कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, November 2, 2011

फुलपाखरू

एका बागेत दोन फुलपाखरू होते.एक होता नर तर दुसरी होती मादी,ते नर-मादी फुलपाखरू एकमेकांवर खूप प्रेम करत होते.

पण तरी त्या मादिफुलपाखारूला बगायचं असत कि कोण कोणावर सर्वात जास्त प्रेम करत.त्याच वेळी त्या बागेत त्यांना एका झाडावर एक काळी दिसली.ती काळी दुसर्या दिवशी फुलणार असते,म्हणून नर-मादी फुलपाखरू दोगही त्या कली जवळ जातात.त्या काळी जवळ गेल्यावर ती मादिफूलापाखारु त्या नार्फुलापाखाराला बोलते कि जो कोणी उद्या हि कली फुलल्यावर त्या फुलाजवळ येईल तो आपल्या एकमेकांवर (जीवापाड)जास्त प्रेम करतो.नर फुलपाखराला ते पटल्यावर ते दोघेही तिथून निघून जातात.

नंतर पुन्हा नरफुलपाखरू त्या कली जवळ येतो.आणि छोटस भोक पडून त्या कळीत जातो.दुसर्या दिवशी जेव्हा मादिफुलापाखरू त्या फुलाजवळ येते,तेव्हा तिला वाटते कि मी या फुलाजवळ पहिली आले.म्हणजे मी त्याच्यावर खूप प्रेम करते,पण ती त्या फुलामध्ये जेव्हा पाहते तेव्हा तिचा "प्रेमपिपासू" नरफुलापाखरू त्या फुलामध्ये गुदमरून मेलेला असतो.

तो तिच्यावर इतके प्रेम करत होता कि त्यानं त्याचा जीवाचा हि विचार केला नाही.शेवटी तिलाही कळत कि तो आपल्यावर किती प्रेम करत होता.

No comments: