी ओलांडलेल्या नदीतून पाणी आणायला
सांगितले. तो नदीपर्यंत पोहोचला. त्याने पाहिले की पाणी गढूळ आहे आणि
पिण्यायोग्य नाही. तो परत आला आणि बुद्धांना सांगितले की, पाणी स्वच्छ नाही.
मग भगवान म्हणाले, परत जा आणि पाणी स्वच्छ होईपर्यंत प्रतीक्षा कर.

आनंद परत गेला. तोपर्यंत काही माती खाली तळाला गेली होती. पण, पाणी अजून
अस्वच्छच होते. काही करण्यासाठी नव्हते म्हणून आनंद नदीकाठी ध्यानात बसला.
थोड्या वेळानंतर त्याने डोळे उघडले तर काय बघतो की पाणी अगदी स्वच्छ झालेले
होते. माती पूर्णपणे खाली तळाला गेली होती. आमच्या मनाचेही तसेच आहे. जशी माती
पाण्याला घाण करते तसेच आमचे विचार आमच्या चेतनेला गढूळ करतात. ज्या क्षणी
आम्ही विचारांकडे लक्ष देत नाही, त्यांना महत्त्व देत नाही, आमच्या अंतर्मनात
मौन उतरायला लागते. आम्हाला चेतनेची शुद्ध स्थिती प्राप्त होते. यालाच ध्यान
म्हणतात.

Friday, September 7, 2012

आइनस्टाईन


“प्रेम”


“प्रेम”

प्रेमात पडणं सोप्पं असतं
पण शेवटपर्यंत टिकवणं खूप अवघड असतं....

प्रेमात वचनं देणं सोप्पं असतं
पण ती निभावनं कठीण असतं....

प्रेमात दिवस–रात्र एकमेकांशी बोलणं सोप्पं असतं
पण विरह सहन करणं अशक्य असतं....

प्रेम करणं सोप्पं असतं
पण प्रेम विसरणं शक्य नसतं....

प्रेमात जगण्यासाठी वचनं द्यायची असतात
पण शपथा देवून जीवाला बरं वाईट करून घेवू नकोस
असं म्हणायची वेळ येवून द्यायची नसते....

प्रेम जगण्यासाठी करायचं असतं
आणि प्रेमातच जगायचं असतं....
प्रेमासाठी मरून प्रेमाचा अपमान करायचा नसतो....

प्रेम प्रेम असतं
दोन हृदयानचं अतूट नातं असतं....
एकमेकांना समजून घ्यायचं असतं
आणि एकमेकांबरोबरच जगायचं असतं....

प्रेम प्रेम असतं
प्रेमाचं विश्वच वेगळ असतं
आणि त्या विश्वात एकदातरी जगायचं असतं
पण प्रेम मात्र शेवटपर्यंत जपायचं असतं....!!

आजही पुन्हा तेच झाले,


आजही पुन्हा तेच झाले,
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले,
आजही पुन्हा तेच झाले,
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले.

येताच आठवण तुझी,
मनाला माझ्या खुप सावरले,
तरीही पुन्हा तेच झाले,
सर्व जुने पुन्हा नवे झाले.

कुणी नाही तु माझा,
मनाला माझ्य खुप समजावले,
तरीही पुन्हा तेच झाले,
मन तुझ्याविना उदास झाले.

जगायचे आयुष्य सुखात,
अनेकांनी सांगुन पाहीले,
तरीही पुन्हा तेच झाले,
तुझ्याविना हे आयुष्यच नकोसे झाले...♥♥♥

"एकटे"


दूर जाताच तू
मनी दाटले अश्रू
प्रेमाचे दुख हे
कसे नयनी लपवु

...आठवणीत राहणे
जमेलच असे नाही
विसरणे अश्यक्या आता
कसे तुला समजत नाही

प्रेमाची ती वचने
राहिली आता स्वप्नतच
जगणे फक्ता आता
"एकटे" या सत्यातच

प्रेम मिळणे कठीण
असे लोक माहनतात
प्रेम करून मग
एकटे का सोडून जातात?

Thursday, September 6, 2012

जीवन


जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .

हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा


एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करायचे.मुलगा मुलगी दोघेही मध्यमवर्गीय घरातले होते.एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवते.
तो जेव्हा तिच्या घरी येतो, तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...तो कागद दुसरा तिसरा काही नसुन तिला डॉक्टरांनी दिलेलं एक सर्टिफिकेट असतं ज्यात लिहीलेलं असतं की तिला कॅन्सर झालाय तिच्याजवळ फक्त 16 तासाचा वेळ शिल्लक आहे.ती
त्याच्या चेहर्यावरचे भाव बघण्यास खुप आतुर झालेली असते,पण तो काहीही न बोलता तसाच निघुनजातो.तिला वाटतं की बहुतेक त्याला कळलंय की हे सर्टिफिकेट खोटं आहे.
तो चार तासातच परत येतो आणि तिला म्हणतो,चल आणि पुढचे बारा तास मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचं नाही मी सांगेल तेच करायचं.असं सांगुन तो तिला घेऊन जातो,सकाळच्या नयनरम्य वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव,बाईकवर असतानाचा तो थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खुपच शहारुन गेलेली असते.दोन्ही हात लांब करुन तो वारा कवेत घेण्याचा ती प्रयत्न करत असते.तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ात घेऊन जातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले.थोड्या वेळानंतर तो तिला esselworld मध्ये घेउन गेला.water games,उंचच उंच पाळणे,जलतरण तलाव अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमुन गेली की या जगाचं तिला भानंच नाही राहीलं,तिच्या चेहर्यावरचा ओसंडुन वाहणारा आनंद त्याला खुपच मोहुन जातो.
संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजता तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो,तिने कधीही आधी न पाहीलेला सनसेट पॉईँट तो तिला दाखवतो. ते पाहुन ती हळुच त्याच्या मिठीत विसावते...तिथे दोघेही एकत्र फोटो काढुन घेतात ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणुन स्वतःजवळ ठेवुन देतो.काही वेळानंतर ते शॉपिंगला जातात तिला जे जे आवडतं ते ते सगळं ते दोघे खरेदी करतात तो स्वतःसाठी मात्र काहीही खरेदी करत नाही.रात्र झाली नंतर ते तिच्या घरी जातात.दिवसभरच्य ा मिळालेल्या आनंदाच्या वातावरणातुन ती थोडी बाहेर येते मग ती विचारात पडते की याने इतके पैसे आणले कुठुन?हाच प्रश्न ती त्याला विचारते.तो म्हणतो,तुझ्यासा ठी मी माझं घर विकलं.हे ऐकल्यावर तिचा खुप संताप होतो.आणि ती त्याला म्हणते,अरे पण का विकलंस तु घर?

तोःतुझ्यासाठी।त ुझ्याकडे आयुष्याती फक्त सोळा तास शिल्लक आहेत,जेव्हा हे मला कळलं तेव्हा खरंतर रडावसं वाटत होतं,पण तुझे उरलेले आयुष्य तु फक्त आणि फक्त आनंदाने जगावंस.असं मला वाटत होतं.आणि तो आनंद जर मला तुला द्यायचा झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणुनच मी माझं घर विकलं.आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का?नाही ना हेच तर हवं होतं मला...हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्यालामिठीत घेतलं.
ती म्हणाली,मला माफ कर.. प्लीज मला माफ कर मी तुझी दोषी आहे तु मला सांगशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.
तोःकशाबद्दल?
तीःमी तुझ्याशी खोट्याने वागले.मला कॅँसर वगैर काही झालेला नाही मी तर फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी खोट बोलले,खोट्याने वागले मला माफ कर...
ती खरंच आपल्याला सोडुन जाणार नाही या आनंदाने त्याचे डोळे पाण्याने भरुन आले,घर गमावल्याच्या दुःखापेक्षा प्रेयसीला पुन्हा एकदा मिळवल्याचा आनंद त्याला जास्त होता आणि त्याने तिला माफ केलं.त्यांची मिठी आणखीनच गडद झाली.तो तिला म्हणतो,तु खरंच मला सोडुन जाणार नाहीस ना?नाही रे राजा मी तुला कधीही सोडुन जाणार नाही.
खरंच हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाँत आनंदाचा दिवस आहे.संपुर्ण आयुष्यभर जितकं रडलो नसेन तितकं मी तुला कँसर झालाय ही बातमीऐकल्यापासुन रडलोय.....i m so sorry मी तुझ्याशी पुन्हा असं खोटं बोलणार रे.....its ok पण पुन्हा असली चेष्टा करु नकोस,नाहीतर तुझ्या आधी मीच मृत्युला सामोरं जाईन..तो असं बोलताच तिने त्याच्या तोँडावर हात धरला आणि ते पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले....
मित्रांनो असं म्हणतात की प्रेम जितक्या परीक्षेत पास होत जातं तितका त्यातला गढुळपणा कमी कमी होत जातो आणि त्याचं पावित्र्य वाढत जातं.ही गोष्ट मलाही मान्य आहे पण त्या परीक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात यालाही काहि मर्यादा आहेत की नाही?हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही डोळसपणे निवडलेल्या साथीदारावर डोळेझाकुन विश्वास ठेवा. म्हणजे बघा तोच साथीदार तुमची किती सुरेख साथ निभावतो ते...

  Source  मराठी लव्ह स्टोरीज . . . 

Wednesday, September 5, 2012

मैत्री


मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला..
ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी..
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ..
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे..
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे..♥♥

Saturday, September 1, 2012

फक्त तुलाच पाहायला आवडत...


आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात
रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...

माझ्या काही शब्दांन मोळे,
हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर
रागवायला आवडत...
अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...