कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, November 23, 2011

काहीं चारोळया 3


नात्यामध्ये गुंतायचा नसतं,, 
नात्याला आपण गुंफायचा असतं..!! 
होवून कोळी जाळ आपणच विणायचं असतं,, 
कोळ्या सारखाच मात्र मुक्त फिरायचं असतं..!


"तू भेटशील तेव्हा,
खूप काही बोलायचे आहे . .
थोडे फार भांडण आणि,
खुपसे प्रेम करायचे आहे .. "­ ­


झरे आणि डोळे यांना वाहने फक्त माहित असते
फरक एवढाच कि ,
झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत
आणि डोळे ......
कुणाच्या तरी"आठवणीत"


प्रेम कस असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय


तुझ्याविण खरंच,
अडतंय सगळंच..
जणू भरलेलं आभाळही
भासतंय मोकळंच


No comments: