कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, March 11, 2012

तिच्या गल्लीतून

मी उगीच कारणे काढतो
तिच्या गल्लीतून जायला
दिसेल ती एक क्षण
अन मी घायाळ व्हायला

मला आपले वाटते मला कोण पाहत नाही
मी तिला चोरून बघतो हे कोणाला कळत नाही
लोकांना पण संशय येतो, अनोळखी तरुण वारंवार का येतो
इथे त्याचे लफडे तर नाही ,चुकून ती मुलगी आपली तर नाही....

उगीच मग आपल्याच मुलीची कसून चौकशी चालू होते
काय गं! तुझ्या कॉलेज चा आहे का तो? विचारपूसपण होऊ लागते
तसे तिच्या होकार नकाराला काही अर्थ नसतो
पण आता विनाकारण गल्लीत फिरणे याला घरच्यांचा विरोध असतो

हळू हळू बातमी परिसरात पसरते
मग भाई लोकांची गर्दी जरा कान टवकारते
अरे आपल्या एरीयात कोण लाईन मारतो
आज साल्याची तंगडीच तोडतो
तो परत कधी येथे पाय ठेवायचा नाही
त्याला धडा शिकवल्याशिवाय आज राहायचे नाही

तोही जरा शहाणा आता एकटा फिरत नाही
चार मित्र सोबत असल्याशिवाय त्या गल्लीत घुसत नाही
विचारलेच कोणी तर सांगतो अरे मित्र राहतो माझा इथे
पण मला त्याचे घर काही सापडत नाही

इतके सगळे झाले तरी त्याला ती अजून सापडलेली नाही
पण आता सगळ्या गल्लीत त्याच्याच चर्चा होई

आणि गल्लीतल्या सगळ्या मुलींना वाटे
तो फक्त इथे माझ्याच साठी येई.....

No comments: