कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, January 2, 2012

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील..!!

एका तलावाच्या काठावर ... ♥


एका तलावाच्या काठावर ... ♥
प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू, किती छान बदके आहेत बघ,
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, " त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर :- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते"