कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, January 22, 2013

कदाचित


कदाचित
मी तो नाही ज्याचे स्वप्न
तू बघतेस
पण हे नक्की कि, ती तूच
आहेस जिचे स्वप्न मी बघत
असतो
कदाचित
मी तो नाही ज्याची तू
वाट बघतेस
पण ती तूच आहेस
जिची मी आतुरतने वाट
बघत
असतो
कदाचित
मी तो नाही ज्याच्यावर
तू प्रेम करतेस
पण ती तूच आहेस जिच्यावर
मी अगदी जीवापाड
प्रेम करतो"

गाढव आणि शेतकरी


एके दिवशी एका शेतकर्‍याचं गाढव
शेतातल्या कोरड्या विहिरीत पडलं.जखमी झाल्यामुळे ते
विव्हळतहोतं आणि मोठ्याने ओरडत होतं.लोकं जमा झाले
शेतकरी धावत आला त्याने बराचं विचार केला फार प्रयत्न
केले. त्या गाढवाला त्या विहीरीतून बाहेर काढण्याचे पण
काही करता त्यालाबाहेर काढणे जमत
नव्हते. दिवस
मावळायला आला होताशेतकरीही आता थकला ही होता आणि कंटाळला होता त्याने
विचार केला . 'आता हे गाढव तर असेही म्हातारे झाले आहे
असेही निरुपयोगी आहे आणि ती विहिरही कोरडीचं आहे ...
त्याला बाहेर काढण्या पेक्षा त्याला बुजून द्यावे...
विहीरीत माती लोटावी...
गाढवाचा प्रश्न ही सुटेल
आणि शेतातली ही विहीरही बुजली जाईल.......' मग काय
जमलेल्या सार्‍या लोकांकडून त्याने मदत मागीतली.
आणि सगळे कामाला लागले कुदळ
फावड्यांनी माती टाकायला सुरुवात झाली..... मध्ये
पडलेल्या त्या जखमी गाढवाला काही कळेनासे झाले ...
विहीरीत पडल्याने
शरीराला झालेल्या जखमांची वेदना आणि त्यात भर म्हणजे
आयुष्यभर ज्या मालकाची चाकरी केली
त्याची ओझी वाहीली आज तोचं मालक जिवावर उठला ...
ते दुखाने अजून मोठयाने ओरडू लागले....
वरुन माती पडतचं होती...काही वेळाने
गाढवाचा ओरडण्याचा आवाज थांबला .....सागळ्यांना ­
वाटले गाढवमेलेचं बहुतेक शेतकर्‍याने सहज विहीरीत डोकावून
पाहीले तर तो पहातचं राहीला...अंगावर ची माती झटकत
गाढवउभे राहीले होते...
लोकांनी अजून पटापटा माती टाकणे सुरु केले...परत पाहीले
तर गाढव त्याचा त्याचा मग्न होता तो वरुन
माती पडली की झटकायचा आणि त्या पडलेल्या मातीच्या थरावर
उभा राहीचा ......असं करता करता कोरडीविहीर बरीचं
भरली आणि कठडा जवळ येताचं ते गाढव तो कठडा ओलांडून
बाहेर आले......

तात्पर्य:-
आयुष्यात वेगळे तरी काय होतं ???
आपण खड्यात पडलो तर आपणास
काढायला कोणीतरी एकचं येते पण
आपल्यासाठी खड्डे खणणारे आणि खड्यात
पडल्यावर माती लोटणारे
आपल्याला गाडण्याचाप्रयत् न करणारे बरेचं
भेटतात...
म्हणून स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा.... आपले
डोके नेहमी शांत ठेवा
समस्या कीतीही मोठी असो.... शांत मनाने
ती हाताळा....
खड्ड्यात पडलो आणि कोणी पाडलं ह्या बद्द्ल
दुखः करायपेक्षा
त्यातून बाहेर कसे पडायचे हा विचार करा...
झटका ती माती आणि त्या मातीची एक एक
पायरी करत... हळूहळू करत वरया...

Monday, January 21, 2013

कर्तव्य


एक मुलगा एका कार अपघातात खूप गंभीर
रित्या जखमी होता...

त्या अपघातात आणखी एकजण ठार सुध्दा झाला होता...

वेळीचं मदत मिळाल्याने
या मुलाला लवकर शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात आणण्यात आले होते...

मात्र डॉक्टर जाग्यावर नव्हते,
काही काळानंतर
फोन केल्यानंतर डॉक्टर
आले,
तितक्यात
त्या मुलाची आई एकदम रागात त्या डॉक्टर
कडे पाहत म्हणाली,
तुम्हा डॉक्टर
लोकांना दया नावाची गोष्ट आहे का नाही...

माझ्या मुलाचे किती रक्त गेले
मगापासून,
तुम्ही ­
इतक्या हलगर्जीपणाने
एवढे उशीरा का आलात..??

डॉक्टर म्हणाले आई मला माफ करा,
मला यायला जरा वेळ
लागला मात्र
आता मी आलो आहे...
देवाच्या कृपेने सर्व
ठीक होईल...

ती आई अजून रागाने
म्हणाली तुझ्या माफी मागण्याने माझा मुलगा ठीक होणार नाही,
तू
जावून लवकर
इलाज कर...

डाँक्टराने नर्स ला जवळ बोलावून घेतले
आणि काहीतरी सांगून ते आत ऑपरेशन साठी गेले,
काही वेळाने ते परत आले
आणि त्या बाईला म्हणाले,

आई आता तुमचा मुलगा नक्की ठीक होईल,
थोड्या वेळाने त्याला शुध्द येईल,
तुम्ही भेटू शकता...

आणि डॉक्टर शीघ्र तिथून चालते झाले...

ती बाई त्या नर्स ला म्हणाली,
या डॉक्टर ला एवढी कसली घाई,
जर
माझा मुलगा शुद्धीवर आल्यावर गेले असते
तर काय
बिघडत होते...??

त्यावर नर्स म्हणाली,
बाई तुमच्या मुलाने मागच्या अपघातात
ज्या मुलाला ठार केले आहे तो याचं डॉक्टरचा
मुलगा आहे...

Wednesday, January 16, 2013

संधी


एकदा एका मंदिराच्या पुजार्‍याच्या गावात पूर
येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात.
जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात
तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो,
कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे
आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल.
पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून
जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस
पुजार्‍याच्या घरा जवळून पोहत जात असतो.
तो पुजार्‍याला पाठीवरून वाहून
न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते
नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण
तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलीकोप्टर
येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण
तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं
आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.
तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात
जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे
तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त
असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव
हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक
होडी आणि एक हेलीकोप्टर पाठवलं होतं. तू
दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस."
पुजार्‍याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व
संधी गमावल्या होत्या.

मित्रानो, तुमच्या आयुष्यात अशा असंख्य
संधी येऊन जात असतात पण
त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते.
एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक
चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून ...

योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.

ती...




तिला कधीकधी त्याची आठवण येते,
पावलांना तिच्या, भूतकाळात नेते.
ती डोळे गच्च बंद करून घेते,
पण स्वप्नातही स्वप्न त्याचेच येते....

"कसा असशील तू?" तिला थोडीशी काळजी वाटते ,
कधीकधी नकळत पण डोळ्यांत तिच्या पाणी साठते.
तडजोड कितीही केली मनापासून मान्य तिने...पण...
कितीही केलं,तरी भरून आलं कि आभाळ फाटते.

ती हसते, मग जग फसते...
तिच्या मनात काहीच नसूनही खूप काही असते,
मनातली ठिणगी 'कधी' पाण्याने विझते?
आतून जागी अन ती डोळ्यांनी निझते.

पानिपत


पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्‍या लुटारुंशी लढले नाहीत.
हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले.
"लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ...!!" तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे,मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही..

Wednesday, January 2, 2013

ब्रेक अप झाल्यावर...


ब्रेक अप झाल्यावर...
ब्रेक अप झाल्यावर ना ...
काय नाय रे.....
सकाळी तीच स्वप्न बघत उठायचं ...
उठल्या उठल्या मोबाईल हातात
घ्यायचा...
आजतरी तिचा मेसेज आलाय का..
नाही..
ब्रेक फास्ट करताना.. तिचाच विचार
करायचा....
"लग्न झाल्यावर रोज सकाळी कांदेपोहेच
घालेन
खायला"
हे हे... हे आठवून निमुटपणे चपाती घश्यात
घालायची
तिने"बी एफ झाला का रे?" अस नक्कीच
विचारल
असणार..
परत मोबाईल घ्यायचा .. मेसेजआलाय
का ...
नाही....
ऑफिस ला निघायचं....
रस्त्यात कोणी सुंदर मुलगी दिसली..
कि तिलाच आठवायचं..
प्रत्तेक येणा-जाणाऱ्या कपल्स मध्ये
स्वतःला आणि तिला बघायचं
तेवढ्यात मोबाईल वायब्रेट होणार....
"ऑफिस ला निघालास का रे?...."मेसेज
असेल
तिचा...-_-
मोबाईल घ्यायचा...तिचाच मेसेज आलाय
का?
नाही.....
दुपारी... संध्याकाळी... असाच मोबाईल
चेक करत
बसायचं...
फोन तर उचलत नाही ... निदान मेसेज
तरी करेल...
या खोट्या आशेवर पूर्ण
दिवसमोबाईलशीच नात
जोडायचं...
एकच प्रश्न स्वतःला....तिचा चमेसेज
आलाय का?
एकच उत्तर स्वतःला... नाही.....
रात्री ऑफ लाईन जायची वेळ आली...
कि न राहून
तिला हाय करायचं...
थोडा वेळ रिप्लाय ची वाट बघायची....
आणि निघून जायचं..
आजचा पूर्ण दिवस... आणि ब्रेक अप आधीचे
दिवस
आठवायचे...
आणि हळू हळू डोळे ओले करायला सुरुवात
करायची.....
मग ओल्या डोळ्यानीच
स्वतःच्या नशिबाला दोष
द्यायचा....
आणि मनातच... उत्तराची अपेक्षा न
करता.....
स्वतःला २ देवाला २ आणि तिला २
प्रश्न
करायचे....
सर्व झाल... कि एका हाताने
उशी किती ओली झाली
याचा वेद घ्यायचा..
उशी उलटीकरायची...
आणि परत तिलाच आठवून स्वप्नबघत झोपून
जायचं....
कारण उद्या सकाळी तिचा मेसेज येणार
आहे ना.....
असच करायचं रोज....
साला....
ब्रेक अप नंतर तिची आठवण काढून
रडण्यात
आणि रडवी गाणी ऐकण्यात एक वेगळीच
मजा असते.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!