एकदा मला सुटायचंय
श्वासांच्या कैदेतून
नात्यांच्या बेड्यातून
शरीराच्या तुरुंगातून
अजून किती काळ आहे हि
पिळवणूक
कोणत्या गुन्ह्याची शिक्षा
न कळले आजवर
कधी सुख मवाळ वाटते
तर दुख:जहाल वाटते
सर्व जग त्याच कैदेत
मग मलाच का शिक्षा वाटते?
सुखी समाधानी राहण्याचा मूलमंत्र
मला नाही जमला
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद
मला नाही मिळवता आला
गर्देची नशा मला नाही झींगली
जगण्याच्या व्यसनात मजाच नाही आली
कसले जिंकणे आणि कसले हरणे
माझी स्पर्धेत उतरण्याची तयारीच नाही झाली
पण मला संघर्ष करायचाय
सहनशीलतेचा अंत पाहायचाय
हि जन्मठेप कधीतरी संपेन
तो पर्यंत हा तुरुंगवास भोगायचाय.....!
श्वासांच्या कैदेतून
नात्यांच्या बेड्यातून
शरीराच्या तुरुंगातून
अजून किती काळ आहे हि
पिळवणूक
कोणत्या गुन्ह्याची शिक्षा
न कळले आजवर
कधी सुख मवाळ वाटते
तर दुख:जहाल वाटते
सर्व जग त्याच कैदेत
मग मलाच का शिक्षा वाटते?
सुखी समाधानी राहण्याचा मूलमंत्र
मला नाही जमला
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद
मला नाही मिळवता आला
गर्देची नशा मला नाही झींगली
जगण्याच्या व्यसनात मजाच नाही आली
कसले जिंकणे आणि कसले हरणे
माझी स्पर्धेत उतरण्याची तयारीच नाही झाली
पण मला संघर्ष करायचाय
सहनशीलतेचा अंत पाहायचाय
हि जन्मठेप कधीतरी संपेन
तो पर्यंत हा तुरुंगवास भोगायचाय.....!
No comments:
Post a Comment