कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, November 4, 2011

काहीं चारोळया (Kahin Charolya)

म्हणतात, “शब्द आणी हृदय खूप जपून हाताळावीत...,”
.
.

कारण..., “शब्द एकदा बोलल्यानंतर आणी हृदय एकदा तुटल्यानंतर , त्यांना सावरणं सर्वात कठीण गोष्ट असते..!
 
तू आज धड़कन माग, देऊन टाकिन,
दिल माग , देऊन टाकिन,
जिगर माग , देऊन टाकिन ..
हेच काय जान मागशील तरी देऊन टाकिन, कारन …
चारही फिल्म च्या CDs मज्याघरी पडून आहेत !
 
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
 
कधी तरी भेटायला कारण
लागत नाही...
भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही...
सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत
नाही.........¤¤
मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत
नाही.......!
 
"जेव्हा पासून तुझ्याशी ओळख झाली आहे, तेव्हा पासून तुझ्यावर प्रेम करत आहे
आणि जेव्हा पासून तुझ्यावर प्रेम करत आहे, तेव्हा पासून माझी माझ्याशी ओळख झाली आहे"
 
तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस
जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत
 
मैत्रीच रोप हळू हळू वाढत ,त्याला एकमेकांच्या विश्वासाच पाणी घालाव लागत,
मग हृदयाच्या जमिनीत ते एवढ घट्ट रुजत कि कोणताही गैरसमज त्याला खिळखिळा करू शकत नाही
 
दुसऱ्याने सांगण्याआधी, आपण स्वतालाच स्वताची ओळख करून द्यावी, आपण स्वतःला ओळखले की, मग गर्दीतही लोकांना आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी 
 
 
 
 

No comments: