कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, February 5, 2013

किंमत (बोधकथा )


एका विवाहित जोडप्याला १५ वर्षाँनी एक मुलगा झाला.
त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
तो मुलगा त्यांचा जीव की प्राण झाला होता.
.
.
मुलगा २ वर्षाचा झाला.
तेव्हा एका सकाळी त्या मुलाचा बाप कामावर जाण्याच्या वेळेला दरवाजात बुट घालत असताना एक औषधाची बाटली दिसते.
.
परंतु त्याला कामावर जायला खुप उशीर झाल्यामुळे तो बायकोला बोलला. "अगं ये, मला उशीर झालायं ती बाळाजवळ असलेली औषधाची बाटली बंद करुन कपाटात ठेवुन दे.."
.
.
त्याची बायकोदेखील किचनच्या कामात इतकी व्यस्त झाला होती की ती बाटली बद्दल सांगितलेलं विसरुन जाते.
.
काही वेळाने तो मुलगा ती बाटली बघतो आणि त्याच्याबरोबर खेळता खेळता त्यातलं औषधं देखील सर्व पिऊन टाकतो..
.
खरं तरं ते औषधं पॉवरफुल आणि मोठ्या माणसांचं असतं..
.
ते प्यायलानंतर तो मुलगा जेव्हा चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा त्याची आई पटकन बाहेर येते..
आणि ते दृश्य बघितल्यावर तिला जबर धक्का बसतो.
.
शेजाऱ्यांच्या मदतीने त्या मुलाला हॉस्पिटल मध्ये नेतात.
.
पण त्या ओवर डोसमुळे मुलगा मरण पावतो..
.
अक्षःरशा तिला खुप धक्काचं बसतो.
.
खुप घाबरली देखील असते की आता त्यांना कसं
सामोरं जायचं.
.
जेव्हा त्या मुलांचे वडिल हॉस्पिटलमध्ये येतात आणि मुलाला मेलेल्या अवस्थेत बघतात तेव्हा त्यांच्या अंगातला जीव गेल्यासारखे खाली कोसळतात..
.
काही जण त्यांना खुर्चीवर बसवुन पाणी पाजतात तेव्हा ते शुद्धीवर येतात.
.
आणि बायकोकडे बघत काहीतरी बोलतात.
.
.
तुम्हाला काय वाटतं काय बोलले असतील ते तिला..?
.
.
.
.
.
ते बायकोला फक्त एवढचं बोलतात की, "धीर धर, मी तुझ्या सोबत आहे .."
.
नवऱ्याचं हे ऐकुन तिला त्यांच्यावर विश्वासचं बसतं नव्हता..
.
कारण की, चुकं दोघांची होती.
.
पहिली तर,
नवरा जेव्हा कामावर जात होता तेव्हा त्यांनी फक्त १ मि काढुन ती औषधाची बाटली कपाटात ठेवली असती तर आज ही वेळ आलीच नसती.
.
.
दुसरी म्हणजे,
तिने जेव्हा नवऱ्याचं ऐकलं की बाटली बंद करुन कपाटात ठेव तर तेव्हाचं तिने पटकन ते एका मिनिटाचं काम करायला पाहिजे होतं.
.
.
.
.
.
सांगायच हेचं आहे की एका सेकंदाची चुक खुप महागात पडते.
आणि त्याची किंमत जन्मभर भोगावी लागते..

No comments: