कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, February 15, 2012

Valentine's Day Special 'Love Story'

ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता.
ती त्याच्यासोबत होती. त्याने
तिचा हात पकडला होता. अचानक
तिचा हात निसटला...
त्याच्या हातातून...
खूप गर्दी होती.. त्याच्या थोड्यावेळाने
लक्षात आला कि तिचा हात
सुटला आपल्या हातातून.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे
तिला शोधू लागला. त्याला काही सुचेचना.
घाम फुटायला लागला होता. इतक्यात
त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात
दिसली.
एक लोकेट बघत होती. तो त्या दुकानात
आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला,
ती वळून म्हणाली,"छान आहे ना??"
आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं,
त्याचे डोळे पाणावले होते.
तिने विचारलं, "काय झालं?"
त्याने तिला आवेगाने हग केलं,
आणि लगेच सावरून म्हणाला,"
तुला आवडली आहे का ती चेन?"
ती म्हणाली," हो, खूप."
तो म्हणाला," मग हि तुला माझ्याकडून
गिफ्ट." "कसलं गिफ्ट? अरे माझा वाढदिवस
खूप दूर आहे अजून."
तो म्हणाला," हे
माझा पहीला valentine गिफ्ट तुला."
ती म्हणाली," are you proposing me
"
तो म्हणाला," हो, कारण आज
जेव्हा तुझा हात माझ्याहातून
सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय
किती incomplete आहे मी..
प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस,
मी... मी.."
ती लगेच म्हणाली," नाही जाणार.कधीच
नाही...... नेहमी तुझ्या सोबत राहील,
शेवटच्या क्षणापर्यंत..."

Wednesday, February 8, 2012

प्रेम मरणातूनही उरे...!

एक होते आटपाट नगर
त्यात होता देखणा चिमणा
सातासमुद्रापलीकडे जायचेच
हा असे त्याचा बाणा...

होता तो हुशार मोठा
अढळ होता त्याचा निर्धार
केली त्याने दरमजल
पोहोचला सातासमुद्रापार

स्वर्ग उरला दोन बोटे
सरू लागला सुखद काळ
तिथेही त्याने कीर्ती मिळवली
सोडला न कधी ताळ

एके दिवशी अजब घडले
चिमणा प्रेमात पडला
निसर्गाची जादूच न्यारी
त्याने सांगावा धाडला..

परदेशी पडू नये प्रेमात
साधा नियम तो विसरला
प्रेम होईल का सफ़ल??
विचारही नाही मनास शिवला..

चिमणी होती साधी मोठी
प्रेमातील भेद तिला न ज्ञात
चिमणा रंगून सांगी तिला
काय आहे आटपाट नगरात...

एक दिवस असा उजाडला
परतण्याची वेळ आली
मी ही येणार संगतीने
चिमणी हट्ट धरून बसली

तिचे मन मोडवेना
मायदेशाची आठवण सोडवेना
तो म्हणाला,"बरं चल..!"
तिचा आनंद गगनात मावेना...

निघाले दोघे जोडीने
अंतर पडले धावणीला
समोर अथांग सागर
चिमणीला प्रवास सोसवेना

नाजूक साजूक कुडी तिची
पार थकून गळून गेली
"थांब की रे...किती वेगाने??"
म्हणून चिमण्याला थांबवू पाही..

नाजूक माझी राणी ती
म्हणत चिमणाही थांबला
दूरवर पाहून जहाज एक
त्यावर थांबायचे विचार ठरला

जहाजापर्यंतची अंतरही
चिमणीकडून संपता संपेना
खुरडत खुरडत कण्हत शेवटी
चिमणीचा पाय जहाजाला टेकला..

इथेच थांबू काही दिवस
घे जरा विश्रांती राणी..
गोंजारत त्याने चिमणीची
धाप जरा सुमारली

पण थकवा काही हटेना
चिमणी खंगत चालली
हवा तिला सोसवेना
ती झुरत चालली...

