कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, November 2, 2011

तुजवीण सखे, दिस नाही सरत..

तुजवीण सखे, दिस नाही सरत...
कंठामधल्या शब्धांमध्ये प्राण नाही उरत.
काळ्याभोर राती सुन्या स्वप्नांचा सडा,
किर किर कीड़ा देई स्वप्नांना तडा...

मधुनच कधीतरी जाग येते मला,
ओलेचिंब डोळे पुन्हा शोधू लागतात तुला...
आभासाने या सखे जीव जातो माजा,
वेडया काळजाला फक्त ध्यास लागतो तुजा ..
आतातरी ये सखे, कशासाठी मला छळे? ये ना सखे.....

विरहाच्या दुनियेत मन नाही रमत.
पुरे जाले सखे, तू ये आता परत...
तुज्यावाचुन एक क्षण नाही जगु शकत,
मरावेसे वाटते पण नाही मरू शकत...

कशासाठी, कोण जाणे, व्हावी अशी दैना?
जिवाहून प्यारी माजी उडून गेली मैना.
मंद मंद वारा तुजी चाहुल देई मला,
आठवणींच्या गजरयांची माळ घालेन तुला.
अगं अगं वेडे, किती सतावते मला,
बस जाले, ये आता, शपथ आहे तुला ...

No comments: