कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, October 31, 2011

परत प्रेमात पडणार नाही..

तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
... आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..


पहिल्यांदा CANTEEN मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती...
अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा, अप्सरा जणू भासत होती..
मी 'आ' वासून बघत राहिलो... तसं अख्खं कॉलेजच 'चाट' पडलं होतं..
माझ्या त्या BORING LIFE मध्ये, काहीतरी INTERESTING घडलं होतं..

पण.. आता हा सलमान, आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली, अन् चक्क ती माझ्या नजदीक आली,
DARING करून 'मारला' PROPOSE... ती लाजून 'इश्श' म्हणाली.. ( ती तिकडे 'इश्श'.. आम्ही इकडे 'खुश्श'.. ;-D )
अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता..
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. 'T20' MATCH वाटली का तिला??.. की झटपट उरकून गेली..
जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली..

पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..


सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा सोडला नाही..
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही..
अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती...
सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तिची मात्र चैनी होती..

पै-पै'चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण तसलं काही करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

काय झालं असेल हो? का सोडलं असेल मला?
खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तिला?
खरतर अजूनही मी तिच्यावरच जीवापाड प्रेम करतोय..
प्रेत्येक श्वास घेताना तिचीच आठवण काढतोय..
एकदा भातुकली मोडलीय.. आता परत खेळ मांडणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन

या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते
आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते

फसवले मी तुला

आज मला तुझी माफी मागायचीय,
कारण तुला माझी एक गोष्ट सांगायचीय,
रागवू नको हा.....चुकून चुकलोय मी,
...
खूप हिम्मत जमवून तुला आज माझी ती चूक सांगायचीय.
कधी कधी ना मला तुझी खूप आठवण यायची,
मी रडलो ना कि मग....ती माज्यासोबत रडायची,
तुला नाही कळले ना??पण तिला माझी प्रत्तेक गोष्ट कळायची,
"का" रडतोय मी हे तिला सांगायची गरजच नाही पडायची.


चालताना कुणीतरी मधेच हात सोडले,
स्वप्नातल्या भातुकलीचे घरही मोडले,
फसवायचे नव्हते ग तुला..पण सगळेच...
एकदम अचानक घडले,
आधार दिला तिने...मग एकटे मन "तिच्या" प्रेमात पडले.

तिने माझं सुख हि पाहिलंय,
तिने माझं दु:ख हि पाहिलंय,
पण सगळं सांगूनही सगळं सांगायचं राहिलंय

तिच्या मिठीत ही मायेची उब आहे,
तिचे प्रेमही खूप अन जिव्हाळाही खूप आहे,
माफ कर मला.."तिच्यासोबत मी खूप सुखात आहे"
पण तिच्यासोबत असलो तरी तुझ्या आठवणी मुखात आहे.

आज मी खूप एकटा झालोय ,

आज मी खूप एकटा झालोय ,
खूप मित्र असून हि,
मित्रानं पासून पोरका झालोय ...

भरलेलं होत माझ आभाळ मित्र रुपी चांदण्यांनी,
... त्याच चांदण्यान पेकी एक चांदणं मला खूप आवडलं,
फिरू लागलो त्या चांदण्या मागे,
मनाला नाही मी आवरलं...

एके दिवशी आभाळातून ते चांदणं गळून पडलं,
पडत्या चांदण्याला पाहून,
माझ हि पाऊल चुकीच वळलं,
धाऊ लागलो त्या पडत्या चांदण्या मागे,
विसरून बाकी चांदण्यांना ना...

ते पडलेल चांदणं गेल मला सोडून,
जाता जाता नेहल उरलेल्या चांदण्यांना हि त्याने ओडून,
राहिले ते फक्त काहीच चांदणे माझ्या सातीला,
बाकी गेले सारे मला सोडून...

आता बसलोये मी एकटा,
त्याच नदी किनारी,
पाहत वाट,
त्या पडलेल्या चांदण्याची,
घेऊन गेलेले ते सर्व चांदणे,
तिने मला परत करण्याची...

खूप एकट वाटू लागले मला,
इच्छा सरली आता माझी जगण्याची...

पण आजून हि सात आहे,
त्या उरलेल्या चांदण्यांची,
गेले जरी सर्वे,
तरीही,
इच्छा नाही मरू दिली,
त्या चांदण्यांनी माझ्या जगण्याची...
इच्छा नाही मरू दिली,
त्या चांदण्यांनी माझ्या जगण्याची...

एक हवाई सुंदरी......

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती ..............जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ....................
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली...................
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल.........
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारलेतिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल......

मी आणि ती


सकाळी ७.५० च्या बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो..
तिकीट काढल सगळ झाल आणि वरच्या दांडीला लटकलो
इकड तिकड बघताना सहज तिच्यावर नजर गेली..
शब्द नाहीत, smile नाही direct काळजाला जाऊन भिडली...
तिच्याकडे बघून मग मी एकटा मनाशी हसायचो..
तिला दिसू नये म्हणून ते smile ओठातच ठेवायचो...
अस रोज घडता घडता माझ smile तिला दिसलं
ओळख नाही पाळख नाही तिन पण आपल्याला smile दिलं..
क्षणात मनाच्या मोराचा झकास पिसारा फुलला....
तीच ते हसू बघून दिल garden garden झाला...
दुसऱ्या दिवशी धाडस करून मी तिच्याशी बोललो
बोलता बोलता मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो ..
हळू हळू ती रोज माझ्यासाठी जागा धरायला लागली..
मग ती कस तिकीट काढणार?
म्हणून तिकीटाची जबाबदारी माझ्यावर आली..

अस होत होत चहा झाला कॉफी झाली..
दोन पिक्चर झाले तिच्या birthdaychi party झाली..
म्हंटल तिला आता आपल्या मनीच गुज सांगाव
तिचा होकार येताच तिला आपल्या मिठीत घ्याव ..
म्हणून दुसऱ्या दिवशी ग्रीटिंग card नी गुलाबाचं फूल आणलं..
नवीन शर्ट घालून तिच्या शेजारी स्थान ग्रहण केल..
तिला ग्रीटिंग देणार तेवढ्यात तिन हातात पत्रिका ठेवली
म्हणाली "२३ ला लग्न आहे कालच engagement झाली "
म्हणल च्यायला नेहमी आपलाच का असा पोपट होतो?
कुणावर प्रेम केल कि त्याचा नेहमी असा का शेवट होतो?
सगळ मनात ठेवून मग तीच अभिनंदन केल
आता उद्यापासून नाही म्हणून तीच शेवटच ticket काढलं..
२३ ला आठवणीने तिच्या लग्नाला गेलो
तिला आणि तिचा नवऱ्याला दोघांना congrats करून आलो.

आता मी रोज तसाच बसने जातो एकट्याच ticket काढतो
जागा मिळाली तर बसतो नाहीतर दांडीला लटकतो
पण कुणीही बघून हसलं तरी मुळीच हसत नाही
आणि जागा मिळाली तरीही मुलींजवळ बसत नाही...
आणि कधी तिची आठवण आली तर हाच विचार करतो, मी प्रेम का केले असाव?

खरे प्रेम

खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्या शिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

आज तुला मी नकोय

आज तुला मी नकोय
हे मला कधीच कळल होत
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जानल होत
तुझ लग्न ठरलय
तुझ्या वागन्यातुन समजत होत
दुसरीकडे ओढ़ लागलेल तुझ मन
मला समजुन येत होत
खुप वाईट वाटत होत
पण काहीच सुचत न्हवत
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू
पण आता सगळ बंद होत
खुप आठवन येते म्हणत
आय लव यू च बोलन
आता संपून गेल होत
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल
न्हवत
प्रत्येक मिनिटाला मोबाईल कड़े पहान
आज ही तसच चालु होत
ये मूर्खा फोन करना
तुझा आवाज ऐकायचाय
अस बोलणार कोणच उरल न्हवत
वरुण हसताना दिसलो तरी
मन रडन सोडत न्हवत
तुझ्या विरहात जगन
खुप कठिन झाल होत
देवा माझ्या स्वीट हर्ट ला उदंड
आयूष्य दे एवढच मागण
तुझ्या चरना जवळ होत
काळजी घे मी कसाही जगेन पण तू
सुखी रहा
तिला एवढच सांगायच होत ..

कसा राहू तुझ्याशिवाय

कसा राहू तुझ्याशिवाय
एक क्षण ही असा जात नाही
जेव्हा तुझी आठवण येत नाही

पण तू मला दिलं काय?

फक्त तुझ्या आठवणी
ज्या छळतात मला क्षणोक्षणी

दिल्यास फक्त जखमा
ज्या हृदयात केल्यात जमा

संपता न संपणारी रात्र
जी उसासे भरते मात्र

या आयुष्याच्या तराजूत
तू दिलेल्या दुःखाचंच पारडं जड आहे,
तरीही तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे...

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते.

कोण ग तो तुझा म्हटल्यावर
झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते..
...

रोज निरोप घेताना
पुन्हा कधी भेटशील म्हणताना
पाणावलेले डोळे आणि
कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते..

कारण नसताना तासभर फोनवर भांडायचा
स्वतः राग करून फोनही ठेवायचं
फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला
आय लव यु चा म्यासेग बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते..

नकळत स्पर्श झाल्यावर
तिच्या हृदयाचा चुकणार ठोका
आणि थरथरणारे ओठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटत..!! ♥

Sunday, October 30, 2011

चटाक ! !


चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )

चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
...
...
मम्मी : काय झाले?

चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो..............................

मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )

खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का.. ♥ ♥

प्रेमाला प्रेमाने जिंकता येते
अशीच मला आशा आहे
प्रेम दिल्याने वाढत जाते
... हीच प्रेमाची भाषा आहे
प्रेमाला फक्त प्रेम द्या हेच
मी सर्वाना सांगणार आहे
कधी माझे प्रेम स्वीकारशील
तो पर्यंत मी वाट बघणार आहे.......

नेमकं असं होतं



रोज तुझी आठवण आली,
कि फोन करु वाटतो,
नंतर कळतं कि,
आता फोन तुझ्याजवळ नसतो!
...
कधी तु फोन करतेस,
अन् मी recieve करत नाही,
फोन silent वर असतो,
मला आवाजच येत नाही!
कधी अचानक तुझा फोन येतो,
मी हि recieve करतो,
प्रेमालाप रंगत असताना,
अचानक balence च संपतो!
कधी मूड मस्त असतो,
balence जबरदस्त असतो,
नेमकं त्याच क्षणी,
तुझा father तिथे असतो!
भले, असशील दुर,
मला दुर तु नाही,
करमतं का तुला गं ?
मला खरंच करमत नाही!

मला खूप वाटत...


मला खूप वाटत की तुला पल्सरवरून फ़िरवाव,
मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसाव,
'राणीचा हार'बघून तुला प्रसन्न वाटाव,
माझ्या राणीचा चेहरा बघून माझही मन हसाव!! मला खूप वाटत की तुला मुव्हीला न्याव,
मुव्ही बघून रडताना,माझ्या खान्द्यावर तुझ डोक असाव,
येताना तुझ्याबरोबर candle light dinnerला जाव,
शेवटी घरी सोडताना शेवटपर्यन्त TATA कराव!! मला खूप वाटत की अशाच कविता करत राहाव,
तुझ्या सगळ्या आठवणीना लहान बाळासारख जपाव,
ह्या आठवणीनी मन नेहमीच पुलकित व्हाव,
मरेपर्यन्त ओठावर फ़क्त तुझच नाव असाव!! मला खूप वाटत... ....कुणीतरी असावे ♥♥♥

Tuesday, October 25, 2011

एक Girl Friend हवी आहे

साधी दिसणारी, काळ्या केसांची; डोळ्यांची ...........
जास्त प्रश्न न विचारणारी , मराठीवर प्रेम करणारी, उदार अंतः करणाची,
"बाहेरच खायला आवडत नाही मला" अस बोलणारी,
... ... ... साधीच पण जीन्स घालणारी, पुस्तकांवर प्रेम असणारी,
माझ्या काहीच्या काही कविता फालतू असल्या तरी;
".....खरचं किती सुंदर कविता आहेत तुझ्या, जणू काही दुसरा मर्ढेकर"
अस खोट खोट बोलणारी,
"हिंदी चित्रपट आवडत नाही मला ........ मराठीच आवडतात. पण तेही मी घरीच बघते"
अस म्हणणारी, पावसात भिजायला आवडणारी,
"प्लीज मला काही गिफ्ट घेवू नकोस" अस म्हणणारी,
आणि ..........

ब्रेकअपच्या वेळी ........
"प्लीज मला समजून घे, माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही"
हे इतक्या सच्चाईने बोलणारी, कि ते एकूणच तिच्या पुन्हा प्रेमात पडावं अस वाटायला लावणारी,
एक GF हवी आहे

कधी काळी

कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.

कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.

कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.

कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत...

Sunday, October 23, 2011

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..




थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
... चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

असंच कधी तरी अचानक तू आयुष्यात यावं,

असंच कधी तरी अचानक तू आयुष्यात यावं,
सगळ्यांना सोडून माझं लक्ष तुझ्याकडे जावं,
गालातल्या गालात तू असं काही हसावं,
माझ्या घरट्याला झिडकारून मनाने तुझ्या घरट्यात रहावं

... ... ... तुझं वागणं नेहमी माझ्यासाठी "एक रहस्य" असावं,
डोळ्यांत तुझ्या पाहून नेहमी बोलत बसावं,
कधी तरी माझ्याकडे चंद्र-तारे माग,
तुला समजवायचा मोका हवा...कधी तरी वेड्यासारखी वाग

रोज रोज तुझ्या हातून असं काही घडावं,
बिचारा मी रोज रोज तुझ्या प्रेमात पडावं,
काही बोलल्यावर तुझ्या बोटाने माज्या ओठांवर यावं,
"असं बोलू नकोस पुन्हा"...टपोऱ्या थेंबानी डोळ्यातून गालावर यावं

कधी तू कधी मी खोटे खोटे रुसावे,
माझ्या आठवणीतले तुझे आसू मी स्वत: फुसावे,
कर कधी तरी फुलं सोडून पाकळ्यांचा हट्ट,
कधी तरी घे बोटांना बोटांच्या मिठीत घट्ट,

अपेक्षा माझ्या जास्त म्हणून होऊ नको दु:खी
बाकी नाही जमले तरी हे एक जमेल तुला नक्की,
आयुष्यभर माझा हात तुझ्या हातामध्ये धर,
मनापासून माझ्यावर खूप खूप......खूप प्रेमकर

पाहून तिची तिरखी नजर

पाहून तिची तिरखी नजर
नयन माझे थबकले ,,
पाहून तिची लाचाकी कंबर
शब्द माझे थिरकले ,,
लाजली ती सखी पाहून माझ्याकडे
माझे तर शब्दच अडकले !!!!!!!

असंही प्रेम असतं!!



अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु?
काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला,
चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!
बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....

मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...'
(.......) ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?
काय कारण असेल?
आजार?
खून?
का...
का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात

एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही,
मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय!
२ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली?
तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे.

Saturday, October 22, 2011

चारोळया

गमावलं मी पण होतं..
.
गमावलं तिने पण होतं..
.
फरक फक्त एवढा आहे..?
.
तिला मिळविण्या करीता मी सर्व
काही गमावलं..
.
अन्..?
.
तिने सर्व
काही मिळविण्या करीता मला गमावलं....
 
कधीतरी तू
मला असं वचन देशील..?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील..?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल..
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो..
यातच मग मला समाधान असेल..
 
मैञी असते एक साठवन्| मनाने मनाला दिलेली आठवण् ।।
हा धागा कधी विसरायचा नसतो । तो जपुन ठेवायचा असतो ।
कारण ही नाती तुटत नाहीत्, ति कधी कधी मिटुन जातात.
जशी बोटावर रंग ठेऊन फुलपाखरे हातुन सुटून जातात.
 
प्रेम मी पण केल
आणि तिने पण
केल.... फरक एवढाच मी केल
ते
तिला मिळवन्यासाठी
अणि तिने केल ते वेळ
घालवण्या साठी ....
 
आठवण तुझी आली कि ..
जीव माझा तळमळतो ..
दुख तुला होऊ नये म्हणून ..
मी स्वतःला सावरतो .!
 
" सगळ्यात सुंदर नाते " हे..?
दोन डोळ्यांचे असते,
ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात,
एकाच वेळी झोपतात,
ते ही..?
आयुष्यभर ऐकामेकांना, न.? बघता.

लढाई आहे आपल्या जीवनाची

फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कङून आधाराची ?
जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची?
किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ?
कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ?
अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची.

असंच कधी तरी अचानक तू आयुष्यात यावं,

असंच कधी तरी अचानक तू आयुष्यात यावं,
सगळ्यांना सोडून माझं लक्ष तुझ्याकडे जावं,
गालातल्या गालात तू असं काही हसावं,
माझ्या घरट्याला झिडकारून मनाने तुझ्या घरट्यात रहावं

... ... तुझं वागणं नेहमी माझ्यासाठी "एक रहस्य" असावं,
डोळ्यांत तुझ्या पाहून नेहमी बोलत बसावं,
कधी तरी माझ्याकडे चंद्र-तारे माग,
तुला समजवायचा मोका हवा...कधी तरी वेड्यासारखी वाग

रोज रोज तुझ्या हातून असं काही घडावं,
बिचारा मी रोज रोज तुझ्या प्रेमात पडावं,
काही बोलल्यावर तुझ्या बोटाने माज्या ओठांवर यावं,
"असं बोलू नकोस पुन्हा"...टपोऱ्या थेंबानी डोळ्यातून गालावर यावं

कधी तू कधी मी खोटे खोटे रुसावे,
माझ्या आठवणीतले तुझे आसू मी स्वत: फुसावे,
कर कधी तरी फुलं सोडून पाकळ्यांचा हट्ट,
कधी तरी घे बोटांना बोटांच्या मिठीत घट्ट,

अपेक्षा माझ्या जास्त म्हणून होऊ नको दु:खी
बाकी नाही जमले तरी हे एक जमेल तुला नक्की,
आयुष्यभर माझा हात तुझ्या हातामध्ये धर,
मनापासून माझ्यावर खूप खूप......खूप प्रेमकर

पुन्हा हेच हृदय शोधू शकशील का तू...?

मी तुझी नेहमी आठवण काढेन
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना..?

तुला स्वप्नातही वाटणार नाही
इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?

मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?

स्वप्नांच्या दुनियेत हरवशीलही तू
अवकाश्यात उंच झेप घेशीलही तू,
मात्र माझ्या इतके प्रेम करणारे हृदय
सांग सखे, पुन्हा हेच हृदय शोधू शकशील का तू...?

अपेक्षा

मी कधी कधी खूप अपेक्षा ठेवून असतो... की आज ही गोष्ट आपल्यासाठी चांगली होणार...
एकूण काय तर सर्व जे काही चांगले आहे ते मी सतत मागत असतो...
आणि नेमका तिथेच चुकतो... आणि ज्या गोष्टी नको असतात... त्याच घडत जातात...
म्हणून आता... चांगले काही होईल याचा विचार करणे नाही....
जे होईल... जस होईल... पाहणे...
हेच योग्य आहे म्हणून गुपचुप चालत राहणे...

वेड आणि प्रेम

एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे ठरवले, वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, वेड्याचे आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात उडी टाकली, ते झुडूप गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............
वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं, पण प्रेम काही मिळाले नाही, शेवटी स्वत: हाची हार सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून समोरच्या झुडपात जोराने काठी खुपसली व बाहेर काढली ........
बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं, तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं, पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात खुपसली गेली होती ..........
ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर राहीन ...............

दर्शन देऊन जा..

तुला बघण्यासाठी आसुरलेल्या
डोळ्यांना..
.
एकदा तरी दर्शन देऊन जा..
बेरंग झालेल्या माझ्या निराश जिवनात..
.
एकदा तरी तुझ्या प्रेमाचे रंग भरुन
जा..
तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे
थेंब गालावरच राहायला तरसतात,
क्षणभर का होईना
ते गुरुत्वाकर्षण विसरतात.

रिझल्ट

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात

मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते

आई : कुठे आहेस

मुलगी : परीक्षा देत आहे

आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन

पोरगी म्हणजे

"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."

पाहून तिला दुसरया बरोबर फिरताना......



पाहून तिला दुसरया बरोबर फिरताना
बी पी झाला हाय
टेंशन नका घेऊ मित्रांनो
या प्यायला चाय ....

किती ही जवलची पोरगी असली
तरी विश्वास ठेवायचा नाय
लबाड आहे ही दुनिया
पाय घसरून द्यायचा नाय

थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर
नंतर करतील बाय
अचानकच सोडतील हाथ आपल्याला समजणार पण नाय
आज याच्या बरोबर
उद्या त्याच्या बरोबर
त्यांचा नींयम नाय

जास्त कमी काय बोललो तर म्हणतात
इथेच राहतो आमचा भाय
टेंशन नका घेऊ मित्रांनो या प्यायला चाय
जीवन सुंदर आहे अस हताश व्हायच नाय
तिच्या विरहात आपल जगन कधीच सोडायच नाय
तिच्या पेक्षा सुंदर बायको मिळेल हाय फाय
तिला पण दाखउन दयायच आम्ही
कुठेच कमी नाय टेंशन नका घेऊ मित्राननो या प्यायला चाय....!

प्रश्न


मित्रानो या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या...... ......
जीवन मिळते एकाचं वेळी...... ........
मरणं येतं एकाचं वेळी...... ....
प्रेम होतं एकाचं वेळी...... ....
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...... .......
सर्व काही होतं एकाचं वेळी...... .......... .
तर तिची आठवण.. . का..?येते वेळो वेळी...... ......?

Friday, October 21, 2011

काही अनुभव ...



कधीचं कोणाच्या भावनांशी खेळू नये
कारण कदाचित तुम्ही हा खेळ जिंकाल
पण त्या व्यक्तीला कायमचे गमवाल....

सहनशक्ती खरचं अशी का असते ?
यासाठी नाही की वाईट लोकं जास्त आवाज करतात म्हणून
यासाठी की काहीही झाले तरी लोकं नेहमी शांतचं असतात...

मी त्या लोकांचा सदैव आभारी असेल ज्यांनी माला
नकार दिला आणि शक्य असूनही कधीचं मदत केली नाही
कारण त्यामुळेचं मी बरेचं काही शिकलो आणि आज
कुणाचीही मदत न घेता एकटाचं काहीही करु शकतो

काहिंचा चेहरा आनंदी असणे याचा अर्थ असा नाही की त्यांना दुखः नाही
याचा अर्थ असाही असू शकतो कि त्यांनी दुखाःशी समझोता केला आहे

जर तुमच्या कडे दिवा आहे तर हर एक तुमच्या मागे येईल
पण अंधारात तर सावली सुध्दा साथ सोडून देते

दुसर्‍यासोबत हरणे एकदम सोपे असते पण त्याला कायमचे जिंकणे एकदम अवघड

स्वप्न

स्वप्न थांबवलीत की आयुष्य थांबत।
विश्वास उङाला की आशा संपते।
काळजी घेणे सोङल की प्रेम संपत।
म्हणुन स्वप्न पाहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आयुष्य खुप सुदंर आहे.