एकदा एका नास्तिक माणसाला देवाची खोडी काढण्याची लहर आली.
त्यासाठी त्याने एक युक्ती योजली.त्याने एक छोटेसे पक्ष्याचे पिल्लू आणले.
ते त्याने आपल्या मुठीत ठेवले आणि देवाजवळ जाऊन म्हणाला, हे देवा,
तुला सगळे जण श्रेष्ठ मानतात. तू सर्वांना खरे भविष्य सांगतोस, सर्वांचे कल्याण करतोस,
... मग माझ्या मुठीत असणार्या प्राण्याचे भविष्य आता सांग, माझ्या मुठीत असलेला पक्षी
जिवंत आहे का मृत हे सांगितलेस तरच तू सर्वश्रेष्ठ, नाही तर तू देवच नाही, 'असा देवाला
प्रश्न करून तो मनातल्या मनात आनंदी होऊ लागला. कारण त्याने ठरवले कि जर देवाने सांगितले
कि, हा पक्षी जिवंत आहे तर त्याला लगेच मारून टाकायचे आणि देवाला खोटे ठरवायचे.
त्याच्या मनातील इच्छा ओळखून देव म्हणाला, ' तुझ्या मुठीत असलेल्या पक्षाचे भविष्य माझ्या
हातात नसून तुझ्याच हातात आहे. जर तू ठरवलेस तर तो जिवंत राहील.
मला खोटे ठरवण्यासाठी तू काहीही करशील. यावर तो नास्तिक माणूस ओशाळला. आणि देवाची माफी मागितली...
तात्पर्य-: देवाची परीक्षा घेणे म्हणजे निसर्ग नियमांना आव्हान करणे ....
No comments:
Post a Comment