एक नाते असे होते कि नाव द्यायचे राहून गेले
थोडे मैत्रीच्या वर होते
त्याला पार करणे राहून गेले
एक नाते नाव द्यायचे राहून गेले
मैत्रीत वादपण व्हायचे
कधी अबोलापण धरायचे
कधी मैत्रीदिनाला
पांढरे फुल तरी एकमेकांना द्यायचेच
माहित नाही मित्र होता कि शत्रू
हेच ओळखायचे राहिले
एक नाते नाव द्यायचे राहून गेले
मी जरा हट्टी तो थोडा जास्त होता
तो बोलेल आधी हाच माझा हेका होता
रोज दुपारी त्याच्या जेवणाचा डबा मी लपवायचे
तो खूप शोधायचा पण हट्टी
मला कधीच नाही विचारायचा
कित्येकदा उपाशीच राहायचा
पण अबोला नाही तोडायचा
तसा तो हि काही कमी नव्हता
बाईक वर फिरायचा
नेमके मी आणि माझी मैत्रीण कुठे निघालो
कि मैत्रिणीला सोडू का म्हणून विचारायचा
आणि मला एकटे करून जायचा
पुन्हा बदला घ्यायचा डाव माझा मग असायचा
तसे मला न माहित होता माझी मदत पण करायचा
मला कधी कळले तर मात्र राग खूप यायचा
तसा थोडा भावूक जरा रागीट होता
थोडा समजदार आणि जास्त मनमिळावू होता
कळलेच नाही आमच्या नात्याचा काय अर्थ होता
तो गेला निघून मग वाट पाहणे पर्याय नव्हता
असेच आठवणीत दिवस निघून गेले
पण आमच्या नात्याला नाव द्यायचे राहून गेले.....
No comments:
Post a Comment