आता कुठे सवय झाली तुला रोज स्वप्नात पहायची
तू स्वप्नात तरी भेटशील म्हणून रोज वाट पहायची
बंद डोळे तुला स्वप्नात तरी पाहतात
नाहीतर तू समोर असलास कि मला सगळे भासच वाटतात?
स्वप्न आणि सत्यातली हि गफलत तू दूर करून जा
स्वप्न जर खोटे असेन तर ती झोप मोडून जा
मीच स्वप्नाची पतंग खूप दूर उडवली
जेव्हा दोर कापला तेव्हा जमिनीवर कोसळली
आता माझे पाय अगदी जमिनीवर आहेत
पूर्वी आकाशाची ओढ भरकटून न्यायची
आता सूर्याच्या तेजाची बरोबरी नको करायला
फक्त काजवा व्हायचंय स्वतःला प्रकाशमान करायला
स्वप्न आणि सत्य यात फरक ओळखायला.......
No comments:
Post a Comment