कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, May 31, 2012

मैत्रीण

कॉलेज मध्ये आपल्या खूप मैत्रिणी असतात,
पण जी आपल्याला पाहुन सुंदर smile देते ना,
ती आपली खास मैत्रीण असते.
जी आपल्याला रोज SMS करते,
आणि जिच्या SMS la आपल्याला पण छान
Reply द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास मैत्रीण असते.
जिच्याशी बोलताना आपल्याला खूप मजा येते,
पण तिच्या नजरेला नजर देऊनआपण कधी बोलू शकत नाही,
ती आपली खास अशी मैत्रीण असते.
तिची पण अवस्था काही निराळी नसते,
कारण, ती पण आपल्याशी बोलणे टाळत असते ना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते,
ती कधी कॉलेजला नाही आली तर,
जीची आपल्याला विचारपूस करावीशी वाटते
ना,
ती आपली खास मैत्रीण असते.
कधी मित्र-मैत्रिणींशी बोलताना जी आपली
बाजू घेऊन बोलते ना,
ती आपली खास मैत्रीण असते,
जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक दाद देतेना,
ती आपली खास अशी मैत्रीण असते

पाऊस

आता पुन्हा पाऊस येणार.... आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार, मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार, मग तूझी आठवण येणार, काय रे देवा..... मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार, मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार, मग ते कोणितरी ओळखणार, मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तरचिडणार, मग नसतच कळल तर बर, असं वाटणार... आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार.. काय रे देवा..... मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्, मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्, मग ते लतानी गायलेल असणार्..., मग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्, मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्.... काय रे देवा..... मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्.., मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्...., मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्..., मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्, पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्, काय रे देवा..... पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्, मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्, मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्, मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलंआलं शोधंणार्, एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्, मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार..... काय रे देवा..... पाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्षीही पडणार्.... काय रे देवा....