कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, March 22, 2013

शिवा काशीद


शिवा काशिद सारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. म्हणुनच रयत सुखाने व स्वाभिमानाने जगु लागली.सारखे किंवा हूबेबूब दिसण्याचा आणि त्या पाठीमागचे शिवा काशीद चे बलिदान....!!
पडायचेच असेल तर दहा हजार फुटावरून पडा म्हणजे निदान लोकांना हे तरी कळेल कि तुम्ही किती उंचीवर गेला होतात. मरणाला कवटाळायाचेच असेल तर नरवीर शिवा काशीदसारखे मरा ज्यामुळे निदान तुम्हाला म्हणता तरी येईल, " मेलो तरी शिवाजी महाराज बनून मेलो.

सिद्दी जोहारने पन्हाळ्याला वेढा घातला तेव्हा पन्हाळ्याहून विशाळ गडाकडे कूच करताना बाजी प्रभू देशपांडेनी गाजविलेला इतिहास अमर झाला. पण त्याचवेळी शिवा काशीद नावाच्या एका निधड्या छातीच्या मावळ्याने गाजविलेला इतिहास मात्र आजही बर्याच जणांना माहित नाही. शिवा काशिद्चे नावच शिवा नव्हते तर दिसणेही शिवाजी महाराजासारखेच होते. सिद्दी जोहरचा जावई सिद्दी मसूद महाराजांच्या पाठलागावर होता. अशा वेळी त्याला हुलकावणी देण्यासाठी शिवाने पालखीत बसायचे व ती पालखी घेऊन पाच पंचवीस जणांनी मुख्य वाटेने जात राहायचे आणि खर्या महाराजांनी आडवाटेने विशालगडाकडे पसार व्हायचे असा बेत आखण्यात आला होता. महाराजांनी विचारताक्षणीच शिवाने तत्काळ होकार दिला होता.

हा होकार जीवघेणा होता. जर पाठलाग झाला तर शिवाने मुख्य रस्त्याने जायचे होते म्हणजे सापडायचे होते, व आपणच शिवाजी असल्याचे नाटक करून शत्रूची दिशाभूल करून त्याचा वेळ खायचा होता. जेणे करून महाराज आणखी पुढे जाऊ शकतील. एवढी फसवणूक करून सापडल्यावर शत्रू जिवंत सोडणार नाही हे शिवाला माहित असूनही त्याने महाराजांचा वेश घातला होता. अन घडलेही तसेच. सिद्दी मसूदने शिवाचा पाठलाग केला. त्याला पालखीत शिवाजी महाराजांच्या रुबाबात बसलेला शिवा सापडला. महाराजांनाच पकडल्याच्या आनंदात तो ससैन्य परतला. शिवाचे काम झाले होते. त्यांच्या वेळेचा त्याने खोळंबा केला होता. त्यामुळे महाराज खूप पुढे गेले होते. शिवाची पालखी जेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी आली तेव्हा सिद्धी जोहर पालखी समोर आला. मशालीच्या उजेडात तो खरा शिवाजी नाही हे उघड झालं, तेव्हा सिद्धी जोहर प्रचंड खवळला. आपले सोंग उघडकीस आले हे दिसताच शिवा काशीद घाबरला नाही. उलट तो खो खो हसू लागला. " कशी खोड मोडली " असे विचार णार्या बालकाची निरागसता, आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. भीतीचा तर लवलेशही नव्हता. खवळलेल्या शत्रूच्या तलवारी सपासप शिवावर कोसळल्या पण शरीर मरत असताना देखील शिवाचे मन म्हणत होते, " अरे मेलो तरी शिवाजी महाराज बनून मेलो.

" मित्रानो, तुमच्या आयुष्यात कदाचित अशी वेळ कधी येणार नाही. पण जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा किडा मुंगीचे मरण मरण्यापेक्षा शिवा काशीदचा हा संदेश स्मरून त्यातल्या त्यात जे शक्य असेल ते भव्य कार्य करून आपल्या जीवनासोबत आपले मरणही सार्थकी लावावे आणि म्हणावे, " मेलो तरी शिवाजी महाराज बनून मेलो. "

No comments: