तुझ्या बरोबर पावसात ......
धुंध पावसात तुझ्या अंग
अंगाला खेटायला आवडेल...
त्या पावसाच्या थेंबानी अंग तुझे
भिजवायला आवडेल...
भिजताना तुझ्या सोबत,
तुला सांभाळायला आवडेल...
पाऊस कोसळताना तुझ्या खांद्यावर
टेकायला आवडेल...
चिंब चिंब पावसात तुझ्या साथीने
मला भिजायला आवडेल...
पावसाळी गारठ्यात तुझ्या हातांच्या उबेत
राहायला आवडेल..
पावसाचे थेंब अंगावर झेलून , तुझ्यावर
ओघळायला आवडेल...
पण मेला पाऊस ...नेहमी नेहमी पडत नाही...
मला संधीच तशी देत नाही..
प्रार्थना करते देवाला, निदान वर्षातून तीन
महिने तरी पाड पावसाला.
तिला राहूदेत घरी, मला त्याच्या बरोबर
नेहमीच जायला आवडेल...
जळूदेत कितीही तिला , मला टुक टुक करून
तिला चिडवायला आवडेल..
चिंब पावसात तुझ्या बरोबर राहायला आवडेल...
वेड्या पावसात वेड्या सारखे संगे
तुझ्या भिजायला आवडेल
एवढे नशीब मला सोडून , कोणाला मिळते तेच
पाहायला आवडेल
अरे वेड्या, मला तुझी छत्री व्हायला आवडेल...
No comments:
Post a Comment