तू निघून जा पुढे
चिमणी सांगे चिमण्याला
चिमणा म्हणे,"जाऊ तर एकत्रच.."
तुझ्याशिवाय काय अर्थ जगण्याला?

दिवसामागून दिवस गेले
चिमणा चिमणी खंगत चालले
एके दिवशी जहाजावरच्यांना
त्या दोघांचे मृतदेहच सापडले..

प्रयत्न करूनही दोघांना
वेगळे करता आले नाही..
मेल्यावरही जणू दोघांनी
एकमेकांची साथ सोडली नाही

त्या दोघांचे काय करायचे..?
दिले समुद्रात फ़ेकून
समुद्रतळाशी घेताएत
चिरशांती दोघे मिळून

कळली असती प्रेमकथा त्यांची
तर गहिवरले असते सारे
समाधी बांधली असती सुंदर त्यांची
म्हणत.."प्रेम मरणातूनही उरे...!"

Sunday, February 5, 2012

याक्षणी आठवतेस तू...

न चुकता करावा तुला फोन
मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...
याक्षणी आठवतेस तू...

फोन हाती घेतल्यावर बघावा
तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा...
याक्षणी आठवतेस तू...

एखाद्या दिवशी पहावी वाट
करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तू...

तुझं नेहमीच खट्याळ बोलणं
माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं...
याक्षणी आठवतेस तू...

तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट
माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं...
याक्षणी आठवतेस तू...

मित्र म्हणून काय नाही केलस तू
माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तू...

नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं
माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तू...

डोळ्यातील अश्रूही थाबेना आज
रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तू...

Friday, February 3, 2012

प्रेम काय असतं

ठरवलं होत प्रेम कधी करायचं नाही
वेड्या भावविश्वात गुंतून बसायचं नाही
कोण तो कुठला त्याच्यासाठी झुरायचं नाही
त्याच्यासाठी आपली स्वप्ने तोडायची नाहीत,

... सगळी स्वप्ने सगळे बोल आज खोटे ठरले
कशी कोणास ठाऊक प्रेमाच्या बंधनात गुंतत गेले
तो माझा अन मी त्याची हे कळू लागले
माझेच बोल मला नकळत आठवू लागले,

मी हि आज इतरांसारखीच झाले
रात्र न- दिवस त्याची वाट पाहणे हवे-हवेसे झाले
त्याचे ते लडिवाळ शब्द ऐकण्यास
आज मी चातकाप्रमाणे आतुर झाले,

कोणाच्यातरी येण्याने आयुष्य बदलून गेले
माझ सार विश्वच त्याच्यात दिसू लागले
जगूनसुद्धा क्षणा-क्षणाला कोणासाठी तरी मरण
यातील नाजूक भाव कळू लागले,

खरच मी पण आता कोणावर तरी प्रेम करू लागले
कोणाचातरी सतत विचार करणं
मलाही आता जमू लागल
प्रेम काय असतं हे मला कळू लागले ...

किती छान असतं ना ?

किती छान असतं
ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच !किती छान असतं ना
... आपण कुणालातरी आवडणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपलं हसणं काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपल्या फोनची तासनतास वाट पाहणं,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं....... !

मलाही वाटायचं....

मलाही वाटायचं....
तुझं माझ्यावर प्रेम असावं
तुझ्या डोळ्यात मला ते दिसावं.
तुझ्याबरोबर खुप काही बोलावं
मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहावं,

मलाही वाटायचं...
तु मला जवळ घ्यावं
मिठी मारून घट्ट धरावं
तुझ्या मिठीत सर्व विसरावं
अन फक्त तुलाच आठवावं,

मलाही वाटायचं....
मलाही वाटायचं तुझ्याबरोबर भांडावं
अन मग भांडण मिटवुन गोड बोलावं
तुझ्या सुखात सामील होऊन जावं
मग त्याहीपेक्षा तुला खुप खुप सुख द्यावं

मलाही वाटायचं....
तुझ्या दु:खात तुझ्याबरोबर रडावं,
मग ते माझ्यावर घेऊन परत तुला हसवावं
तुझ्याबरोबर एकत्र बसून जेवावं..
अन जेवण माझ्या हातानं भरवावं

मलाही वाटायचं....
तुझ्यासोबत माझं नाव जोडलं जावं
अन ते नाव सगळ्यांनी एकत्र घ्यावं
तुझा हात पकडून तुला घरी सोडायला यावं
अन तु गेलास की तोच हात हातात घेऊन परत यावं ..

मलाही वाटायचं....
आजही मी तुझ्यावर येऊन अडते ,
तुझ्या आठवणीने रडु आलं की अश्रू अडवुन धरते ,
तोल चुकला की स्वत:ला सावरायचा प्रयत्न करते,
तु तर जीव घेऊन निघुन गेलास ,
पण आजही जीव जाऊन रोज अशीच जगण्याचा प्रयत्न करते....

Thursday, February 2, 2012

कलियुग



समुद्र किनाऱ्यावर छोटे बहिण भाऊ वाळूचं घर बनवण्यात मग्न होते...

" थांब दादा असं नाही...... इथे आपण गाडी ठेवायची. " त्यांचा खेळ कल्पना पाहताना त्यांच्या आईला फार बर वाटत होत.
... ...
" आई बघ हं, ही रूम माझी, ही ताई ची, आणि ही तुझी. किती छान आहे ना आपलं घर? " आपण बनवलेलं घर आपल्या आईला कौतुकाने दाखवत मुलगा म्हणाला.
इतक्यात त्याचे बाबा मुलांसाठी आईस क्रीम घेऊन आले, आणि विचारलं " आणि माझी रूम रे? मी कुठे राहायचं? "

निरागसपणे त्या छोट्या जीवांनी उत्तर दिलं, " बाबा तुम्हाला कशाला हवीये रूम? तुम्ही कसं आजोबांना वृद्धाश्रमात पाठवलंत, आम्ही पण तुम्हाला पाठवणार. बाबा म्हातारे झाले कि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात ना? "

हे ऐकून त्या बापाला आपल्या केलेल्या कर्माची फळ दिसू लागली....................
विचार चक्र जोरात फिरू लागलं....... ' हे आपण काय शिकवलं?'
विचार चक्राची गती वाढत गेली आणि तो बाप चक्कर येऊन तिथेच थंड पडला.

अजून तीच मन काही......वळलं नाही

काल तिच्या सोबत चालत होतो....
चालता चालता बोलत होतो .....
बोलता बोलता रस्ता काही संपला कळलं नाही......
अजून तीच मन काही......वळलं नाही ......

नवीन बुटामुळे पाय दुखत होते
चालता चालता हाडाला खुपत होते
तिच्या आनंदात पायाचे दुखणे कळलेंच नाही
अजून तीच मन काही......वळलं नाही ......

काल खूप खुश होती ....म्हणाली मजा आली
आज का तू थांबलास... माझ्यासाठी....
का थांबलो ....तिला काय हे कळलेच नाही....?
अजून तीच मन काही......वळलं नाही ......

हॉटेलात गेलो...... खूप खाल्लं
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळल.
का तिने इतका वेळ घालवला....तिला काय हे कळलेच नाही
अजून तीच मन काही......वळलं नाही ......

मग असेच चालत राहिलो रस्त्यावर..
घर तिचे जवळ येउच नये आसे वाटत राहिलं..
बसस्टोप येताच मी थांबलो
तेव्हा डोळ्यात तिच्या मी .....आनंदाचे क्षण पहिले

काही क्षण स्तब्ध झालो आम्ही.....
एकमेकांना टाटा बायबाय नाही म्हणलो आम्ही.
कोणास ठाऊक ....का ते कळले नाही..
अजून तीच मन काही......वळलं नाही ......

एक लव स्टोरी …

तो. . . वय २५...
तसा मुळचा मुंबईचा
पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा

ती वय २२
नृत्य शिकायची
आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची,

तिचा नकार .........
पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात....
आज हि तिच्या पाठी
ती घराजवळ पोहोचते
पाठीमागून तो येतच असतो...
शेवटी हतबल होऊन ती.....

तुला नक्की हवंय तरी काय?
तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं हवंय तरी काय ...
माझ लग्न ठरलंय निर्णय झालाय...
तू आनंदी आहेस? नक्की....?
हुम्म्म ती होकारार्थी मान हलवते...

मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात...
त्यांचा गैरसमज....
आणि

डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो...
गालावरचा हात तसाच राहतो...
बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे हि नजरे आड होतात...
तिला अखेरच बघत...
तो नाहीसा होतो...

अंधार पडू लागतो..........
रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते...
अंगावर येणारा प्रकाश...
एक निमिष...
आणि मग सर्वत्र अंधार...

दोन महिने उलटतात.....
फासे हळू हळू पालटू लागतात.....
दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेय....
तिलाही कळत नाहीय अस का होतंय .................
त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती...
आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही ...
कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता ..
जीवच काही बर वाईट तर करून नाही ना घेतलं... ती फार बैचेन झाली.....
शेवटी जोश्यांकडे पोहोचते....
त्याचा मोठा अपघात झाल्याच कळत...
ती त्याचा नंबर घेते ...
घाबरत घाबरत त्याला फोन लावते...
रिंग वाजते.... फोनही उचलला जातो...
तो तिचा आवाज ओळखतो...
ती रडत असते....
रडत रडत बोलत असते....

त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात...
धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात...

तो काहीच बोलत नाही...
दोघेही भावनाविवश होतात....
तो फोन ठेऊन देतो...
ती फोनकडे बघत राहते...
तो बोलला का नाही..

दोन दिवसावर लग्न.....
आता तिला सगळ असह्य होत चाललंय..
त्याला भेटण गरजेच आहे कोणत्याही परिस्थितीत...
ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते...
त्याच्या घरी पोहोचते...
तो आत्ताच पुण्याला निघाल्याच कळत...
तातडीने पुण्याची वाल्व्हो पकडते....
सीट जवळ येते..
आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही...
तो समोर असतो,
काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात .....

तो एक कागद घेतो....
त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो...

"हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक,
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक,
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द,
कळतील तुला का ते बोल निशब्द,"

भान हरपते

कंठातील शब्द कंठात कोच्णार का.........?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...........?

कागद निसटतो ..

आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत पुढच्या मार्गाला लागतात....
मित्रानो
प्रेम हि भावना...
स्वर्ग हि जिच्या समोर जणू काहीच भासत नाही ..

Wednesday, February 1, 2012

जन्मठेपेची शिक्षा

एकदा मला सुटायचंय
श्वासांच्या कैदेतून
नात्यांच्या बेड्यातून
शरीराच्या तुरुंगातून

अजून किती काळ आहे हि
पिळवणूक
कोणत्या गुन्ह्याची शिक्षा
न कळले आजवर

कधी सुख मवाळ वाटते
तर दुख:जहाल वाटते
सर्व जग त्याच कैदेत
मग मलाच का शिक्षा वाटते?

सुखी समाधानी राहण्याचा मूलमंत्र
मला नाही जमला
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद
मला नाही मिळवता आला

गर्देची नशा मला नाही झींगली
जगण्याच्या व्यसनात मजाच नाही आली
कसले जिंकणे आणि कसले हरणे
माझी स्पर्धेत उतरण्याची तयारीच नाही झाली

पण मला संघर्ष करायचाय
सहनशीलतेचा अंत पाहायचाय

हि जन्मठेप कधीतरी संपेन
तो पर्यंत हा तुरुंगवास भोगायचाय.....!