कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!
Showing posts with label प्रेम कथा. Show all posts
Showing posts with label प्रेम कथा. Show all posts

Thursday, September 6, 2012

हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा


एक मुलगा आणि मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करायचे.मुलगा मुलगी दोघेही मध्यमवर्गीय घरातले होते.एक दिवस मुलगी त्या मुलग्याची प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवते.
तो जेव्हा तिच्या घरी येतो, तेव्हा ति बेडवर झोपलेली असते आणि त्याच्या हातात दिला जातो एक कागद...तो कागद दुसरा तिसरा काही नसुन तिला डॉक्टरांनी दिलेलं एक सर्टिफिकेट असतं ज्यात लिहीलेलं असतं की तिला कॅन्सर झालाय तिच्याजवळ फक्त 16 तासाचा वेळ शिल्लक आहे.ती
त्याच्या चेहर्यावरचे भाव बघण्यास खुप आतुर झालेली असते,पण तो काहीही न बोलता तसाच निघुनजातो.तिला वाटतं की बहुतेक त्याला कळलंय की हे सर्टिफिकेट खोटं आहे.
तो चार तासातच परत येतो आणि तिला म्हणतो,चल आणि पुढचे बारा तास मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारायचं नाही मी सांगेल तेच करायचं.असं सांगुन तो तिला घेऊन जातो,सकाळच्या नयनरम्य वातावरणात ती हिरवीगार झाडी आणि त्यावर पडलेलं दव,बाईकवर असतानाचा तो थंडगार झोंबणारा वारा याच्या आनंदाने ती खुपच शहारुन गेलेली असते.दोन्ही हात लांब करुन तो वारा कवेत घेण्याचा ती प्रयत्न करत असते.तिचा हाच आनंद त्याला हवा असतो.त्यानंतर तो तिला प्राणीसंग्रहालय ात घेऊन जातो तिने आधी न पाहीलेले कितीतरी प्राणी तिथे पाहीले आणि जे तिला खुप आवडले.थोड्या वेळानंतर तो तिला esselworld मध्ये घेउन गेला.water games,उंचच उंच पाळणे,जलतरण तलाव अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी रमुन गेली की या जगाचं तिला भानंच नाही राहीलं,तिच्या चेहर्यावरचा ओसंडुन वाहणारा आनंद त्याला खुपच मोहुन जातो.
संध्याकाळचे सहा सव्वासहा वाजता तो तिला समुद्रकिनारी घेऊन जातो,तिने कधीही आधी न पाहीलेला सनसेट पॉईँट तो तिला दाखवतो. ते पाहुन ती हळुच त्याच्या मिठीत विसावते...तिथे दोघेही एकत्र फोटो काढुन घेतात ते फोटो तो तिची शेवटची आठवण म्हणुन स्वतःजवळ ठेवुन देतो.काही वेळानंतर ते शॉपिंगला जातात तिला जे जे आवडतं ते ते सगळं ते दोघे खरेदी करतात तो स्वतःसाठी मात्र काहीही खरेदी करत नाही.रात्र झाली नंतर ते तिच्या घरी जातात.दिवसभरच्य ा मिळालेल्या आनंदाच्या वातावरणातुन ती थोडी बाहेर येते मग ती विचारात पडते की याने इतके पैसे आणले कुठुन?हाच प्रश्न ती त्याला विचारते.तो म्हणतो,तुझ्यासा ठी मी माझं घर विकलं.हे ऐकल्यावर तिचा खुप संताप होतो.आणि ती त्याला म्हणते,अरे पण का विकलंस तु घर?

तोःतुझ्यासाठी।त ुझ्याकडे आयुष्याती फक्त सोळा तास शिल्लक आहेत,जेव्हा हे मला कळलं तेव्हा खरंतर रडावसं वाटत होतं,पण तुझे उरलेले आयुष्य तु फक्त आणि फक्त आनंदाने जगावंस.असं मला वाटत होतं.आणि तो आनंद जर मला तुला द्यायचा झाला तर मला माझं घर विकावं लागेल याची जाणीव मला झाली. म्हणुनच मी माझं घर विकलं.आता हेच बघ ना आज दिवसभरात तुला दुसरी कशाची आठवण आली का?नाही ना हेच तर हवं होतं मला...हे ऐकताच तिच्या हातातुन शॉपिंग केलेल्या बॅग्झ खाली पडल्या आणि तिने त्यालामिठीत घेतलं.
ती म्हणाली,मला माफ कर.. प्लीज मला माफ कर मी तुझी दोषी आहे तु मला सांगशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे.
तोःकशाबद्दल?
तीःमी तुझ्याशी खोट्याने वागले.मला कॅँसर वगैर काही झालेला नाही मी तर फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी खोट बोलले,खोट्याने वागले मला माफ कर...
ती खरंच आपल्याला सोडुन जाणार नाही या आनंदाने त्याचे डोळे पाण्याने भरुन आले,घर गमावल्याच्या दुःखापेक्षा प्रेयसीला पुन्हा एकदा मिळवल्याचा आनंद त्याला जास्त होता आणि त्याने तिला माफ केलं.त्यांची मिठी आणखीनच गडद झाली.तो तिला म्हणतो,तु खरंच मला सोडुन जाणार नाहीस ना?नाही रे राजा मी तुला कधीही सोडुन जाणार नाही.
खरंच हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाँत आनंदाचा दिवस आहे.संपुर्ण आयुष्यभर जितकं रडलो नसेन तितकं मी तुला कँसर झालाय ही बातमीऐकल्यापासुन रडलोय.....i m so sorry मी तुझ्याशी पुन्हा असं खोटं बोलणार रे.....its ok पण पुन्हा असली चेष्टा करु नकोस,नाहीतर तुझ्या आधी मीच मृत्युला सामोरं जाईन..तो असं बोलताच तिने त्याच्या तोँडावर हात धरला आणि ते पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले....
मित्रांनो असं म्हणतात की प्रेम जितक्या परीक्षेत पास होत जातं तितका त्यातला गढुळपणा कमी कमी होत जातो आणि त्याचं पावित्र्य वाढत जातं.ही गोष्ट मलाही मान्य आहे पण त्या परीक्षा किती आणि कोणत्या प्रकारच्या असाव्यात यालाही काहि मर्यादा आहेत की नाही?हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही डोळसपणे निवडलेल्या साथीदारावर डोळेझाकुन विश्वास ठेवा. म्हणजे बघा तोच साथीदार तुमची किती सुरेख साथ निभावतो ते...

  Source  मराठी लव्ह स्टोरीज . . . 

Thursday, August 9, 2012

ती झुळुक मीच असेन


नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!
कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु
चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर
त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच
असेन ..!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन...

Sunday, August 5, 2012

कारण ती मला आपला "best friend" मानायची ..


मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
...जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
... मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..

पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला "best friend " मानायची ..

मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .

मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..

ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..

मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..

माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..

आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माज्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .

तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .

तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..

तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा"best friend " मानायची ..

आयुष्यभर एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..
तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..

तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा "best friend " मानायची..

आता माजाही प्रवास संपत आला आहे ,
मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची ...!
पण नाही , कारण ...
ती मला तिचा "best friend " मानायची..

तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...
मैत्री आणि बरच काही ..

Sunday, May 13, 2012

सांग कसा मी विसरू तिला !!!


ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिच आहे
एकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
मग ह्रदयाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

Wednesday, April 11, 2012

अधुरी एक कहाणी.

एका युवकाची आणि एक मुलीची ओळख झाली,
आपल्या फेसबुक माध्यमातून,,,,रोजच
ओनलाईन बोलन सुरु झाल…ते एवढे चांगले मित्र झाले कि एकमेकांशी गप्पा
मारल्या शिवाय ते रहात नसत….
या काळात अनेक वेळा भांडण आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते
४ महिने हे असेच चालू होते… परंतु त्या युवकाने
तिला कधीच प्रेमाविषयी सांगितले नाही….
आणि एकदिवस चक्क त्यामुलीने त्याला विचारले.
तू माझ्यावर प्रेम करतोस? दोघांनी एकमेकांना समोरासमोर
कधीच पाहिले नव्हते. फक्त फोटो पाहिले होते….तिच्या त्या प्रश्नावर
त्या युवकाने उत्तर दिले.हो. करतो मी प्रेम तुझ्यावर प्रेम मग त्या युवतीने
त्याला विचारले याआधी तू का नाही बोललास ?
युवक म्हटला मला माहित नव्हत तू माझ्यावर प्रेम
करतेस का ते? पण मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले आणि तू
मैत्रीही नाही ठेवली तर?

अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार मिळाला आणि रोजचा गुड
मोर्निंग हा शब्दआय. लव. यु कडे वळला….हळू हळू फोन वर
बोलन चालू झाल.आणि फेसबुक वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात
बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण दोघांशिवाय न
रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले… वेळ
आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच खरी….पण तीच त्याला नेहमीच
आमंत्रण असायचं…हा मात्र कामामुळे जाऊ शकत नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले
कि आपण भेटायला जायचे….त्याचा गाव वरून
तो तिच्या गावी निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचेअश्रू
आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..

भेटीचे ठिकाण ठरले त्या गावचे स्टेशन चे ते मोठे खांब
त्याच्या खाली.. युवक तेथे पोहोचला त्याच्या आधी ती तेथे
येऊन थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं आणि एकमेकांना कडकडून
मिठीत घेतलं…कदाचित अस होईल हे दोघांना माहित नव्हत पण
हे नक्की समजल…त्याच तिच्यावर आणि तीच
त्याच्यावर खरच खर प्रेम होत… कुठे फिरायला जायचं
हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी मंदिर असे
उत्तर मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन
घेण्यास गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न
चिन्ह दोघांच्याही चेहर्‍यावर होत….

फोन वर आय. लव. यु ऐकू येणारे शब्द समोरासमोर आल्यावर
लवकर कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले
आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर
हाजीमलंग झाल आणि गप्पा सुरुझाल्या….किमान ४ तास,
ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत
होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे
सांगून युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप
घेण्याची वेळ आली आणि… पुन्हा स्टेशन वरून
दिवसभराच्या भेटीची सांगताझाली…..
दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर लिहून ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अशी हि पहिली भेट
झाल्यानंतर एकमेकांशी पुन्हा फोन वर बोलन चालू झाल…

एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं आणि लग्न करायचं अस
ठरवलं… किमान पुन्हा ४ महिने हे प्रेम
प्रकरण चालू राहील आणि हा युवक तिच्याशीच
नव्हे तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू लागला फक्त तिचे बाबा सोडून….दररोज
तासान तास बोलन चालू असायचं….या
दोघात कधीच कसलंही भांडण नाही झाल…..

ऑगस्ट मध्ये त्यांनी साखरपुडा करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २०११
या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार होते.. एक दिवस ते
काहीतरी कारणास्तव बोलू शकले नाहीत…. दोघांनाही फार आठवण
आली होती… सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण तो बंद
होता आणि अकराच्या सुमारास तिच्या बहिणीचा फोन आला…
कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग सोडून गेली……

युवकाला काय करावे सुचेना उठून
त्याने तिचे गाव गाठली आणि तिची अखेरची भेट
ती सरणावर असताना घेतली…..सारी स्वप्न त्या चितेत
पेटघेत होती.. या नंतर किमान ७ दिवस या युवकाने
कोणाला काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर
तो ठीक झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल
अस वाटत असेल….. तो तिला विसरू शकेल ?

अशी हि आपल्यातीलच
एका युवकाची….. अधुरी एक कहाणी.

Monday, March 5, 2012

तो आणि ती..... एक लव स्टोरी …

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.
ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
... तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.


...
सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं

काम आहे. येतोस का बरोबर?"

असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता...

बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर

बसुन त्याला गुदगुली व्हायची.

लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास
न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.

परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..

त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.

"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.

परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.

आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.

तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"
तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
              
 

                            तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती!!

Wednesday, February 15, 2012

Valentine's Day Special 'Love Story'

ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता.
ती त्याच्यासोबत होती. त्याने
तिचा हात पकडला होता. अचानक
तिचा हात निसटला...
त्याच्या हातातून...
खूप गर्दी होती.. त्याच्या थोड्यावेळाने
लक्षात आला कि तिचा हात
सुटला आपल्या हातातून.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे
तिला शोधू लागला. त्याला काही सुचेचना.
घाम फुटायला लागला होता. इतक्यात
त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात
दिसली.
एक लोकेट बघत होती. तो त्या दुकानात
आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला,
ती वळून म्हणाली,"छान आहे ना??"
आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं,
त्याचे डोळे पाणावले होते.
तिने विचारलं, "काय झालं?"
त्याने तिला आवेगाने हग केलं,
आणि लगेच सावरून म्हणाला,"
तुला आवडली आहे का ती चेन?"
ती म्हणाली," हो, खूप."
तो म्हणाला," मग हि तुला माझ्याकडून
गिफ्ट." "कसलं गिफ्ट? अरे माझा वाढदिवस
खूप दूर आहे अजून."
तो म्हणाला," हे
माझा पहीला valentine गिफ्ट तुला."
ती म्हणाली," are you proposing me
"
तो म्हणाला," हो, कारण आज
जेव्हा तुझा हात माझ्याहातून
सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय
किती incomplete आहे मी..
प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ नकोस,
मी... मी.."
ती लगेच म्हणाली," नाही जाणार.कधीच
नाही...... नेहमी तुझ्या सोबत राहील,
शेवटच्या क्षणापर्यंत..."

Wednesday, February 8, 2012

प्रेम मरणातूनही उरे...!

एक होते आटपाट नगर
त्यात होता देखणा चिमणा
सातासमुद्रापलीकडे जायचेच
हा असे त्याचा बाणा...

होता तो हुशार मोठा
अढळ होता त्याचा निर्धार
केली त्याने दरमजल
पोहोचला सातासमुद्रापार

स्वर्ग उरला दोन बोटे
सरू लागला सुखद काळ
तिथेही त्याने कीर्ती मिळवली
सोडला न कधी ताळ

एके दिवशी अजब घडले
चिमणा प्रेमात पडला
निसर्गाची जादूच न्यारी
त्याने सांगावा धाडला..

परदेशी पडू नये प्रेमात
साधा नियम तो विसरला
प्रेम होईल का सफ़ल??
विचारही नाही मनास शिवला..

चिमणी होती साधी मोठी
प्रेमातील भेद तिला न ज्ञात
चिमणा रंगून सांगी तिला
काय आहे आटपाट नगरात...

एक दिवस असा उजाडला
परतण्याची वेळ आली
मी ही येणार संगतीने
चिमणी हट्ट धरून बसली

तिचे मन मोडवेना
मायदेशाची आठवण सोडवेना
तो म्हणाला,"बरं चल..!"
तिचा आनंद गगनात मावेना...

निघाले दोघे जोडीने
अंतर पडले धावणीला
समोर अथांग सागर
चिमणीला प्रवास सोसवेना

नाजूक साजूक कुडी तिची
पार थकून गळून गेली
"थांब की रे...किती वेगाने??"
म्हणून चिमण्याला थांबवू पाही..

नाजूक माझी राणी ती
म्हणत चिमणाही थांबला
दूरवर पाहून जहाज एक
त्यावर थांबायचे विचार ठरला

जहाजापर्यंतची अंतरही
चिमणीकडून संपता संपेना
खुरडत खुरडत कण्हत शेवटी
चिमणीचा पाय जहाजाला टेकला..

इथेच थांबू काही दिवस
घे जरा विश्रांती राणी..
गोंजारत त्याने चिमणीची
धाप जरा सुमारली

पण थकवा काही हटेना
चिमणी खंगत चालली
हवा तिला सोसवेना
ती झुरत चालली...

तू निघून जा पुढे
चिमणी सांगे चिमण्याला
चिमणा म्हणे,"जाऊ तर एकत्रच.."
तुझ्याशिवाय काय अर्थ जगण्याला?

दिवसामागून दिवस गेले
चिमणा चिमणी खंगत चालले
एके दिवशी जहाजावरच्यांना
त्या दोघांचे मृतदेहच सापडले..

प्रयत्न करूनही दोघांना
वेगळे करता आले नाही..
मेल्यावरही जणू दोघांनी
एकमेकांची साथ सोडली नाही

त्या दोघांचे काय करायचे..?
दिले समुद्रात फ़ेकून
समुद्रतळाशी घेताएत
चिरशांती दोघे मिळून

कळली असती प्रेमकथा त्यांची
तर गहिवरले असते सारे
समाधी बांधली असती सुंदर त्यांची
म्हणत.."प्रेम मरणातूनही उरे...!"

Thursday, February 2, 2012

एक लव स्टोरी …

तो. . . वय २५...
तसा मुळचा मुंबईचा
पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा

ती वय २२
नृत्य शिकायची
आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची,

तिचा नकार .........
पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात....
आज हि तिच्या पाठी
ती घराजवळ पोहोचते
पाठीमागून तो येतच असतो...
शेवटी हतबल होऊन ती.....

तुला नक्की हवंय तरी काय?
तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं हवंय तरी काय ...
माझ लग्न ठरलंय निर्णय झालाय...
तू आनंदी आहेस? नक्की....?
हुम्म्म ती होकारार्थी मान हलवते...

मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात...
त्यांचा गैरसमज....
आणि

डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो...
गालावरचा हात तसाच राहतो...
बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे हि नजरे आड होतात...
तिला अखेरच बघत...
तो नाहीसा होतो...

अंधार पडू लागतो..........
रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते...
अंगावर येणारा प्रकाश...
एक निमिष...
आणि मग सर्वत्र अंधार...

दोन महिने उलटतात.....
फासे हळू हळू पालटू लागतात.....
दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेय....
तिलाही कळत नाहीय अस का होतंय .................
त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती...
आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही ...
कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता ..
जीवच काही बर वाईट तर करून नाही ना घेतलं... ती फार बैचेन झाली.....
शेवटी जोश्यांकडे पोहोचते....
त्याचा मोठा अपघात झाल्याच कळत...
ती त्याचा नंबर घेते ...
घाबरत घाबरत त्याला फोन लावते...
रिंग वाजते.... फोनही उचलला जातो...
तो तिचा आवाज ओळखतो...
ती रडत असते....
रडत रडत बोलत असते....

त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात...
धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात...

तो काहीच बोलत नाही...
दोघेही भावनाविवश होतात....
तो फोन ठेऊन देतो...
ती फोनकडे बघत राहते...
तो बोलला का नाही..

दोन दिवसावर लग्न.....
आता तिला सगळ असह्य होत चाललंय..
त्याला भेटण गरजेच आहे कोणत्याही परिस्थितीत...
ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते...
त्याच्या घरी पोहोचते...
तो आत्ताच पुण्याला निघाल्याच कळत...
तातडीने पुण्याची वाल्व्हो पकडते....
सीट जवळ येते..
आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही...
तो समोर असतो,
काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात .....

तो एक कागद घेतो....
त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो...

"हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक,
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक,
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द,
कळतील तुला का ते बोल निशब्द,"

भान हरपते

कंठातील शब्द कंठात कोच्णार का.........?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...........?

कागद निसटतो ..

आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत पुढच्या मार्गाला लागतात....
मित्रानो
प्रेम हि भावना...
स्वर्ग हि जिच्या समोर जणू काहीच भासत नाही ..

Wednesday, January 18, 2012

एक लव स्टोरी …








एक मुलगा आणि मुलगी यांचे एकमेकावर खूप
प्रेम होते….
...

पण त्या मुलीचा एका अपघातात दुख:द मृत्यू होतो..
..

मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत
सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५ परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते
पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण विचारतो…..
तर ती सांगते..
..
..
..
.. ..
..
आता पुरे कर रे, किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझते.....

Wednesday, December 28, 2011

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे


या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
गोरी गोरी नसली तरी चालेल सावली दे
श्रीमंत नसली तरी चालेल गरीब दे
जी माझ्या मनाला समजेल
जी माझ्या हृदयाला जपेल ...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
गेले कित्येक वर्षे मी मित्रांच्या गर्लफ्रेंडला बघत आलो
गेले कित्येक दिवस नुसते स्वप्नेच बघत बसलो
पण देवा आता तरी ऐक न माझे
कुठे तरी सेटिंग लाऊन दे
पण देवा आता तरी ऐक न माझे
माझ्या हातात तिचा हात येऊ दे...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
जी जीवनात माझ्या सुख आणेल
माझी स्वप्ने पूर्ण करायला मदत करेल
जी दुखत माझ्या सहभागी असेल
अश्रू पुसायला प्रथम तिचा हात असेल...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
जी मी काळा का गोरा बघणार नाही
नको त्या अपेक्षा करणार नाही
जी मी श्रीमंत का गरीब पाहणार नाही
नको त्या कारणावरून भांडणार नाही...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
जी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवेल
काटेरी रस्त्यावर चालताना हात सोडणार नाही
जी विश्वासघात करणार नाही
प्रेमामध्ये कधी स्वार्थ बघणार नाही...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
आता तरी माझी हवा होऊ दे
आपल्याकडे पण आहे चिकणी पोरगी
आता तरी शायनिंग मारू दे
आपल्याकडे पण आहे पार्टी
एक एक बेअर होऊन जाऊ दे...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
वाट बघून बघून म्हातारा होईल रे मी
काही तरी जुळवून दे
स्वप्ने बघून बघून वेडा होईल रे मी
काही तरी मिळवून दे...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
ह्या वर्षाकडून खूप केल्या आहेत अपेक्षा ...
करू नको उपेक्षा
ह्या देवाकडून खूप आहेत आशा ...
करू नको निराशा.

Monday, December 26, 2011

आजही म्हणता नाही आलं


एका मुलाची कथा
७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी "बेस्ट फ्रेंड " होती ...
मला ती खरच खूप आवडायची,
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??"

कॉलेजला असताना ...

माझ्या फोन वर call आला...
तिचाचं होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती,
आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्या वर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत,
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं "बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का...?
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडीत जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... तु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी "बेस्ट फ्रेंड्स " ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला ...

PROM Night ला ...

prom NIGHT ला सगळ काही निट झालं..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION DAY ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation day आला ...
मी तिला पाहिलं ...
तीने साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझ तिच्यावर एकतर्फी प्रेम होत पण काय करणार तिच जमत नव्हत ना
आमची शेवटीची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवला ...
आणि म्हटली "आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी ...

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीचं .. तिचं दुसर्‍या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्तच नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेवढचं निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस " असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी ...

मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सर्वजन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...

7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा "

college year:"आज हि मी त्याला खोटं सांगितलं कि माझं ब्रेकअप झालं तरी हा वेडा माझ्या साठी आला "

prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बघतेय...मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."

graduation year:"किती लाजाळू आहे हा, साडीत पाहून काही बोलला नाही "

marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील..."

ते वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला....

Saturday, December 10, 2011

एका सागराची कथा




एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली


'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?


दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन....


आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी.....


मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.....


सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने


लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

Thursday, December 8, 2011

बदल


ही story आहे एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यातील मैत्रीची........

नुकताचं 10th चा result लागला होता शहरातील एका COLLEGE वर ADMITION साठी मुलां-मुलीँची गर्दी जमलेली होती,
Admition form submit करण्यासाठी खुप मोठी रांग लागलेली होती त्या रांगेत एक सुंदर मुलगी उभा होती तिच्या मागेच एक मुलगा उभा गर्दी खुप होती त्यामुळे धक्काबुक्की होणे साहाजिकच होते, त्या मुलाचा चुकुन तिला धक्का लागला तिने लगेच रागाने त्याच्याकडे पाहीले तो चटकन तिलाSORRY म्हणाला तिने काहीच ans दिले नाही .
बराच वेळ निघुन गेला दोघांनाही खुप BOAR होत होतं पण ते एकमेकांशी काहीच बोलत नव्हते !
मग थोड्या वेळाने तिनेच START केले....." तुम्हाला किती % marks मिळाले..........???"
तो गोड आवाज ऐकून तो थोडा दचकला आणि म्हणाला......."66 % " !!!
मग त्यानेही प्रतिप्रश्न केला......." आणि तुम्हाला??? "
त्यावर तिचे ans "86 %".

मग हळु हळु बोलणं वाढत गेलं , ओळख वाढत गेली म्हणजेच त्याच्यांत FRIENDSHIP झाली .
जस जसे दिवस निघुन तस तशी ही मैत्री घट्ट होती ,
ते दोघे आता एकमेकांचे खुप चांगले FRIEND झाले होते ,
ते एकमेकांशी खुप बोलायचे , problems share करायचे , सुख दु:ख वाटून घ्यायचे , कधी कधी भांडायचे पण परत एकत्र व्हायचे , एकमेकांना समजून घ्यायचे !!!
अगदी निखळ व अतुट मैत्री होती त्यांची !!!
पण या मैत्रीला कोणाची तरी नजर लागली ,
तिला आता त्याच्याशी बोलणे नकोसे वाटु लागले, ज्याच्याशी बोलताना तिला दिवस पुरत नव्हता आता त्याच्याशी टाळत होती........
ती असं का वागते आहे त्याला काही कळत नव्हतं तो तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा पण ती त्याला टाळत होती !!!
तिच्यात असा बदल का झाला ???
हा प्रश्न अनुउत्तरीत होता!!!


कोनी देऊ शकेन याचे उत्तर ???

Saturday, December 3, 2011

एक अधुरी प्रेमकथा


त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती..

तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.....

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, " तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले आहे..पुन्हा कधीच परत येणार नाही..तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच संपला......."
ती कायमची निघुन गेली...

हा मॊडुन पडला....संपलाच जणु काही....सर्व काही संपले त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ’ तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे..’

पुढे..

या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले..राब राब राबला..मित्रांनी मदत केली.चांगले लॊक भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..ती सोडुन गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता..बाहेर मुसळधार पाऊस पडत होता..गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं..भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं..त्याने गाडी थांबवली..आणि नीट पाहीलं..हे ’ तिचेच’ आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत..त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी..त्यानी आपली गाडी पहावी..आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा..असं त्याला मनोमन वाटतं होत..तिला धडा शिकवण्याच्या..अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात..हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.

"..पाहतो आणि कोसळतोच.."

तिचाच फ़ोटो..तसाच हसरा चेहरा...आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं...
हा सुन्न झाला...धावतच गेला कबरीकडे...तिच्या आईबाबांना विचारलं...काय झालं ते सांगा....

ते म्हणाले..."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला ' कर्करोग’ झाला होता..तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होतए तिच्या हातात...आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली..तू संतापुन उभा राहशील..जगशील..यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले..ती गेली...आणि तू जगलासं.....

Monday, November 28, 2011

प्रेमाची कबुली


टॅक्सीला हात दाखवून हातातील फुलांचा गुच्छ सांभाळत तो टॅक्सीत बसला. टॅक्सी त्याच्या इच्छित स्थळी पूढे चालू लागली, तसा तो आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला.


त्या दिवसांत तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचं हा त्याचा नित्यक्रम. नेहमी पुस्तकांत रमणारा तो, अलीकडे मात्र तिच्या विचारांत अधिक रमत होता. ती सुध्दा अभ्यासाला लायब्ररीत यायची, मैत्रिणींसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख, मैत्रीच्या रुपात हळू हळू खुलत होती. लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेलं.


अशाच एका संध्याकाळी ती आली. पण थोडी उदास होती.
“काय ग, झाली का ख्रिसमसची खरेदी?” त्याने तिला बोलतं करायला विचारलं.
“हो.” तिचा स्वरही जरा नाराजीचा वाटत होता.
“काय काय घेतलंस?”
“नथिंग.”
“काय झालं? चेहरा का पाडून आहेस असा?”
काही क्षण थांबुन ती म्हणाली “आम्ही आज रात्री गोव्याला जातोय. परवा ख्रिसमस आहे ना.”
तिची उदासी घालवायला निघालेला तो आता मात्र स्वतःच उदास झाला होता, पण त्यातही आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीच कारण आहे हे ध्यानात येताच क्षणभर सुखावलाही.
“अगं मग उदास होण्यासारखं काय आहे त्यात?”
“अरे.. दॅट मिन्स आता 4-5 डेज आपण…..... ” अस म्हणून तिने शब्द आवरते घेतले. “ hmm,....... तुला काहीच वाटत नाहिये ना?” ती पुढे म्हणाली.
“मला? मला काय वाटयच त्यात?..... किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मस्त एंजॉय करणार ना.” तिच्या मनात नक्की काय चाललंय हे चाचपडून पहायची संधी त्याने दवडली नव्हती. चेहर्‍यावर खोट्या हास्याची एक रेघ उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं. काही वेळातच पुस्तकं एकवटत ती म्हणाली “आय एम लिव्हींग नाऊ.”
“इतक्या लवकर?”
“हो जाते, उशीर होईल.” तिची नजर आज उठत नव्हती. कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावी.
उदास तर तोही फार झालेला. तरिही ती जाण्याआधी एकादा तिचा गोड हसरा चेहरा पहावा म्हणून जरा आनंदाचं अवसान आणत तो म्हणाला “मेरी ख्रिसमस! एंजॉय!”
ती हसली खरी, पण अश्रु मात्र डोळ्यांची कडा ओलांडू पहात होता. पण पापण्यांच्या हालचालीत तिने लकबिने तो परतावलाही.
“बरं मग, भेटु नंतर. बाय.” ती म्हणाली.
“बाय. मी तुझी वाट..” अस म्हणत तोही थबकला. त्याचे डोळेच अधिक बोलत होते.
ती निघली. त्याचं उदास मन अभ्यासात तर नक्कीच लागणार नव्हतं. जरा वेळाने तोही निघून गेला.


दुसर्‍या दिवशी संध्याकाळी लायब्ररीत येण्याचं त्याचं मन नक्कीच नव्हतं पण कारण तर होतं. अभ्यासात स्वतःला गुंतवून घेऊन ४-५ दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत आला. आज मात्र कुणाची वाट पहायची नव्हती आणि समोरची खुर्चीही रिकामीच असणार होती. त्याचे डोळे पुस्तकांमधल्या अक्षरावरून फिरत तर होते, पण मन मात्र तिची सुरेख छ्बी रेखाटत होतं. तिचं ते खळखळून हसणं, गालातल्या गालांत गोड लाजणं, तो वाचनात गुंग असताना त्याच्याकडे एकटक पहात रहाणं, आणि त्याचं लक्ष जाताच लगबगिने नजर पुस्तकांत वळवणं. कधीतरी मनातल्या भावना चुकून ओठांवर आल्याच तर बोट दातांमध्ये दाबत तिथुन गडबडीने निघुन जाणं. या त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या मनात दाटिवाटी करत होत्या. अशाच सगळ्या आठवणींची उजळणी करत असताना त्याची नजर सहज वर गेली आणि पहातो तर काय.. ती समोर बसली होती. त्याला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
“अगं तू गोव्याला जाणार होतीस ना?” त्याने आश्चर्याने विचारलं.
“नाही गेले.”
“का?”
“नाही जावसं वाटलं.”
“अग पण..”
त्या क्षणी काही समजलं नसलं तरी ती कदाचित आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या. उठून नाचावं इतका उत्साह संचारला होता त्याच्या शरीरात, पण त्याने मनाला आवर घातला. पुस्तकावर त्याची नजर टिकत नव्हती सारखी फिरून तिच्या चेहर्‍यावर जाई. ती मात्र शांतपणे वाचत बसली होती.


दिवस असेच उलटत होते. पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये नित्याच येणं कमी झालं होतं आणि आली तरीही शांत असायची, कमी बोलायची, तिच्या नजरेतून सतत तिच्या मनावर कसलं तरी दडपण असल्यासारखं जाणवायचं. फार गंभीर वाटायची. तिचं हे असं वागणं त्याला खटकत होतं. त्याने अनेकदा तिचं शांत रहाण्यामागचं कारण विचारण्याचा, तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण ती प्रत्येक वेळी “काही नाही.” सांगुन टाळायची. बरेचदा तो बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत बसयची.


हा हा म्हणता एक दिड महिना उलटला.
‘तिला अपेक्षित असेल माझाकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबूली?…… हो, असेल कदाचित.’
‘मला जे तिच्याबद्दल वाटतं, तेच तिला माझ्याबद्दल वाटतं असेल?…… हो, मला आहे खात्री.’
‘पण जाती धर्माचं काय? मला काही फरक नाही पडत, पण तिला?…… नाही पडणार.’
एका मनाने प्रश्न विचारले…. आणि दुसर्‍याने सोईस्कर उत्तरंही दिली...!


त्याची चलबिचल थोडी कमी झाली, त्याने ठरवलं की ‘व्हेलेंटाइन डे’ला आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल, त्या तिला सांगायच्या.


तो दिवस येऊन ठेपला. आज ते पहिल्यांदाच लायब्ररीबाहेर एका नवीन रम्य ठिकाणी भेटणार होते. तो फार आतुरतेने तिची वाट पहात येरझार्‍या घालत होता. एवढ्यात ती समोर आली.
“खुप सुंदर दिसतेयस तू आज.” ती शरमली आणि तिने मान पायाच्या अंगठ्यावर वळवली.


हातातलं ते लाल गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला. “श्रावणी, मला काही सांगायचं तुला ...." ... "हं, सांग न..." "श्रावणी.... माझं..... माझं.... खुप प्रेम आहे तुझ्यावर...... आय लव्ह यु श्रावणी .... आय लव्ह यु सो मच..... !!! ”
तिने चमकून वर पहिलं. हळुवार हात पुढे करत ते गुलाब तिने हातात घेतलं. याच क्षणासाठी आसुसलेल्या त्या नजरेने ती एकटक त्याच्याकडे फक्त पहात होती. तिच्या डोळ्यांत पाणी दाटून आलं होतं. त्याचीही नजर तिच्या चेहर्‍यावरून हटत नव्हती.
“बोल ना काहीतरी.” तो तिचा हात हातात घेत म्हणाला.
ती लगेच भानावर आली, “ मीही खूप प्रेम करते तुझ्यावर..... आय लव्ह यु टू श्रेयस ” लाजत तिने म्हटले...
त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचित क्षण तो अनुभवत होता.
श्वासांना सांभाळत तो पूढे म्हणाला “कधी पासून?”
“पहिल्याच भेटीपासून..... ” ती म्हणाली.
त्याला आकाश ठेंगणे झालं होतं. त्याने रंगलवलेली स्वप्नं पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होती. ती स्मितहास्य करत डोळे भरून त्याच्याकडे पहात होती.
“आपण लग्न पुढल्या वर्षी करु.” स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याने पहिलं पाऊल टाकलं “तोपर्यंत माझी डिग्री पण पूर्ण होईल आणि तुझी पण. चालेल ना तुला?”
ती नुसती त्याच्याकडे बघत होती, तिला त्याच्या चेहर्‍यावरचा आनंदाचा एकही क्षण हरवायचा नव्हता. पण दुसर्‍याच क्षणी कशाची तरी आठवण झाल्यासारखा तिच्या चेहर्‍यावर अचानक गांभिर्य आलं “पण.. पण..” ती खालच्या आवाजात म्हणाली.
“पण काय?”
“मी लग्न नाही करू शकणार तुझ्याशी.”
“काय?” तिच्या या अनपेक्षीत नकाराने तो गोंधळून म्हणाला. जी स्वप्न काही क्षणांमागे पाहिली होती त्यांच अस्तित्व धोक्यात होतं.
“म्हणजे? पण प्रेम करतेस ना तू माझ्यावर?”
“हो. खुप, इतकं की कदाचितच कुणीतरी करू शकलं असेल.”
“जर, इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मग.. मग.. लग्न का नाही करू शकत माझ्याशी?” त्याने आवंढा गिळला आणि जरा गंभीर आवजात म्हणाला “मी गरीब आहे म्हणून, की आपली जात वेगळी आहे म्हणून?” त्याचेही डोळे ओलावले होते.
“अस काय कारण आहे तुझ्या नकाराचं?”
तिच्या नजरेतून प्रेम ओसांडत होतं, तरी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहात ती स्तब्ध ऊभी होती. तिच्या डोळ्यातील आता अश्रू गालांवर ओघळत होते
“अग बोल ना काहितरी, की अजून काही वेगळं कारण आहे?” आता मात्र त्याच्या आवाजाचा रोख चढत होता. तिच्या या अशा गप्प रहाण्याने त्याला अधीक चीड येत होती. तरीही स्वतःला सावरत तो परत एकदा प्रश्न करणार, तेव्हढ्यात ती म्हणाली “जाते मी.”
“जाते? मला हे असं कोड्यात टाकून?”
“मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवय श्रावणी”
“मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय, अँड विल ऑल्वेज लव्ह यु.” त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये भरून घेत ती म्हणाली. तिच्या नजरेतले हे असे भाव या आधी त्याने कधीच पाहिले नव्हते.
“पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आणि आता मला जायला हवं खुप उशीर झालाय. मी जाते.” म्हणत ती वळली, त्याने तिचा हात पकडून तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सोडवत पाणावलेल्या डोळ्यांनी तिची पावलं मागे मागे पडत होती. तिच्या या अशा वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत होता.
“काय अर्थ घ्यावा मी तुझ्या या अशा वागण्याचा? माझ्या प्रेमाचा असा अपमानच करायच होता तर आलिसंच का माझ्या आयुष्यात? का दाखवलीस मला इतकी स्वप्न? जी तुला कधी पुर्ण करायचीच नव्हती. जा तू इथुन. निघुन जा.” असं म्हणत त्याने तिच्याकडे पाठ वळवली. घडला प्रकार त्याला सहन होत नव्हता. त्याच्या चेहर्‍यावर अश्रुंची धार लागली होती.
तरी स्वतःच्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी म्हणून तो वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. ती गेली होती. तो तसाच काही क्षण स्तब्ध उभा होता. तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदून जावं की तिच्या लग्नाच्या नकाराने दुःखी व्हाव हे त्याचं त्यालाच समजेनासं झालं होतं. तो तसाच निराश, निर्विकार, शुन्यात नजर लावून एका दगडवर बसून राहीला. हळू हळू अंधार वाढू लागला, शेवटी जड पावलांनी तो घरी परतला.


रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती. मनात विचारांच काहूल माजलं होतं. ‘का केलं असावं तिने अस? मग इतक्या महिन्यांमध्ये जे आमच्यामध्ये घडत होतं ते काय होतं? मी तिला ओळखायला चुकलो का?…. नाही.. ती अशी नाही. पण मग तिचा हा असा लग्नाला नकार, काय कारण असेल? तिला कुणीतरी दुसरं…. नाही…नाही…’ त्याला मनातही या गोष्टिंचा विचार करवेना. पण तिच्या आजच्या वागण्याचं गुढ त्याला उलघडत नव्हतं. एका क्षणासाठीही या विचारांतून तो आपली सुटका करून घेत नव्हता. ती परत कधी एकदा समोर येते असं त्याला झाल होतं. परंतु दुसर्‍या दिवशी तिच्या येण्याची वाट बघेपर्यंत त्याच्याजवळ पर्यायही नव्हता.


दुसर्‍या दिवशी तो वेळेत लायब्ररीत आला, मात्र वेळ उलटून गेली तरिही ती आली नव्हती. त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती. तिच्या वाटेवरून त्याची नजर क्षणासाठीही हटत नव्हती. पण ती नाही आली. पुढील ४-५ दिवस असच चालू होतं. ‘ती का येत नाहीये? का अस वागतेय ती माझ्याशी?’ त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती. सततच्या विचाराने तो फार हैराण झाला होता. पण त्याचा निर्णय पक्का होता, काहिही झालं तरी तिच्या नकाराचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आणि कसही करून लग्नासाठी तिचा होकार मिळवायचाच हे मनाशी त्याने पक्कं ठरवलं होतं.


मागचा पुढचा काहीच विचार न करता त्याने सरळ तिच्या घरचा रस्ता धरला. पण आता त्याच्या समोर एक नवीन प्रश्न होता तो, अचानक त्याला समोर पाहून ती कसं वागेल याचा.
‘जर तिला माझं असं घरी अचानक येण आवडलं नाही तर, आणि तिच्या घरचे? पण माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाहिये.’
जस जसं तिचं घर जवळ येत होतं त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि तिला बघायची आसही. एव्हाना तो तिच्या घरी येऊन पोहोचला. बेल वाजवणार तेव्ह्ड्यात त्याचं लक्ष दारावरच्या कुलूपाकडे गेलं. काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजार्‍यांना विचारून पाहणं सोईस्कर वाटलं. त्याने शेजारच्या दरवाजा खटखटवला. एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडत प्रश्न केला. “कोण पाहिजे?”
“हे तुमच्या शेजारी राहणारे कुठे बाहेर गेले आहेत का?” त्याने श्रावणीच्या घराकडे बोट दाखवत विचारलं.
“तू कोण?”
“मी श्रेयस, श्रावणी चा फ्रेंड, ४-५ दिवसांपूर्वी ती भेटली होती, त्यानंतर लायब्ररीत आली नाही म्हणून आलो तर घर बंद.”
“काय? किती दिवसांपूर्वी?”
“साधारण ४-५ दिवसांपूर्वी.”
“तू कोणत्या श्रावणीबद्दल बोलतोयस नक्की? पत्ता बरोबर आहे ना?” त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं.
“हो काकू तिनेच पुर्वी सांगितला होता मला.” त्याने विश्वासाने सांगितलं.
“तू काहितरी चुकतोयस. हे घर श्रावणीचेच आहे पण तुझी फ्रेंड श्रावणी कोणीतरी वेगळी असावी.”
“नाही काकू हाच पत्ता आहे. ती एम. ए. करतेय ना आणि रोज लायब्ररीत यायची अभ्यासाला.”
“हो पण...... पण, हे कस शक्य आहे?” ती स्त्री जरा विवंचनेत पडली.
“का? काय झालं? असं का म्हणताय तुम्ही?”
“हे घर गेले दिड महिना बंद आहे. श्रावणी आणि तिचं कुटुंब ख्रिसमससाठी गोव्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला, फार भिषण अपघात होता. सगळे जागीच ठार झाले. मग कशी भेटेल ती तुला?”
“ क.... काsssय?” असं मोठ्याने ओरडत त्याने हाताच्या मुठी आवळल्या त्याचा श्वास त्याच्या कंठात अडकला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या बाईचे शब्द त्याच्यावर आभाळ होऊन कोसळले होते. त्याच्या हातांनी बाजूला असलेल्या खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला पण त्याची पकड निसटून तो खाली कोसळला. त्याला सावरायला ती स्त्री पुढे आली पण तो आधार नाकारत कसातरी उठून उभा राहीला... त्याला धड बोलताही येत नव्हते, तो कसातरी अडखळत बोलला, "तुम्ही खोटे बोलताय का? ..... हे असं होणं कसं शक्य आहे?..... अहो आम्ही गेले दीड महिने झाले भेटतोय केवळ गेले चार पाच दिवस झाले ती नाही भेटली.... म्हणून तर आलोय मी.... " ती स्त्री त्याच्या कडे तो कदाचित वेडा आहे अशा नजरेने बघत होती..... ती म्हणाली "हे बघ, मला वाटतेय तुला काहीतरी भास झाला असावा, मी खरे तेच सांगितले आहे तुला.... त्यांना जाऊन आता दीड - दोन महिना होत आलाय...... आता तर त्यांचे कोणी नातेवाईक पण इथे राहत नाहीत " त्याची अवस्था पाहून त्या स्त्री ने त्याला पाणी आणून दिले... पण, तो ते नाकारून जड पाऊलांनी परत तिच्या घराजवळ आला. फाटका आडून ते बंदिस्त घर पहाताना त्याच्या पापण्या लवत नव्ह्त्या. मन सुन्न झालं होतं शरीर गोठून जावं तसा तो एका जागी खिळून उभा होता. त्या स्त्रीचे आघाती शब्द त्याचं मन स्विकारू पाहत नव्हतं, पण ते सतत परावर्तीत होऊन त्याच्या कानावर आदळत होते. एकाएकी वास्तवाची जणीव व्हावी तसा एका जोराच्या हुंदक्यासरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले “श्रावणी ss….” आणि तो ओक्साबोक्षी रडू लागला...."


“साहेब ह्या समोरच्या रस्त्याने घेऊ ना गाडी?” टॅक्सी ड्राइव्हरच्या प्रश्नाने तो एकदम भानावर आला, डोळे पुसत त्याने होकारार्थी मान हलवली. .... " माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली, ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुली साठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती....." " जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर….. पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीला होता.... श्रावणी.... परत ये एकदाच.... " नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे तेच खेळ सुरु झाले.....


आज व्हेलेंटाइन डे, त्याच्यासाठीचा तिच्या वास्तव्याचा अखेरचा दिवस. या घटनेला आता १७ वर्षे उलटली, तरी तिच्या आठवणी त्याच्यासाठी जराही पुसट झालेल्या नव्हत्या. लग्नाच्या बंधनात तो तिला बांधु नाही शकला, पण तिच्या प्रेमाच्या बंधनातून त्याने आजही स्वतःला वेगळं केलं नव्हतं. तिच्या त्या सगळ्या आठवणी त्याला कधी हसवतात तर कधी आसवं देऊन जातात, पण रागाच्या भरात त्याच्याकडून उच्चारून गेलेले त्याचे शब्द ‘जा तू इथुन. निघुन जा.’ त्याला आजही मरणयातना देतात.


“बस, थांबव इथे.. .” स्मशानभूमी येताच पाकिटातील पैसे काढत तो म्हणाला.
“साहेब, रीटर्न साठी थांबू का?”
“नको, मला वेळ लागतो, भरपूर बोलयचं असत तिच्याशी.” म्हणत तो टॅक्सीबाहेर उतरून तिच्या ग्रेव्हच्या दिशेने चालू लागला.

