कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, November 19, 2011

ते प्रेम आहे


सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे


मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे


भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे


जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे


जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते प्रेम आहे


स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे


जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे


कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे


जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ते प्रेम आहे


हि कविता वाचताना प्रेतेक ओळीला जिची आठवण आली ते प्रेम आहे.....

No comments: