दुसर्याच्या चुका स्वतःच्या माथी घेवून
शिक्षा मी आयुष्यभर भोगली
पण खंत एकच मनात कि
त्याला ती चूक आजपर्यंत नाही कळली
कित्येक उन्हाळे डोळे बरसून गेले
पण त्याला एकाही पावसाळ्यात आठवण नाही झाली
वाटले कधी त्याला पण कळेल माझे बलिदान
पण समजायला वेळ पण आता टळून गेली
जरी आनंदाचे झरे आटून गेले
तरी अश्रूंच्या पुराने किनारी आणले होते
सुखाची साथ नाही मिळाली म्हणून काय झाले
दुखा:ने सोबत मात्र कायम केली होती
जगाने गुन्हेगार मानले तरी चालेल
जन्मठेपेची शिक्षा मी पुन्हा भोगेन
ज्या दिवशी तू हाच आरोप करशील
देहदंडाची शिक्षा पण तेव्हा अपुरी वाटेन
आयुष्यात तुझ्या स्थान नाही मागत
हृदयात अगदी छोटी जागा चालेन …
No comments:
Post a Comment