कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, November 4, 2011

प्रेमभंग व्रत (PremBhang Vrat)

प्रेमभंग झाल्यावर न चुकता करायचे "प्रेमभंग व्रत"
माझ्या मित्रांनो हे व्रत खाली दिल्या प्रमाणे करायचं...

१. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा नेहमी बारा वाजल्यासारखा ठेवायचा..म्हणजे चहा/ सिगरेट चा खर्च मित्रच करतात..!

... २.पंधरा दिवस दाढी करू नये...दुखः दाखवण्याचा हा एक हुकमी उपाय आहे..!

३. शक्य तोवर आंघोळ करू नये,अन् केस तर विंचरू नयेच चांगला इफेक्ट होतो..!

४. हिंदी गम च्या गाण्याच्या सीडी ऐकाव्यात ..गझल वैगरे मस्त मोहोल क्रिएट करतात..!

५.अधून मधून दर्द भारी शायरी सांगायची व विनाकारण आभाळाकडे बघायचं म्हणजे डोळ्यात पाणी पण येत..!

६. आणी शेवटी तिच लग्न असेल त्या दिवशी थोडी घेवून व मित्रांना पाजून या व्रताची सांगता करावी..!

"हे व्रत थोडं कठीण आहे पण केल्यास नक्कीच फायदा होतो व पुढच प्रेम लवकर पदरात पडत...!"

No comments: