कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, December 26, 2011

आजही म्हणता नाही आलं


एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी "बेस्ट फ्रेंड " होती ...
मला ती खरच खूप आवडायची,
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??"

कॉलेजला असताना ...

माझ्या फोन वर call आला...
तिचाचं होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती,
आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्या वर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत,
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं "बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का...?
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडीत जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... तु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी "बेस्ट फ्रेंड्स " ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला ...

PROM Night ला ...

prom NIGHT ला सगळ काही निट झालं..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION DAY ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation day आला ...
मी तिला पाहिलं ...
तीने साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझ तिच्यावर एकतर्फी प्रेम होत पण काय करणार तिच जमत नव्हत ना
आमची शेवटीची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवला ...
आणि म्हटली "आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी ...

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीचं .. तिचं दुसर्‍या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्तच नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेवढचं निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस " असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी ...

मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सर्वजन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...

7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा "

college year:"आज हि मी त्याला खोटं सांगितलं कि माझं ब्रेकअप झालं तरी हा वेडा माझ्या साठी आला "

prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बघतेय...मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."

graduation year:"किती लाजाळू आहे हा, साडीत पाहून काही बोलला नाही "

marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील..."

ते वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला....

Sunday, December 25, 2011

आयुष्यात कधीकधी असं का होतं..एखाद्या मुलीला आपण चांगली मैत्रीण मानत
असतो म्हणून आपण तिच्याशी प्रेमाने बोलतो पण
तिला वाटतं हा फ्लर्ट करतोय..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,

काही नाती तोडून जोडली तरी ती अधुरीच असतात..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,

एक मुलगा आणि एक मुलगी फक्त प्रियकरच असू
शकतात का , प्रेमाहून हि मजबूत मैत्रीचं नातं असतं ना..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,

अवती भवती खूप माणसं असूनही आपण या जगात
एकटे का पडतो..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,

काही व्यक्ती खूप दूर असूनही आपल्या जवळ आहेत असच
जाणवत..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,

आपल्याला एखादी मुलगी खूप आवडते पण
ती आपल्याला मिळतच नाही..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??,

प्रश्न खूप असतात पण उत्तरं मात्र मिळतच नाहीत..
आयुष्यात कधीकधी असं का होतं....??

जीवन हे असच असत


मनात खुप काही असत
सांगण्यासारख पण...
काही वेळा शांत बसणच
बर असतं, आपल दुःख मनात
ठेवुन अश्रु लपवण्यातच
आपल भल असतं, एकांतात
रङलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावच
लागतं, जीवन हे असच असत
ते आपल असल
तरी इतरांसाठी जगावच
लागतं....

मैत्री


काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

Saturday, December 24, 2011

तिचं माझ नात


तिचं माझ नात कस असाव
तिचं माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरी फुल फुलाव

वाटत तीन जवळ बसाव
स्वताशीच गालात हळुच हसाव
जमलच तर् एखाद गाण म्हणाव
किव्वा नुस्तच मुक्याने बोलत रहाव
तिचं माझ नात अस असाव....

वाटत तीला जवळ घ्याव
नुस्तच तिच्याकडे बघत रहाव
मिठीत तिच्या हरवुन जाव
हळुच तिच्या ओठातलं अमृत प्याव
तिचं माझ नात अस असाव...

माझ सुख तीला सांगावं
दुख्ख तिचं जाणून घ्याव
हळुच तिच्या कुशीत शिराव
मोठ होउन सांत्वन कराव
तिचं माझ नात अस असाव..

मन


तेव्हा आपण विचारतो मनाला
का जीव लावला त्याला 
ज्याच्या साठी पूर्ण जग आपण विसरतो 
त्याच्याच आठवणीच्या राज्यात आपणच परके असतो 


का मनाचा गुंता सुटत नाही?
माहित असते त्या वाटेला जायचे नाही 
पण तिथेच भरकटल्याशिवाय मन हि राहत नाही 


का कधी तेव्हाच पाऊस बरसतो, जेव्हा त्याची गरज नसते 
कितीही त्याने भिजवले तरी मन मात्र तेव्हा कोरडेच राहते 


का अपेक्षांची पुरती तेव्हा होते ,जेव्हा त्याची आस कमी होते
हट्ट करून मिळवलेली गोष्ट, नंतर का पस्तावा देते 


का त्याने दिलेले गुलाबाचे फुल आपण डायरीत ठेवून सुकवतो
त्याच्या आठवणी विसरायच्यात म्हणतो 
आणि वारंवार तीच डायरी उघडून त्या आठवणी ताज्या करतो 


मनाचे खेळ मनालाच माहित नाही 
काय हवे आपल्याला तेही कळत नाही 
जेव्हा दूर असते तेव्हा त्याचा हव्यास वाटतो 
आणि जेव्हा मिळते तेव्हा इतकी काही गरज नव्हती असे सांगतो.....


का आपण असे वागतो.....

Thursday, December 22, 2011

ती वेडी विचारते


ती वेडी विचारते
मला.....
का रे प्रेमात पडलास का....?
कसे सांगू तिला....
जेव्हापासून पाहिलंय तुला चैन नाही एक पल मला
......
.
ती वेडी विचारते मला.....काय रे नाव
सांग ना......?
कसे सांगु तिला...
तुझेच नाव सांगायचं मला.....
.
ती वेडी विचारते मला.....
खुप आवडते का रे ती तुला......?
कसे सांगु  तिला..
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला......
.
ती वेडी विचारते मला.....
का रे मग सांगणार कधी तु तिला......?
कसे सांगु मी तिला.....
मला भीती वाटते तुझे नाव घ्यायला.......
कारण जाशील सोडुन मला एकट्याला....

Monday, December 19, 2011

जीवन हे असेच का असते?रित्या या जीवनात कोणी कोणाचे नसते
माझे माझे म्हणता सर्व भ्रांतीचे ओझे असते
जीवन हे असेच का असते?

नात्याची वीण घट्ट झालेली असते
कधी कधी विरहाने पाणी डोळ्यात येते
जीवन हे असेच का असते?

आपले असते तेच आपल्यापासून दूर जाते
हरवलेल्या क्षणांची आठवण करून देते
जीवन हे असेच का असते ?

सकाळी फुललेले फुल झाडावर सुंदर दिसते
संध्याकाळी ते हळुवारपणे कोमेजून जाते
जीवन हे असेच का असते?

दोन किनार्यांची जोड करणारी एक वाट असते
त्या किनार्याना दूर ती एक लाटच करते
जीवन हे असेच का असते?

घरट्यामध्ये राहून पिल्लांनी मोठे व्हायचे असते
पंख फुटल्यावर घरटे सोडून उडून जायचे असते
जीवन हे असेच का असते?

मदत करणारे, पाठींबा देणारे सर्व आपले भासते
आधाराची आशा कमी झाल्यावर मन त्यांना दूर लोटते
जीवन हे असेच का असते?

नको नको म्हणता थोडा स्वार्थही मनात असतो
ओतप्रोत मिळूनसुद्धा मनात मात्र दुखी असतो
जीवन हे असेच का असते?
आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ
नकोस.........

Sunday, December 18, 2011

मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस


मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू नकोस,,
आयुष्यभर मैत्री टिकव,मध्येच सोडून जाऊ
नकोस..
जीवनाच्या एका वळणावर भेट झाली आपली,,
एकमेकांना न बघताच मैत्री झाली आपली,
दिवसेंदिवस बहरत गेली मैत्री आपली,
खूप प्रेम केले मी आपल्या मैत्रीवर,, पण...,
plz , मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू
नकोस,
आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ
नकोस,,
सर्वजण म्हणतात, मैत्री म्हणजे
प्रेमाची सुरुवात असते,
खरे कि खोटे माहीत नाही मला,
पण खरच तस असेल, तर मग मैत्रीला काहीच
किंमत राहत नसेल अस वाटत मला,,
असो, मी मात्र कायम
आपल्या मैत्रीमधला मित्रच राहणार,
तुझी जीवापाड काळजी घेत राहणार,, पण...,
plz , मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू
नकोस,
आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ
नकोस...
कधी कधी जाणूनबुजून तुझ्याशी जवळीक साधण
टाळायच,
कामात असताना पण शरीर इथे, मन मात्र
तुझ्याजवळ असायचं,
कायम तुला हसवायचा प्रयत्न करतो, कायम
तुला सुखात बघण्यासाठी देवाकडे हात जोडतो,
हे आहे माझ आपल्या मैत्रीमधल प्रेम,, पण ...,
plz , मैत्रीमधल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू
नकोस,
आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ
नकोस...
कधीतरी वाटत पडशील चुकून तू
माझ्या प्रेमात,
रंगवशील तुझी स्वप्न माझ्यासोबत, तुझ्याच
स्वप्नात,
आतुर होशील नकळत
ऐकण्यासाठी माझा होकार,
पण कसा सांगणार
तुला माझ्या होकारामाध्ला नकार,,
सहन तुला होणार नाही, हरवून बसशील
स्वतःलाच जीवनभर,
आणि तोच क्षण असेल आपल्या मैत्रीमधला,
जेव्हा..,,
मी बनेल अळवाच पान आणि तू बनशील
पावसाची एकच सर,,
दोघेही गमावून बसू
एकमेकांना आणि आपल्या मैत्रीतल्या प्रेमाला,,
म्हणूनच सांगतो पुन्हाएकदा,,
plz ,मैत्रीतल्या प्रेमाला दुसरा अर्थ लावू
नकोस,
आयुष्यभर मैत्री टिकव, मध्येच सोडून जाऊ
नकोस...,

Monday, December 12, 2011

कुणीतरी आहे तो ...


कुणीतरी आहे तो ...
जो शब्दाविनाही माझे मन जाणणार
जगातले सर्वे सुख माझ्या पदरात टाकणार,


कुणीतरी आहे तो ...
जो कातरवेळी माझ्या मनास हळूच स्पर्शून जाईल
अन ओळख विचारताच नुसताच हसून देईल,
कुणीतरी आहे तो ...
जो स्वप्नांपालीकडील विश्व मला दाखवेल
आणी त्याच्या विश्वात रमताना मला स्वताचाहि विसर पडेल,
कुणीतरी आहे तो ...
ज्याच्याशिवाय सारे काही शून्य असेल
ज्याच्या सोबत सारे विश्वच स्वर्ग भासेल,


कुणीतरी आहे तो ...
ज्याचा असेल मला ध्यास
ज्याचासाठी जगण्याचा असेल माझा हव्यास,


कुणीतरी आहे तो ...
ज्याच्या प्रेमात मी अशी एकरूप होणार
जसे नदीचे पाणी सागरात विर्घलणार,


कुणीतरी आहे तो ...
जो माझ्या पासून दुरावणार तर नाही ना
माझ्या आनंदी विश्व ला संपवणार तर नाही ना,


असाच कुणीतरी आहे तो ...
ज्याची मी आतुरतेने वाट बघते
माझ्या मनास का हि वेडी आशा छळते ?,


कुणीतरी आहे तो .....

Sunday, December 11, 2011

तो आणि ती


रविवार सकाळची वेळ होती,

मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो,
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........
मी तिच्याकडे न पाहताच "हो" म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो,
माझ्या जवळून जाताना तिने,
केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला,
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले,
मी हळूच उठलो खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात आलो,
तिने माझ्याकडे बघाव म्हणून........
फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल,
आणि मला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणून स्वतःशीच भांडलो ,
हळूच मग मागुन जाउन मग मी..
तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन,
हात माझा भाजला,
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली,
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ दया ना!";
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामाऊ दे ना!",
ती लाजून म्हणाली ,
"अहो अस काय करता? चहा उकळतोय!",
मी म्हणालो "उकळू दे! इथे माझा जीव जळतोय!",
"अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!",
"कशाला उगीच काळजी करतेस मी परत आणून देइन ना!",
ती उगाच कारण देत होती ,
मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत,
माझ्या मनासारखा घडवत होतो,
शेवटी तिने कारण दिल ,
"अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..",
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय",
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली ,
मी मनातल्या मनात बाहेरच्या इसमाला शिवी घातली,
तिन झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतल,
आणि हळूच मला धक्का मारून,
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
मी वैतागान दार उघडल, समोर कचरावाला दिसला,
माझ्या खांद्याशी ओला झालेला शर्ट पाहून,
तो पण गालात हसला,
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतल,
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे, अस मला वाटल,
पाहिले मला स्वयंपाक घरातून, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला,
मी धावत आत गेलो, माझ ह्रदय धडधड़त होत,
माझ्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत होत,
मी तिला उचलून घेतल, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या काचेवरून हात माझे फिरत होते,
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
मला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग विलसले,
ती म्हणाली मला,
"एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरण्यापुर्वी मला, तुमच्यामध्ये सामाऊ दया ना!"
मी कवटाळले तिला उराशी,
अन् देवाचे स्मरण करू लागलो,
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागलो,
पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
आम्हा दोघांच अमर आलिंगन पाहून,
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............

कोणाच्या तरी येण्याने...


कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं

आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो,

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खर्‍या अर्थाने
जगायला शिकवतात,

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी,

म्हणूनच ...
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा...

Saturday, December 10, 2011

एका सागराची कथा
एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली


'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?


दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन....


आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी.....


मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.....


सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने


लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

Friday, December 9, 2011

फक्त तुझाच एक वेडा प्रियकर ...


मी एकटाच बरा होतो
तू अचानक आयुष्यात आलीस
काय घडत हे कळण्याआधीच
तू प्रेमाचा रंग भरून गेलीस,


कोणाताही न मिसळणारा मी
आता, तुझ्याशी तासनतास गप्पा मारतो
विषय काही नवा नसतो आपल्यात
पण, तुझ्याशी बोलायला वेळ कमी पडतो,


छोटीशी गोष्ट अर्ध्यावर राहिलीतर
ती, मला उद्यावर ढकलता येत नाही
तुझा फोन जर आला नाही तर
मला रात्रीला नीट झोप लागत नाही,


भांडणही करून पाहिलं तुझ्याशी
पण, तुझ्याशिवाय मन करमत नाही
काय अवस्था असते त्या दिवशी माझी
ज्या दिवशी तू माझ्याशी बोलत नाही,


मी माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी करतो
तुझ्या चेहर्‍यावर हसू पाहण्यासाठी धडपडतो
काय नशा तुझी प्रेमाची माझ्यावर
मी, आजही जीवापाड प्रेम तुझ्यावर करतो,


दे वचन मला तू आज
गोड ओठांच्या चुंबनाची घेत साक्ष
कधी देणार नाही माझ्या प्रेमाला अंतर
आयुष्यभर फक्त माझीच राहशील तू निरंतर....

जरा माझे हि मन समजते का बघ


जरा माझे हि मन समजते का बघ 
डोळ्यातून वाहणाऱ्या आश्रुना थांबवून बघ
त्वेषाने वाहणार्‍या वार्‍याचा स्पर्श घेवून बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ,


हासणार्‍या चेहर्‍या पेक्षा दुख:डोळ्यातील ओळखून बघ
ओठातून निघणार्‍या शब्दापेक्षा मनातील भावना समजून बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ,


मिठ्ठीत आल्यावर जाणीव होते का बघ
गुंतलेल्या श्वासात श्वास गुरफटून बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ,


मृगजळामागे धावण्यापेक्षा उन्हाला निरखून बघ
पौणिमेच्या रात्री सुद्धा चांदण्या दिसतात का बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ,


ओंजळीतील पाणी थांबवण्यापेक्षा ओलावा जाणून बघ
नाते जोडणे सोपे असते पण जरा नाते टिकवून बघ
जरा माझे हि मन समजते का बघ ..

तू होतीस

फक्त तिच्यासाठी


वाटायचे आयुष्य जगावे फक्त तिच्यासाठी,
जिवंत रहाव फक्त तिच्यासाठी,
पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी,
सांगेल तस वागाव फक्त तिच्यासाठी,


... तिच्या हो ला हो म्हणाव फक्त तिच्यासाठी,
तिला हव ते द्याव फक्त तिच्यासाठी,
तिला हव तेच जेवाव फक्त तिच्यासाठी,
तिला हव तिथे फिरवाव फक्त तिच्यासाठी,


स्वता:तला मी पणा मारुन टाकावा फक्त तिच्यासाठी,
स्वतहाचे अश्रू आनंदश्रू म्हणून दाखवावे फक्त तिच्यासाठी,
नेहमी सुखात आहे अस धॉंग करव फक्त तिच्यासाठी,
सगळ सोडून तिच्याकडे जावं फक्त तिच्यासाठी,


आणि तिने फक्त आयुष्यभरबरोबर राहावे माझ्यासाठी..

कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही .मला आठवतंय तुझ माझ्याशी बोलणं
काय बोलतो तिथे लक्ष न देता तुझ्यात गुंग होण,

मला आठवतंयतुझ मला पागल म्हणन
मग मी खोट खोट तुझ्यावर रागावण,

मला आठवतंय तुझ मला लाडान बोलणं
हे ऐकताना नव्यान तुझ्या प्रेमात पडणं,

मला आठवतंय तुझ माझ्यावर प्रेम करण
प्रत्येक वेळेस माझ त्या प्रेमास जगणं,

मला आठवतंय तुझ माझ्यावरच चिडणं
तुझा राग जावा म्हणून माझा हि धडपण,

मला आठवतंय तुझ मला टाळण
अस वागताना तुझ .माझ वेड्यागत होण,

मला आठवतंय माझ्यावर प्रेम नाही अस तुझ बोलणं
अन माझ ते कठोर मनान स्विकारण,

मला आठवतंय तुझ माझ्याशी खर बोलणं
म्हणून तर तुझ्यावरच माझ प्रेम पुन्हा पुन्हा गाढ होण,

मला आठवतंय तुझ्याशी बोलण्यासाठी
माझ तडपण.नेमक तुला त्या गोष्टीचा त्रास होण,

मला आठवतंय तुझ्या सोबतच चा प्रत्येक क्षण
अन फक्त तुझ्यात .गुंतलेल ते माझ मन
पण.......

तुला आठवत का रे माझं तुझ्यासाठीच जगणं
कुठलीही अपेक्षा न करता फक्त तुझी वाट बघणं,

तुला आठवत का रे एकदा तरी तुझं मला आठवण
मी काढलेल्या आठवणी मुळे सतत तुला उचकीच लागणं,

मला सार आठवत पण तुला आठवत कि नाही माहित नाही
कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही
कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही ..!!!!!

Thursday, December 8, 2011

बदल


ही story आहे एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यातील मैत्रीची........

नुकताचं 10th चा result लागला होता शहरातील एका COLLEGE वर ADMITION साठी मुलां-मुलीँची गर्दी जमलेली होती,
Admition form submit करण्यासाठी खुप मोठी रांग लागलेली होती त्या रांगेत एक सुंदर मुलगी उभा होती तिच्या मागेच एक मुलगा उभा गर्दी खुप होती त्यामुळे धक्काबुक्की होणे साहाजिकच होते, त्या मुलाचा चुकुन तिला धक्का लागला तिने लगेच रागाने त्याच्याकडे पाहीले तो चटकन तिलाSORRY म्हणाला तिने काहीच ans दिले नाही .
बराच वेळ निघुन गेला दोघांनाही खुप BOAR होत होतं पण ते एकमेकांशी काहीच बोलत नव्हते !
मग थोड्या वेळाने तिनेच START केले....." तुम्हाला किती % marks मिळाले..........???"
तो गोड आवाज ऐकून तो थोडा दचकला आणि म्हणाला......."66 % " !!!
मग त्यानेही प्रतिप्रश्न केला......." आणि तुम्हाला??? "
त्यावर तिचे ans "86 %".

मग हळु हळु बोलणं वाढत गेलं , ओळख वाढत गेली म्हणजेच त्याच्यांत FRIENDSHIP झाली .
जस जसे दिवस निघुन तस तशी ही मैत्री घट्ट होती ,
ते दोघे आता एकमेकांचे खुप चांगले FRIEND झाले होते ,
ते एकमेकांशी खुप बोलायचे , problems share करायचे , सुख दु:ख वाटून घ्यायचे , कधी कधी भांडायचे पण परत एकत्र व्हायचे , एकमेकांना समजून घ्यायचे !!!
अगदी निखळ व अतुट मैत्री होती त्यांची !!!
पण या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली ,
तिला आता त्याच्याशी बोलणे नकोसे वाटु लागले, ज्याच्याशी बोलताना तिला दिवस पुरत नव्हता आता त्याच्याशी टाळत होती........
ती असं का वागते आहे त्याला काही कळत नव्हतं तो तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा पण ती त्याला टाळत होती !!!
तिच्यात असा बदल का झाला ???
हा प्रश्न अनुउत्तरीत होता!!!


कोनी देऊ शकेन याचे उत्तर ???

परीस


एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....

तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो.... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात....

Wednesday, December 7, 2011

एक सत्य माझ पण ..


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल
होत,

तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत
होत,

विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव
लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत...

सूर्य-रात्र-चंद्र


अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी
तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !
आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस
पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !"
रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस

भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी !
मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय
'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !"
सूर्य म्हणाला , "मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय
ही धग खूप असह्य आहे , शांत होईतो चांदण्यात भिजायचंय !

पण .....आपल्याला असं वागता येणार नाही
तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं
आणि.....तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी.....
"तो" येताच , मला असं विझायला हवं !

मी करत होती प्रेम तेव्हा


मी करत होती प्रेम
तेव्हा भाव खात होतास,
निघून गेल्यावर मात्र आता
आठवणी जपत बसलास.

... तुझ्या एका हाकेवर
मी आली असती धावून,
अखेर मीच थकली रे
तुझी वाट पाहून.

तू तर त्यावेळी माझी
पर्वा ही नाही केलीस,
माझ्या मनाची अवस्थाही
कधीच नाही जाणलीस.

माझ्या जबाबदारीचं ओझं
तुला घ्यायचं नव्हतं,
मी तरी रे काय करु मला
लग्नाचं नातं हवं होतं.

माझ्या आयुष्याचा मार्ग
मीच मग निवडला,
मातापित्यांनी शोधलेला मुलगा
जोडीदार म्हणून स्विकारला.

माझ्यावरचं प्रेम बहुतेक
आता तुला जाणवतंय,
पण खुप उशीर झालाय
हेच तुला मला सांगायचंय.

मी नाही जपणार तुझ्या
कुठल्याच आठवणी भविष्यात,
कारण मी खुश आहे आता
माझ्या नविन आयुष्यात.

समज गैरसमज


समज गैरसमज यांत खुप फरक असतो
अनावश्यक विचार हजर, मुळ मुद्दा गैरहजर असतो


तो का असे बोलला, ती का अशी वागली?
उगाचच नसत्या विचारांची चालते जुगलबंदी!


शंका-कुशकांचे मग हळु हळु सुटते वारे,
गुलाबाच्या फुलाचे दिसु लागतात फक्त काटे!


भावनांच्या लाटा होतात वर-खाली,
रडून-रडून डोळ्यातले संपुन जाते पाणी!


भुक नाही लागत, झोप जाते उडून,
साध्य काहीच होत नाही उगाच मनाला छळुन!


चिडचिड, राग, भांडण, शांत अबोला
“माझी चुक नव्हतीच” वर असा तोरा!


वेळ अशी येता करावी नामी युक्ती,
शहाणपणाने वागण्याची मनाला करावी सक्ती!


मग थोडं थांबुन निट विचार करावा,
चुक-भुल देउन-घेऊन, संवाद साधावा!

Tuesday, December 6, 2011

तुझ्या विरहाचे स्वप्न...


तुझ्या विरहाचे स्वप्न.....
मला काल रात्री पडले होते...
पण ते लगेचच खरे होइल....
असे मुळीच वाटले नव्हते...

तुझ्या होकाराच्या प्रतिक्षेत...
मी सारी रात्र जागलो होतो...
तुझ्या होकारानंतर..
आईशप्पथ एक रात्र ही झोपलो नव्हतो..


तुझ्याशी बोलत असताना..
न जाणे कसा काय वेळ निघून जातो...
भूक तर दुरच...
झोपेलाही विसरून जातो.....


तुझा सुंदर चेहरा...
मला वेड लावून जातो....
तुझा काय???
संपूर्ण वेळ माझा तुझ्याकडे बघण्यात जातो...


तू सोडून जाशील...
असं स्वप्न मला एकदा पडल होतं...
इतर स्वप्न सोडून...
तेच स्वप्न खर व्हायला हवं होतं??


तुझ्या सोबत पुढील आयुष्याची..
स्वप्न पाहून झाली होती...
तू गेल्यानंतर...
ती स्वप्न अश्रुंसोबत वाहून गेली होती...


तुला एकदा पहायला मी....
कित्ती कित्ती तडफाडायचों...
उन पावसाची पर्वा न करता..
मी तिथे त्या कोप्र्यात उभा असायचो..


माझ्या प्रेमाची तुलना..
कधी कशाशीही करू नकोस..
नको करूस प्रेम पण ..
ह्या वेड्याच नाव कधी विसरु नकोस...


किती छान असत ना जर..
स्वप्नांच्या जगात राहता आल असत..
आपल्या स्वप्नाना...
तिथे तरी पूर्ण करता आलं असत.

स्वप्न आणि सत्य

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. 
विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा 
दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्रम्हदेवाकडे गेले. ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले,  "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर असतील, त्याचा... भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपासुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोहचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे!."

तिच्या शिवाय.


भेटायच होत मला, म्हणून बघायची ओढ लागली,
पण उशीर झाला म्हणून ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,


कशी जाउ शकते मला ती बघितल्या शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,


खूप राग आला म्हणून नाही उचलला तिचा मी फोन,
पण मन सांगू लागल, "तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण?"


पण तरीही ती कशी जाउ शकते मला भेटल्या शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....

विचार...


जो त्याग केल्या मुळे त्याची आठवणही मागे रहात नाही, मग रुखरुख तर दूरच तेवढीच आपली शक्ती समजावी...'पुरूषांच लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते, आणि त्याला मुल झालं म्हणजे बायको दुरावते.'..स्वरांच्या निकट राहणारा कलावंत एरवीही एखाद्या स्वराइतका कोमल असावा.त्याने मैफिलीत बेसूर आणि मैफिलीबाहेर असुर नसावा....

                            .....................व.पु. काळे

विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा,
झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची
किंमत स्वत:च निर्माण करा!!


आयुष्याच्या एका वळणावर जरी तुम्ही हरलात तरी आयुष्य चालत राहते ते थांबत नाही, कारण ते नेहमी सांगते कि पुढे जा हा तुझा शेवट नाही....आणि प्रयत्नात सातत्य असेल तर हरून हरून किती दिवस हरणार एक दिवस तरी तुमच्या विजयाचा उजाडेलच!!

माणसं

आयुष्यात खूप माणसे भेटतात, वार्‍याच्या झुळूकेप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जिवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रू पण पुसतात. कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात, तर मध्येच भाऊक होतात. पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात..........

Saturday, December 3, 2011

एक अधुरी प्रेमकथा


त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..

तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...

हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..’

पुढे..

या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’ आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.

"..पाहतो आणि कोसळतोच.."

तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....

ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग’ झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं.....

तो क्षण


ती : माझ्यात काय आवडतं?
तो : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस माझ्यावर???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय? त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही.
ती : मला कधी विसरशील?
तो : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन.
ती : कधी आठवशील मला?
तो : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन.
ती : तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का?
तो : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार
नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल.
ती : माझ्या कोणत्या गोष्टीवर तूझा सर्वात जास्त हक्क आहे?
तो : तुझ्या जगण्यावर नसेल माझा हक्क पण...तू माझ्याशिवाय एकटी हे जग सोडून जाऊ नाही शकणार..
सगळं ऐकून आभाळातल्या उगवत्या सुर्याखाली हातात पान घेतलेल्या पापण्यांची उघडझाप करणार्‍या
त्याला पाहताना तिच्या डोळ्यात फक्त पाणीच होते.
तो क्षण काय होता...याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं...
पण तो क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखा होता.... मनात भरणारा

एकदा असचं विचारला तुला


एकदा असचं विचारला तुला
येतेस का फिरायला पावसात
छान केस उडवत नाही म्हणालीस
तुज्या समोर गोंधालेला मी पाहून
छान हसलीस तू,


... तुझ्या उडत्या केसांकडे पाहत
मी उगीचच हसलो जणू
तुझी थट्टा मला कळली होती
नेहमीच मला वाटायच
तू आहेस कुठेतरी आस पास,


मग स्वप्नातून जागं झाल्यावर
कुठेच नसायची तू
माझ्यावरच हसून झाल्यावर
मला पुन्हा दिसायची तू,


मी निघून जायचो तुज्याकडे पाहत
त्यावेळी खरी खुरी असायची तू
एकदा असाचं विचारलं तुला
येतेस का फिरायला पावसात
छान केस उडवत नाही म्हणालीस...

कधी कधी


कधी कधी खूप खूप जागावं वाटतं
जेंव्हा आपलं कोणीतरी असतं
आपल्याच त्या माणसांसाठी
पाझरणारं ते प्रेम असतं,


कधी कधी पडल्यावरही पुन्हा पडावं वाटतं
जेंव्हा हात देणारं कोणीतरी असतं
मदतीच्या त्या हातामधलं
वेगळं असं नातं असतं,


कधी कधी खूप दूरपर्यंत चालावं वाटतं
जेंव्हा साथ देणारं कोणीतरी असतं
तिथं वाट संपेपर्यंत साथ देण्याचं
एकमेकांना दिलेलं वचन असतं,


कधी कधी त्या स्वप्नातच हरवून जावं वाटतं
जेंव्हा तुझ्यासारखं कोणीतरी असतं
हसता हसता नकळतपणे
'चित्त' चोरून नेणारं असतं.......!

गिफ्ट्स


ब्रेक अप च्या वेळी बोलली गेलेली काही heart touching शब्द
.
.
.
.
.
.
ताई मी दिलेली गिफ्ट्स तरी परत दे तुझ्या वहिनीला काय देवू.

‎"तुटते हृदय जेव्हा."


प्रत्येक क्षणात,


माझी कमतरता असेल..


तुला बघण्याची माझ्या डोळ्यांना, 


नेहमीचं आस
असेल..


एकदा तरी तु, 


जिवनाला निरखुण बघ..


जिकडे बघशिल डोळे उचलुन..


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, 


तुला मिचं दिसेल...

एकदा ती बसमध्ये अचानक दिसली


एकदा ती बसमध्ये अचानक दिसली
मित्राने ओळख करून दिली
मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू?
तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू?
काय सांगणार आता हिला,


एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला
चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस"
काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही,


हा, तर ती बस मधली मुलगी
आताही माझ्याच कॉलेजात होती
सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती
राज की बात, मला ती आवडली होती.


मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला
वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या
दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या
देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला,


बघता बघता दोन वर्षे अशीच सरली
तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली
कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या
कोमल हृदयात माझ्या, हाय! , 
आठवणी मात्र राहिल्या,


जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती
तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता
गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला
तिच्या दर्शनासाठी हा (******) पार तरसून गेला.

तूही कधी माझ्यावर करशील का ?


जे सांगायचे आहे मला,
ते न बोलता तुला कळेल का ?


पाहतो आहे जे स्वप्न मी...
तेच स्वप्न तुलाही पडेल का ?


कविता माझ्या प्रितीची,
तुला कधी समजेल का ?


तुझेही हृदय माझ्यासाठी ...
सूर प्रेमाचे कधी छेडेल का ?


बोलू नकोस काहीच...पण
फक्त नजरेचा एक इशारा देशील का ?


मी केलं आहे तितकच प्रेम
तूही कधी माझ्यावर करशील का ?

आळस

लाख क्षण अपुरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी पण... 
एक चूक पुष्कळ आहे,
ते दिशाहीन नेण्यासाठी किती प्रयास घ्यावे लागतात,

 यशाचं शिखर चढण्यासाठी 
पण... जरासा गर्व पुरा पडतो वरून खाली गडगडण्यासाठी.

 देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी कितींदा जिगर दाखवतो.

आपण इतरांच्या मदतीला 
धावण्यासाठी किती सराव करावा लागतो, विजयश्रीवर नाव कोरण्यासाठी पण..... 
जरासा आळस कारनिभूत ठरतो जिंकता जिंकता हरण्यासाठी...!!!

Friday, December 2, 2011

चार मित्र


एका गावात एक मुलगी राहात असते.

तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.

तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.

तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.

दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते.

त्यामुळे जगवा तो आत्मा ,जपा तो आत्मा , इमान राखा ते फक्त आत्म्याशी नंत्तर पहा गोडी व मिळणारे सुख ...........

Thursday, December 1, 2011

नि:शब्द प्रीत


वळुन पाहिले प्रत्येक वळणावर
कधी तरी तुझी साद येईल…
ना वाटले कधी प्रेम तुझे
इतक्या लवकर कच खाईल…


ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची…
तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची…


तु मात्र कधी जाणली नाहीस
किंमत त्या प्रेमाची…
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस
स्वप्न आपल्या प्रीतीची..


सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा…
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा…


अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते…
सहवासातले क्षण सोबतीला
आयुष्याची नाव हाकते..


जाणते आता कधीच न येणार
तुझी ती प्रेमळ साद…
पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद… 

माझ वेड मनं...!


माझ वेड मनं...!
नदीच्या काठावर मी एकांतात बसलो होतो,
ती भेटायला येणार याचीच वाट पाहत होतो..!


कोण जाणे कुणास ठावुक, मी वाट पाहण्यात किती आतुरलेलो,
दिवस लोटून गेला तरी मी तिथेच बसून राहिलेलो..!


पण ती त्यावेळी तिथे आलीच नाही,
मग आतुरलेले डोळे कड़ी पाणावले हे मला कळलेच नाही..!


मनी नविन आशा-आकांशा घेउन मी तिथून निघून आलो,
ती उद्या नक्की येईन, याच विचारत पहाटेची वाट बघत जागाच होतो..!


काल लोटून गेल, तरी पुन्हा पुन्हा तेच घडत होत,
पण एक दिवस ती नक्की येईन याच विचारत आजही माझ वेड मन तिथे बसून वाट पाहत दंग होउन जात..!!
आजही माझ वेड मन तिथे बसून वाट पाहत दंग होउन जात..!! 

विरह

Marathi Nostalgia Greeting Virah | Chitrakavita.com

मैत्री


मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...


कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....


कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी...

वेळच गेली निघून ........


बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..


प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी
ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..


जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे
मनाला जनवल तेव्हा हे हसणार मन
दू:खात बुडून गेल .
पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..


दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत
कदाचित दोघानाही सांगायचे होते काही
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ......... ..


जे जमले नाही मला या जन्मी
कदाचित मिलविन मी तुला पुढच्या
जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या
जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला
खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून ............ ........

नेहमीच वाटत.....


नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
नेहमीच वाटत.....


नेहमीच वाटत कोणीतरी आपलस व्हाव्
सुखदु:ख् वाटुन घेणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत माझ्यावरही प्रेम करणार कोणी असाव्
ह्रदयात सामावून घेणार कोणीतरी आपल असाव्


नेहमीच वाटत बागेत भेट्णार कोणीतरी असाव्
प्रेमाने गुलाबाच फुल देणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत हातात हात घेणार कोणीतरी असाव्
लढ्ण्याची प्रेरणा देणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत माझीही आठवण काढ्णार कोणीतरी असाव्
आठवणीत माझ्या प्रेमपञ पाठ्वणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत सुखात माझ्या सुख मानणार कोणीतरी असाव्
मी रडत असतांना डोळे पुसणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत प्रेमान हाक मारणार कोणीतरी असाव्
माझ्यासाठीही गाण म्हणणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत संकटात धीर देणार कोणीतरी असाव्
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असाव्


नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
माझ्यासाठीही गाण म्हणणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत संकटात धीर देणार कोणीतरी असाव्
अपयशातून यशाकडे नेणार कोणीतरी असाव्


नेहमीच वाटत आपल्यासाठीही कोणीतरी जगाव्
आयुष्यभर साथ देणार कोणीतरी आपल असाव्.....