कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, November 22, 2011

एका हरणाची कथा


एकदा एक शिकारीला जंगलात जातो . 
एका पाणवठ्याच्या जवळून जात 
असताना त्याला एक हरिण दिसतं . 
तो त्याच्यावर धनुष्याने नेम धरतो . 
तो
बाण सोडणार , एवढ्यात ते हरिण वळून त्याच्याकडे बघतं . 
त्या हरणाची 
ती काळिज चिरणारी नजर बघुन शिकारी हातातले धनुष्य विसरतो आणि शिकार न करताच
घरी येतो . 
दुसर्या दिवशी तो शिकारी परत त्याच जंगलात जातो. 
कालच्याच जागी त्याला तेच हरिण दिसतं . 
परत तो त्याच्यावर नेम धरतो 
आणि सगळं कालच्याप्रमाणेच घडतं . 
त्या हरणाची ती कासाविस करणारी नजर 
त्याला विचित्र वाटते . 


या सगळ्या प्रकाराचा एकदाच सोक्षमोक्ष 
लावायचा या विचाराने हि गोष्ट तो जंगलातल्या एका थोराड अदिवासीला विचारतो . 
तो
अदिवासी त्याला सांगतो कि हे हरिण दररोज या ठिकाणि याच वेळी येतं ते आम्ही
वाजवतो तो ढोल ऐकण्यासाठी . 


यावर त्या शिकार्‍याचा विश्वास बसत नाही 
कारण झाडांच्या पानांचा आवाज झाला तरी वार्याच्या वेगाने पळणारी हि हरणाची 
जात एवढं धाडस कसं करील. 
यावर तो शिकारी म्हणतो कि बाबारे ते हरिण हे
धाडस करतं..... 





कारण 'या ढोलावरचं जे कातडं आहे ते त्या 


हरणाच्या जिवणसाथिचं  आहे'!!!!!!

No comments: