कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, October 31, 2011

फसवले मी तुला

आज मला तुझी माफी मागायचीय,
कारण तुला माझी एक गोष्ट सांगायचीय,
रागवू नको हा.....चुकून चुकलोय मी,
...
खूप हिम्मत जमवून तुला आज माझी ती चूक सांगायचीय.
कधी कधी ना मला तुझी खूप आठवण यायची,
मी रडलो ना कि मग....ती माज्यासोबत रडायची,
तुला नाही कळले ना??पण तिला माझी प्रत्तेक गोष्ट कळायची,
"का" रडतोय मी हे तिला सांगायची गरजच नाही पडायची.


चालताना कुणीतरी मधेच हात सोडले,
स्वप्नातल्या भातुकलीचे घरही मोडले,
फसवायचे नव्हते ग तुला..पण सगळेच...
एकदम अचानक घडले,
आधार दिला तिने...मग एकटे मन "तिच्या" प्रेमात पडले.

तिने माझं सुख हि पाहिलंय,
तिने माझं दु:ख हि पाहिलंय,
पण सगळं सांगूनही सगळं सांगायचं राहिलंय

तिच्या मिठीत ही मायेची उब आहे,
तिचे प्रेमही खूप अन जिव्हाळाही खूप आहे,
माफ कर मला.."तिच्यासोबत मी खूप सुखात आहे"
पण तिच्यासोबत असलो तरी तुझ्या आठवणी मुखात आहे.

No comments: