कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, December 6, 2011

विचार...


जो त्याग केल्या मुळे त्याची आठवणही मागे रहात नाही, मग रुखरुख तर दूरच तेवढीच आपली शक्ती समजावी...



'पुरूषांच लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते, आणि त्याला मुल झालं म्हणजे बायको दुरावते.'..



स्वरांच्या निकट राहणारा कलावंत एरवीही एखाद्या स्वराइतका कोमल असावा.त्याने मैफिलीत बेसूर आणि मैफिलीबाहेर असुर नसावा....

                            .....................व.पु. काळे





विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा,
झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची
किंमत स्वत:च निर्माण करा!!


आयुष्याच्या एका वळणावर जरी तुम्ही हरलात तरी आयुष्य चालत राहते ते थांबत नाही, कारण ते नेहमी सांगते कि पुढे जा हा तुझा शेवट नाही....आणि प्रयत्नात सातत्य असेल तर हरून हरून किती दिवस हरणार एक दिवस तरी तुमच्या विजयाचा उजाडेलच!!

No comments: