कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, January 3, 2012

मैत्री

मैत्री नेहमी अशी असावी सहज निभावता येणारी

इतर नात्यापेक्षाही जास्त पावित्र्य जपणारी

दुनियाच्या वणव्यात वावरताना शांत सावली देणारी

तहानलेल असताना अगदी गोड स्वच्छ पाण्याची चव देणारी

नेहमी न सांगता सामंजस्य जपणारी

श्वास संपून गेला तरीही जिवंत असणारी

क्षणभर जगुन आयुष्यभर स्मरणात राहणारी

नेहमी या दुनियेला भगवान "श्रीकृष्ण" अणि "सुदामा" यांची आठवण करुन देणारी....

मी आता शिकलोय ..

मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ...

आता मी दुख: लपवायला शिकलोय..
आपल्या लोकांबरोबर खोटं बोलायला शिकलोय..

झाले गेले विसरून पुढे जायला शिकलोय..
चेहर्‍यावरती कृत्रिम भाव आणायला शिकलोय..

असंख्य जखमा मनात ठेवून खोखो हसायला शिकलोय..

ढळढळ न रडता हळूच डोळ्यातील पाणी पुसायला शिकलोय..

अंतरंगातील आठवणी तश्याच ठेवून नवीन गोष्टीकडे पाहण्यास शिकलोय..

भूतकाळात जास्त न डोकावता भविष्याचा वेध घ्यायला शिकलोय..

चुका झालेल्यांना माफ करण्यास शिकलोय..

पण आपले म्हणणे त्यांना ठाम सांगायला पण शिकलोय..

गोडी गुलाबीने वागून कामे पूर्ण करवून घेण्यास शिकलोय..

दुसर्याँचा उपयोग कसा करून घ्यावा हे नक्की शिकलोय..

आपले कोण परके कोण हे ओळखण्यास शिकलोय..

मी आता खरोखर खोटे खोटे जगायला शिकलोय ..