कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, November 10, 2011

यदा-कदाचीत


यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।


कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे झूरावे ।


महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे ।


राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे ।


कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई
म्हणून मी तीच्यावर रागवावे ।


दोन दिवस अबोला पाळुन एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे ।


यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे ।

No comments: