कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, March 13, 2012

घोंघावते वादळ

ती गाडी चालवत होती सोबत वडील
होते .....
रस्त्याने जात होते ...अचानक
वारा सुटला ......
आभाळ भरुन आले ... विजा कडाडू
लागल्या ...वार्‍याचा वेग वाढला ... घोंघावते वादळ सुरु झाले ...
ती घाबरली वडीलांना विचारले " गाडी थांबवू
का ? काय करु ? "
" चालवत रहा " वडील म्हणाले .....वार्‍या मुळे
गाडी हदरत होती ....
वादळाचा वेग वाढत होता ... " बाबा काय करायचे थांबायचे का ? "
तीने परत घाबरुन विचारले ..
" चालवत रहा , जाउ दे गाडी पुढे , थांबू नको "
वडील म्हणाले ........
पुढचे नीट काहीचं दिसत नव्हते ... फक्त
काही ती अंधून दिसात होते ... तितक्यात त्यांच्या पासून काही अंतरावर
तीला एक मोठी ट्रक
झाडाला धडकता दिसली ... ती अजून
घाबरली ......
" बाबा इतकी मोठी गाडी वादळात
पहा कधी झाली " " त्या कडे लक्ष नको देवू चालत रहा " वडील
म्हणाले
वादळाने फार वेग
घेतला होता ...ती गाडी चालवतचं होती ....
काही अंतर पुढेगेली आणि तीला जाणवले
वादळ जरा ओसरते आहे ... काही किलोमीटर पुढे गेल्यावर वादळ शमले
होते ......
पुढे जमीन अगदी कोरडी आणि आभाळ
अगदी स्वच्छ होते ......
" थांब आता आणि बाहेर निघ " तिचे वडील
म्हणाले ........ " पण आता का ?" तीने आश्चर्याने विचारले
" बाहेर निघ आणि जरा मागे पहा अजून बरेचं
लोकं त्या वादळात आहेत
तु त्या वादळातून बाहेर आली म्हणजे
सुटली असे नाही .. जा आता त्यांना मदत कर
तुला माहीत आहे आता त्या वादळातून कसे बाहेर पडायचे ते ...... वादळ आहे तीथेचं आहे" जीवनाच्या प्रवासात अशी वादळं
नेहमी येतात आणि जेव्हा आपण त्यात
सापडतो
तेव्हा जे नेहमी आपल्या सोबत असतात ,
आपल्याला धीर देतात ,
आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला मार्ग दाखवतात ...........
ते आपले वडील , आई , आपले भाऊ बहिण ,
मित्र
नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे
असतात...
आपणास जगायचे कसे , संकाटाशी दोन हात कसे करायचे ते शिकवतात ...
मदत करायला शिकवतात....जगाय चे कसे ते
शिकवतात .....

No comments: