कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, November 18, 2011

तुही माझ्या प्रेमात


तुही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं,
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं,
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं,
तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप खूप रडावं. ♥


कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तुला ते अर्धवटच वाटावं.. ♥


मरणही असं..... तुज्या मिठीत यावं,
कि मरणानंतर हि ते मरण मला याद रहावं,
सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं,
कि दु:खाला पण माज्या आयुष्यात येताना कोडं पडावं. ♥

No comments: