काही काही परिस्थितीत माणसाकडे "विसरून जाणे" आणि "वाट पहाणे" असे दोन पर्याय असतात.
"विसरून जाणे" आणि "वाट पहाणे" ह्या दोन्ही गोष्टी इतक्या कठीण नसतात,
पण त्याहून जास्त कठीण असते ते म्हणजे या दोन्हींपैकी "एकच पर्याय" निवडणे.
हा एक पर्याय निवडता निवडताच आयुष्याचे बरेच दिवस असेच निघून जातात
आणि
हे दिवस निघून गेल्यावर जेव्हा आपण मागे वळून पहातो,तेव्हा लक्षात येते कि
"आयुष्याचे बरेच दिवस आपण फक्त निर्णय घेण्यात वाया घालवले आणि
या दिवसात आपण विशेष असे काहीच मिळवले नाही,
मनस्ताप मात्र भरभरून मिळवला"
No comments:
Post a Comment