समुद्र किनार्यावर एका बिळात एक खेकडा राहत होता ..
किनार्यावर आदळणाऱ्या लाटा सोबत त्याची मैत्री झाली..
खेकडा दररोज किनार्यावरील वाळूवर मस्त स्वछंद फिरायचा..
आपल्या नक्षीदार उमटलेल्या पावूलखुणा पाहून..
खूप आनंदी व्हायचा...
असेच एके दिवशी..
तो किनार्यावर फिरताना..
अचानक जोराची लाट आली..
आणि त्याच्या पावूल खुणा पुसून गेल्या.
त्याला लाटांचा खूप राग आला तो रागानेच म्हणाला तू मैत्रीत असे करायला नको होते..
माझ्या छान उमटलेल्या पावूल खुणा तुला चांगल्या नाही वाटल्या म्हणून तू हेव्यापोटी त्या मिटवून टाकल्यास...
लाटांना काय बोलावे सुचेना..
त्या म्हणाल्या मित्रा मला तुझा हेवा नाही वाटला..
तो बघ तिकडे किनार्यावर कोळी खेकडे शोधतोय..
तुझ्या पावूल खुनाच्या मागावरून तो तुझ्या बिळाचा शोध लावील व तुझी शिकार करेल..
आणि मी तुला पुन्हा भेटू नाही शकणार..
म्हणूनच मी ये सारे केले.....
........मैत्री आणि प्रेम .. असच असावे..
No comments:
Post a Comment