पुन्हा एकदा परत ये ,
आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ,
जर
कधी आठवण आलीच माझी ,
तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये ,
त्रास होयील मला
थोडा या उचकीचा ,
पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये ,
कदाचित जमणार
नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,
पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करायला
फक्त एकदाच ये ,
सोबत मिळाली आहे तुलाही तुझ्या नवीन संसाराची ,
पण असेलच
ना माझ्याकरिता पण देवाने सातजल्मासाठी बांधलेली कुणी ...
जरी बांधलो गेलो
असलो आपण सातजन्मासाठी,
तरी आठवा जन्म घेऊन फक्त माझ्यासाठीच ये ,
कदाचित
म्हणशील हि पुन्हा मला अजून हि तू वेडाच आहेस,
पण अर्धवट आहे प्रेम अजून आपल ,ते
पूर्ण करायला फक्त एकदाच ये....
No comments:
Post a Comment