Friday, November 25, 2011

एक छोटीशी कहाणी


ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत
पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत
मध्ये येताच क्षणी त्याची नजर
पुढच्या दरवाज्या जवळ… तो पूर्णपणे
कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच
शोधात असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं ..
पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं..
त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर..
तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने
गर्दीतून शेवटी वाट काढत
पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली..
रुमाल काढून घाम पुसला..लगेच
काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल
फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर
शोधून..लगेच फोन केला.. नुसताच हेलो हेलो ऐकू
आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने
पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज..
शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..!
पण..शांत राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत
होता..कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!
खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती..
रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे
ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे..
रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून...
त्याने तिला दिलेलं स्मितहास्य..अन त्यावर..तिने
ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत
गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले..
जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास
सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण
नियतीला ते मान्य नव्हतं..घडू नये तसचं घडलं..
एके दिवशी अचानक....ट्रेन मध्ये आरडा ओरडा....
बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन
थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे
वातावरण भयानक.. "कोणी चैन खेचा चैन
खेचा..मुलगी पडली " अशा हाका. ट्रेन मधले लोकं
उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली..
पण ... ट्रेन थांबण्या आधीच ..सार संपलं होतं...
तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून
पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म
मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच..
तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे
समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती..
सार निःशब्द.. हृदयाचे ठोके चुकले...या
परिस्थितीत काय करावं..त्याला काहीच कळत
नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी..
राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण
त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतं…नुसतं
स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला ….
मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा..
त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण
आठवायला लागले... आपलं माणूस आपल्याला कायमचं
सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय
अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट
धरली होती... आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं..
ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला..
त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .
आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच..
त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल
मध्ये चढल्यावर...असाच काहीसा तिला तो रोज
शोधत राहतो..अन...नंतर परत.. सार आठवून .
भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत
बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे
आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण
नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत
याचा विचार करा.. घाई.. ऑफीस... सगळ्यांच्याच
नशिबी असतं..पण जीवन हे अमूल्य असतं..
ह्याचा विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास
करा..

Tuesday, November 22, 2011

एका हरणाची कथा


एकदा एक शिकारीला जंगलात जातो . 
एका पाणवठ्याच्या जवळून जात 
असताना त्याला एक हरिण दिसतं . 
तो त्याच्यावर धनुष्याने नेम धरतो . 
तो
बाण सोडणार , एवढ्यात ते हरिण वळून त्याच्याकडे बघतं . 
त्या हरणाची 
ती काळिज चिरणारी नजर बघुन शिकारी हातातले धनुष्य विसरतो आणि शिकार न करताच
घरी येतो . 
दुसर्या दिवशी तो शिकारी परत त्याच जंगलात जातो. 
कालच्याच जागी त्याला तेच हरिण दिसतं . 
परत तो त्याच्यावर नेम धरतो 
आणि सगळं कालच्याप्रमाणेच घडतं . 
त्या हरणाची ती कासाविस करणारी नजर 
त्याला विचित्र वाटते . 


या सगळ्या प्रकाराचा एकदाच सोक्षमोक्ष 
लावायचा या विचाराने हि गोष्ट तो जंगलातल्या एका थोराड अदिवासीला विचारतो . 
तो
अदिवासी त्याला सांगतो कि हे हरिण दररोज या ठिकाणि याच वेळी येतं ते आम्ही
वाजवतो तो ढोल ऐकण्यासाठी . 


यावर त्या शिकार्‍याचा विश्वास बसत नाही 
कारण झाडांच्या पानांचा आवाज झाला तरी वार्याच्या वेगाने पळणारी हि हरणाची 
जात एवढं धाडस कसं करील. 
यावर तो शिकारी म्हणतो कि बाबारे ते हरिण हे
धाडस करतं..... 
. 




कारण 'या ढोलावरचं जे कातडं आहे ते त्या 


हरणाच्या जिवणसाथिचं  आहे'!!!!!!

Monday, November 21, 2011

खुर्ची




ऐके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी ऐक खुर्ची पाठवतो .
ती खुर्ची खूप खास असते .
कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो
आणि जर
... त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणार असतो
मुलगा त्या खुर्ची वर बसतो
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो
मुलगी : घाबरू नकोस . देवाची काहीतरी चूक झाली असेल हि खुर्ची बनवताना
आपण परत एकदा प्रयत्न करून बघू
मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जावून बसतो .
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो ( लगेच हिरवा दिवा पेटतो )
काही कळल का तुम्हाला ?
जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसला
तोपर्यंत तरी त्या मुलाच त्या मुलीवर खर प्रेम नव्हत .
पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि तो तिच्यावर खर खुर प्रेम करू लागला
यालाच म्हणतात प्रेम .................




तात्पर्य:- म्हणून लक्ष्यात ठेवा मित्रानो ऐक तर्फी प्रेम सुद्धा यशस्वी होऊ शकत
फक्त तुमचा तिच्यावर / त्याच्यावर असेलला विश्वास कुठेही कमी झाला नाही पाहिजे

Sunday, November 20, 2011

मी नसेन तर,


"एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावून बसलो, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली..


"मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील?"
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
... कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील? कोणाच्या आसवांना टिपशील? कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील? कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील? कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?


बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील, समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल, ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?
कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताच मोबाइलवर लक्ष नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?


मी नसेन तर,
तुला चित्रपट रटाळ वाटेल, सुंदर धुनही बेकार वाटेल, पुस्तकही नाराज वाटेल, मनातून नक्की तळमळशील..
दिवसभर दुसर्‍यांच्या चाणाक्ष नजरेपासून लपशील, उगाच किनार्‍यावर माझी वाट बघशील...
संध्याकाळी हुर-हुरशील, माझ्या आठवणीने बेचैन होशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील,
गर्दीतही एकटा राहशील, पुन्हा पुन्हा मागे पाहशील, मी नजरेस पडणार नाही,
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील कुठेतरी...
तू लाख स्वत:ला रमवशील, दुसर्‍यांमध्ये स्वत:ला हरवशील, नवीन नात्यांना जोडशील....
पण खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले, आणि त्याने जोराची मिठी मारली तिला,,
तो म्हणाला, "तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होते जनू मी शेवटचे श्वास मोजत होतो, तुला हरवण्याची कल्पनाच इतकी दुख देत होती तर तू खरच नसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन ग! काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू, एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू, खरच हृदयापासून तू मला हवियेस,
आणि एक सांगू"
ती बोलली काय..
तो म्हणाला " Sorry, I Love you"


मित्रानो खरच हे प्रेम खूप नाजूक भावना असते त्याला जपून ठेवा, छोटीशी चूक ही जीवनभरचा पश्चाताप बनु शकते.